पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घ्यायला आलेल्या रसिकांचे मनापासून स्वागत !
खास मराठी ढंगाच्या पाककृतींचा हा विभाग. ‘खऱ्या खाणाऱ्याला हजारो पुस्तके देणार’ अशी आजची परिस्थिती आहे कारण वेगवेगळया प्रकारच्या पाककृतींची अनेक पुस्तके बाजारात आजकाल दररोज येत आहेत. टेलिव्हिजनवरही त्या संबंधीचे अनेक कार्यक्रम दाखविले जातात. मग या वेबसाइटवर वेगळे ते काय असणार ?
खास महाराष्ट्रीय म्हणून गाजलेल्या पुरणपोळी, बटाटेवडा, अळूची भाजी यांसारख्या निवडक पदार्थांच्या पाककृतीच येथे दिलेल्या आहेत. जी मराठी माणसे महाराष्ट्रापासून खूप दिवस दूर राहिलेली आहेत, आणि ज्यांना घरचे विशिष्ट पदार्थ खाण्याची हुक्की येते अशांना किंवा महाराष्ट्रातच असलेल्या नवशिक्या युवक-युवती यांसाठीही या पाककृतींचा उपयोग होईल.
ज्यांच्या हातचे पदार्थ अनेकजणांकडून नावाजले गेले आहेत त्यांच्याकडून त्यात्या पदार्थांच्या कृती घेतलेल्या आहेत. शिवाय ‘पाकसिध्दी’ या लक्ष्मीबाई वैद्य यांच्या पुस्तकातून यातील काही पाककृती घेतलेल्या आहेत. लेखिकेला पाकशास्त्राची शिक्षिका म्हणून तीस वर्षांचा अनुभव आहे. शिवाय अनेक तज्ञांच्या हाताखाली त्यांनी अनेक वेळा हे पदार्थ करून पाहिले असून त्यानुसार त्यात्या कृती लिहिलेल्या आहेत. पदार्थांच्या कृती विभागवार दिल्या आहेत. ते विभाग सर्वपरिचित असेच आहेत. त्या त्या विभागावर क्लिक केल्यावर त्या विभागातील पदार्थांची नावे दिसतील व त्यातील हवा तो पदार्थ क्लिक करून निवडला की त्या पदार्थाची कृती मिळेल.
या पाककृतींखेरीज एखाद्या विशिष्ट महाराष्ट्रीय पदार्थाची कृती हवी असल्यास आम्हाला इ-मेलने जरूर कळवा. आम्ही ती कृती या विभागात लगेच घालू व तुम्हाला इ-मेलने कळवू !