मराठी दाग-दागिने

शिरोभूषणे

केसांत मोती निरनिराळी पदके वापरून केशरचना करण्याची पध्दत आजही आहे. पुर्वी वेणी घातलेल्या केसांत नगाचा वापर केला जाई. या नगात गोंडे फुलांचा संच असून नाग, केवडा, चंद्र, सूर्य, स्वस्तिक या चित्रांची पदके असत. अंबाडा सजविण्यासाठी नगाचा वापर करत. भांगाच्या मध्यभागी, बिंदी, बोर, भांगसर, बिजवरा यांसारखी आभूषणे लावली जात.

आंबोडयातील फुले – ही अंबाडा तसेच वेणी सजवण्यासाठी वापरतात. ही सतराव्या शतकापासून प्रचलित आहेत.

वेणी – ही कोकणपट्टीत जास्त प्रसिध्द आहे.

ambada pule
आंबोडयातील फुले
veni
वेणी
gulabful
गुलाबफुल

कर्णभूषणे

कर्णभूषण घालणे हे हिंदू संस्कृतीचे लक्षण मानले जाते. कान टोचल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते असे काही लोकांचे म्हणणे आहे.

कुडी
kudi कुडी हे कर्णभूषण पेशवाई काळात खूप प्रसिध्द झाले. सोन्याचे किंवा मोत्याचे ६-७ मणी वापरून केलेल्या फुलासारखा आकाराच्या कर्णभूषणांना ‘कुडी’ म्हणतात. कुडया ह्या विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे लक्षण मानले जातात. कुडयांव्यतीरिक्त कर्णफुले, भोकर, झुबे, झुंबर, बाळी, वेल,सोन्याचे कान यांसारखे आभूषणेही कानात घातले जातात.

झुमके
zumakeयाचे पारंपारिक नाव झुबे असे आहे. सतराव्या शतकाच्या आधीपासून हे प्रचलित आहेत. फक्त याच्या आकारात फरक असेल.

कान
kaanहे कर्णभुषण पूर्ण कानाच्या आकाराचे असते. हल्लीच्या काळात हे आभुषण फार प्रचलित आहे.

बाळी
bhikabaliबाळीला फिरकी नसते. यात सोन्याची किंवा चांदीची तार वळवून कानात अडकवलेली असते. पुर्वी मुलांना नजर लागू नये म्हणून भीक मागितलेल्या पैशाने जी बाळी बनविली जाई त्यास भिकबाळी म्हणत.

वेल
हा मोत्याचा किंवा सोन्याचा सर असतो तो कानातून केसात अडकवितात. तसेच मोठमोठी व जड कर्णभूषणे घालून कानाची पाळी ओघळू नये म्हणून कानात साखळी अडकविण्याची पध्दत आहे.

बुगडी
कानाच्या खालच्या पाळी बरोबरच कानाच्या वरच्या कडेच्या पाळीवर बुगडी घातली जाते. ही मोत्यापासून बनविलेली असते.

कुडकं
कानाच्या आतील बाजूच्या पाळीत कुडकं घालण्याची पध्दत आहे. काही जमातींमध्ये ४-५ ठिकाणी कानाच्या कडा टोचण्याची पध्दत आहे.

बाहुभूषणे

केवळ हाताचा विचार केला तरी त्यात आपण तीन ठिकाणी दागिने घालू शकतो. दंडात, मनगटावर आणि बोटांवर. आजच्या जमान्यात हे सारे दागिने फार मोजक्या संख्येनेच दिसतात. परंतु पूर्वी म्हणजे पेशवाईच्या अखेरच्या काळात दंडावरच्या किंवा मनगटावरच्या दागिन्यांचे दहा – पंधरा तरी वेगवेगळे प्रकार वापरात असत. त्यांची नावेच केवळ जुन्या कागदपत्रांमधून आढळतात. स्त्रियांच्या वापरातले आजचे दंडावरचे दागिने असे आहेत.

पद्मभूषणे

पैंजण, तोरडया, वाळे, चाळ ही पद्मभषणे चांदीचीच असतात. कारण चांदी थंड असल्याने पायातील उष्णतेस ती प्रतीरोध करते.

पैंजण हे एकपदरी असतात. तर तोरडया व वाळे जाडजुड असतात. वाळे हे तांब्याचे सुध्दा असतात. लहान मुलांच्या पायात असे तांब्याचे वाळे घालण्याची पध्दत आहे. चाळ हे नृत्यांगना वापरतात. चाळात अनेक घुंगरे असतात. ही शक्यतो पितळेची असतात. हातातील बोटांप्रमाणे पायातील बोटेही सजवली जात. पायाच्या अंगठयात अनवट अंगुष्ठा नावाचे जाड कडे, दुस-या बोटात जोडवी किंवा विरोद्या व चौथ्या बोटात मासोळी तर करंगळीत वेढणी घालण्याची पध्दत होती.

jodavi
जोडवी
angushtha
अंगुष्ठा
painjan
पैंजण
toradya
तोरडया