दिवाळीचा फराळ

सणांचा राजा म्हणून दिवाळीला मान आहे. वसुबारसेला सुरू होणारा हा सण भाऊबीजेपर्यंत विविध प्रकारे साजरा केला जातो. त्यातील दिवाळीच्या फराळाला महाराष्ट्रीय लोकांच्या मनात वेगळेच स्थान आहे. भल्या पहाटे अभ्यंगस्नान करून, देवदर्शन घेऊन, घरी बनविलेल्या फराळाच्या पदार्थांचा समाचार घेऊन दिवाळीची सुरुवात होते.

पूर्वी दिवाळीच्या फराळाचे जिन्नस वर्षातून एकदा- फक्त दिवाळीलाच केले जात असत. त्यामुळे लाडू, करंजी, चकली, शंकरपाळे, अनारसे, चिवडा, साटोऱ्या, मोतीचूर, चिरोटे वगैरे पदार्थांचे सर्वांना कमालीचे अप्रूप असे. आज हे पदार्थ अनेक उपाहारगृहांमधून वर्षभर नियमितपणे मिळतात. तरीही या पदार्थांच्या तळणीचा वास आल्याशिवाय दिवाळी साजरी केल्याचे समाधान मिळत नाही. खुसखुशीत व तोंडात घातल्या घातल्या विरघळणारी चकली हा अनेक गृहिणींचा कौतुकाचा विषय आहे कारण सगळयांना ती जमतेच असे नाही. हे फराळाचे पदार्थ करण्याच्या ‘हमखास छान उतरणाऱ्या’ पाककृती पुढे दिलेल्या आहेत. त्या तुम्हाला रुचतील अशी आशा आहे.

शेव

shev साहित्य – १ वाटी तेल, ४ चमचे तिखट, ४ चमचे मीठ, पाव चमचा हळद, १ चमचा ओवापूड(ऐच्छिक), अंदाजे ४ वाटया डाळीचे पीठ, तळण्याकरता तेल.

कृती – १ वाटी तेल, १ वाटी पाणी घालून हाताने परातीत फेसावे किंवा एग बिटरने एकजीव करावे. पांढरट रंगाचे होईपर्यंत फेसावे. त्या तेलात १ चमचा ओवापूड, मीठ, तिखट, हळद घालावी व सामावेल तेवढे डाळीचे पीठ घालावे. खूप घट्ट भिजवायचे नाही. भाज्यांच्या पिठापेक्षा घट्ट असावे. पसरट कढईत तेल तापवावे. वरील तयार पीठ सोर्‍यात मावेल एवढे भरावे. सोर्‍याला कढईतल्या तेलावर धरून हाताने गोल फिरवत सोर्‍या दाबून कढईत शेवेचा गोल चवंगा पाडावा. थोडया वेळाने दूसर्‍या बाजूनी हलक्या हाताने उलगडून चवंगा दोन्ही बाजूनी हलक्या गुलाबी रंगावर तळावा व चाळणीत तेलातून निथळून काढावा. अशा रितीने सर्व पिठाचे चवंगे घालून शेव तळून घ्यावी. अंदाजे ७-८ चवंगे होतील व शेव वजनाला अर्ध्या किलोपेक्षा जास्त भरेल.

चिवडा

chivda साहित्य – भाजके पोहे मापी असतील तर १ माप, वजनी असेल तर पाव किलो, दाणे १०० ग्रॅम, खोबरे पातळ काप करून, १०० ग्रॅम डाळं, १०-१२ मिरच्या, १ इंच आलं, १०-१२ लसूण पाकळया वाटून, पाव किलो गोडेतेल, मीठ, तांबडे तिखट, धन्याजिर्‍याची पूड, १ चहाचा चमचा पिठीसाखर, मूठभर कढीलिंबाची पाने, फोडणीचे साहित्य.

कृती – भाजके पोहे मोठया भोकाच्या चाळणीने चाळून स्वच्छ निवडावेत. कारण भाजक्या पोह्यात वाळू किंवा कचकच जास्त असते. पोहे कडकडीत उन्हात वाळत टाकावेत. मोठया पातेल्यात पाव किलो तेलाची फोडणी करावी, त्यात कढीलिंबाची पाने, वाटलेल्या मिरच्या, आलं जरा परतावे.

शंकरपाळे

shankarpali साहित्य – १ वाटी रवा, १ वाटी साखर, १ वाटी पाणी व अर्धा वाटी तूप, मैदा.

कृती – प्रथम १ वाटी साखर, १ वाटी पाणी व अर्धा वाटी तूप एकत्र करून साखर विरघळेपर्यंत गॅसवर ठेवावे. नंतर मिश्रण थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर त्यात रवा मिसळावा. गरम असताना रवा मिसळल्यास तो शिजतो. रवा मिसळल्यानंतर दीड ते दोन तास भिजू द्यावे. नंतर त्यात मावेल तितका मैदा घालून व्यवस्थित(खूप घट्ट नाही व खूप पातळ ही नाही.) मळावे. नंतर त्या पिठाचा लहानसा गोळा घेऊन पोळपाटावर लाटावा. नंतर कातण्याने त्याचे शंकरपाळे कापून तुपात मंदाग्नीवर कापून तुपात मंदाग्नीवर तळावेत.

ओल्या नारळाच्या करंज्या

karnjya साहित्य – ३ वाटया रवा, १ वाटी मैदा, १/४ चमचा मीठ, ८ चमचा पातळ डालडाचे मोहन.

सारण – २ मोठे नारळ, ३ वाटया साखर, वेलची पूड, ५० ग्रॅम बेदाणा, १० ग्रॅम बदाम, थोडा रोझ इसेन्स.

कृती – रवा, मैदा पीठ व डालडा एकत्र करून दुधात किंवा पाण्यात घट्ट पीठ भिजवावे. साधारण तासाभराने पाटयावर पीठ कुटून घ्यावे व त्याच्या बेताच्या आकाराच्या लाटया करून, ओल्या कपडयाखाली झाकून ठेवाव्यात.

खोबरे व साखर एकत्र करून अगदी मिनिटभर गॅसवर ठेवावे. साखर विरघळली की लगेच उतरवावे. नंतर त्यात इसेन्स, वेलची पूड, बेदाणा व बदामाची सालं काढून केलेले काप घालावेत. वरील पिठाच्या पातळ पुर्‍या लाटून त्यात नारळाचे सारण भरून करंजीसारखे दुमडून कडा चांगल्या जुळवून नंतर कातण्याने कापून मंदाग्नीवर तळाव्यात.