भोगी

bhogi पौष महिन्यात , हिंदूंच्या ‘संक्रांत’ या सणाच्या आदल्या दिवशी, म्हणजे १३ किंवा १४ जानेवारीला भोगी हा सण दरवर्षी साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पध्दत आहे. ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे-गाजर- हरभरे- वांगी या सर्वांची मिळून भाजी वगैरे. देवाची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिला तेल, शिकेकाईने नहावयास घालतात. जेवणानंतर विडा, दक्षिणा दिली जाते. अधिक वाचा…

मकरसंक्रांत

rain सूर्य एका राशीतून दुस-या राशीत जाणे यालाच ‘संक्रमण’ म्हणतात. मकर राशीमध्ये सूर्य जाणे यालाच ‘मकर संक्रमण ‘ असे म्हणतात. ज्या दिवशी सूर्य धन राशीतून मकर राशीमध्ये जातो त्या संक्रमणाच्या दिवशी दरवर्षी हिंदू लोक ‘संक्रांत’ हा सण साजरा करतात. हा सण पौष महिन्यात येतो. हिंदू लोकांचे सण हे चांद्रवर्षानुसार असल्याने सध्या वापरल्या जाणा-या इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हिंदूंचा सण हा दरवर्षी विशिष्ट तारखेलाच येईल असे नसते. याला एकमेव अपवाद म्हणजे संक्रांत. संक्रांत हा सण प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या १४ किंवा १५ तारखेलाच साजरा केला जातो. अधिक वाचा…

१४ जानेवारीशी मकर संक्रातीचा संबंध नाही

navratra २ डिसेंबर रोजी उत्तरायणास सुरुवात होते. या दिवसापासून दिनमान मोठे होण्यास प्रारंभ होतो. या आनंदाप्रीत्यर्थ साजरा करण्याचा दिवस म्हणजे मकर संक्रांत. सूर्य मकर राशीत प्रवेश करतॊ तो दिवस. मकर संक्रांतीला फ़ार प्राचीन काळापासून महत्त्व प्राप्त झाले. महाभारतात पितामह भीष्म याच दिवसासाठी काही महिने बाणाच्या शय्येवर पडून होते. या दिवशी परलोकवाशी होणारा जीव जीवनमृत्युच्या चक्रातून सुटून मोक्ष प्राप्ती करतॊ असा समज आहे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी हा सण साजरा केला जातॊ. अधिक वाचा…

मंगलाष्टक

mangalashtak वर्षातून दोन महाएकादशी असतात. पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी. आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते . आषाढी एकादशीला वारकरी आळंदीहून पंढरपूरला जातात, तर कार्तिकी एकादशीला पंढरपूरहून आळंदीस येतात. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे महात्म्य असते आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वरांचे महात्म्य असते. अधिक वाचा…

मोहिली धबधबा

mohili waterfall पावसाळ्यात उंच डोंगरमाथ्यावरून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे पाहण हे पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असतो. कर्जत तालुक्याला निसर्गाने “मोहिली धबधबा ” हे देणं दिलं आहे. मोहिली धबधबा हा कर्जत पासून ६ ते ७ कि. मि लांब आहे. उल्हास नदी पार करून प्रत्यक्ष मोहिलीत प्रवेश होतो. डोंगरावरून भिरभिरणारा वारा, हिरवीगार वनराई, तेथून दिसणारा आजूबाजूचा निसर्ग असे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून ठेवावे असे वाटते. डोंगरमाथ्यावरून मुंबई – पुणे रेल्वेचा रस्ताही दिसतो. धबधब्याजवळ पर्यटकांची हॉटेल्स आहेत. मोहिली धबध्ब्याजवळ थंड वातावरणात गरम-गरम वाफाळता चहा आणि मक्याची कणसे खाण्याची मजाच काही और आहे असे इथे येणारे पर्यटक सांगतात. अधिक वाचा…

मराठी कोश वाड्मय

learn मराठी अक्षर वाङ्मयाचा विचार करू लागल्यावर मराठी कोश-साहित्याचा विचार करणे अत्यंत अगत्याचे आहे. कोणत्याही भाषेतील कोश साहित्य हे समाजाचे विचार आणि संस्कृती यांचे संचित धन मानले जाते. ज्या भाषेत विविध विषयांच्या कोशांची निर्मिती होते ती भाषा ज्ञानक्षेत्रात संपन्न बनते. जिज्ञासू अभ्यासकांना, संशोधकांना आणि सार्वजनिक जीवनात कार्य करणा-यांना जरूर ते संदर्भ अल्प वेळात आणि अल्प प्रयासाने शोधण्याचे विश्वासार्ह साधन म्हणजे कोश होत. अधिक वाचा…

खाशी मराठी पंगत

marathi-pangat बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार जेवणाखाणाच्या पध्दती बदलल्या आहेत. आजच्या ‘झटपट’च्या व वेगवान युगात जेवणाच्या पंगती घालायला व त्यासाठी मोकळा वेळ काढायला कुणालाही फुरसद नाही. परंतु जुन्या काळच्या मराठी पंगतींमध्ये एक शान होती. ती कशी? पूजा-अर्चा, मंगल कार्ये आणि सणाशी निगडीत असे विधी पार पडल्यानंतर जेवणाच्या पंगतीची गडबड उडे. बसायला लाकडी नक्षीदार पाट, मागे टेकायला पाट व समोर चौरंग असे. चौरंगांवर चांदीची ताटे, वाटया, तांब्या-भांडी मांडली जात. ताटाभोवती सुरेख महिरपींची रांगोळी रेखली जाई. मुख्य पाहुण्याच्या ताटाभोवती फुलापानांची सजावट होई. सुवासिक उदबत्त्यांचा गंध दरवळू लागे. सनईवर संगीत सुरू होई. चांदीच्या समयांचा मंदसा प्रकाश वातावरण उजळून टाकत असे. अधिक वाचा…

श्लोक, स्तोत्रे व प्रार्थना

pratah-smaran वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। १ ।।
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। २ ।।
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ।। ३ ।। अधिक वाचा…


अन्न हे पूर्णब्रम्ह

ann-he-purnabramha

मधल्या वेळचे पदार्थ
milk-pohe व्यवस्थित न्याहारी घेणे ही खास पाश्चात्य संस्कृतीतील प्रथा आहे. ‘ब्रेकफास्ट’ या शब्दाचा अर्थच उपवास… 

 

भ्रमंती

bhramanti

भीमाशंकर मंदिर
bhimashankar भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे… 

 

 

 

संस्कृती

sanskruti

पारंपारिक पेहराव
parkar-polk पारंपारिक म्हणून नावाजलेले परकर-पोलके, मुलगी तीन वर्षांची झाली की मुलीची आत्या आपल्या भाची साठी… 

 

कला-क्रिडा

kala-krida

लावणी सामाज्ञी सुलोचना चव्हाण
sulochana-chavan १७ मार्च १९३३ मध्ये मुंबईत सुलोचना चव्हाण यांचा जन्म झाला. त्यांचे माहेरचे नाव सुलोचना कदम… 

 

 

 



सृष्टीरंग

अंतराळ ही एक गूढ पोकळी
antaral अंतराळ ही एक गूढ पोकळी. थंड, अंधारी. मनच नाही पण शरीराला तरंगत ठेवणारी पोकळी. आपण जरी पोकळी…

मुक्तांगण

नवचैतन्य भविष्याचे…
srushti nerkar राज्यात दुष्काळग्रस्त परीस्थिती असताना नाशिक जिल्ह्यातील सृष्टी नेरकर या छोट्या संशोधिकेने गरजेपुरते पाणी वापरण्यासाठी…