राजीव तांबे हे सध्याचे मुलांचे सर्वात आवडते लेखक. राजीव तांब्यांची प्रत्येक कृती आणि काम हे फक्त आणि फक्त मुलांसाठीच असते. मुलांसाठी लिखाणाबरोबरच त्यांनी प्राथमिक शिक्षकांसाठी, पालकांसाठी, युनिसेफ आणि अनेक ‘एनजीओज’ संस्थांसाठी चर्चासत्रे, प्रशिक्षण आणि सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. पहिली ते चौथीच्या मुलांसाठी त्यांनी चालवलेला ‘गंमतशाळा’ हा उपक्रम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राबविला जातो. वृतपत्रातल्या लेखना बरोबरच त्यांची मुलांसाठी बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहे. ह्यामध्ये गोष्टी, कविता, कादंब-या, निबंध लेखन, शिक्षकांसाठी प्रशिक्षण तसेच मुलांच्या भाषा विकासावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या ह्या कार्याबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
इसाप कोण होता आणि इसापनीती म्हणजे काय?
इसाप व त्याच्या जगप्रसिध्द इसापनितीची एक ओळख ज्या वेळी शब्दांना अर्थ नव्हता, वेदनेला भाषा नव्हती, मानवता आणि करुना बंदीवान होती. अशा काळात बोलण्याची हिंमत करणारी साहसी जिभ म्हणजे इसाप.
आई-बाबा होणे एकवेळ सोपे परंतू पालक होणे अत्यंत कठीण आहे. प्रत्येक नवा दिवस हा एक नवा ‘चॅलेंज’ घेऊन येतो. आपल्या रोजच्या जगण्यातून, उदाहरणातून मुलांवर संस्कार करणे आवश्यक आहे. ‘अंकूर’ ह्या सदरात आपण आपल्या जीवनाशी निगडीत गोष्टी वाचणार आहोत.