चिंटू

chintoo चिंटू, “आमच्याकडे केबलचे कनेक्शन पप्पांनी काढून टाकले आहे.”
बगळ्या, “कारे, तू अभ्यास करत नाही म्हणून?”
चिंटू, “नाही पप्पांचाच वेळ जास्त जातो म्हणून..”

हा, हा, हा, बालदोस्तांनो रोजच्या रोज वर्तमानपत्रातून भेटणारा हा चिंटू लहानमोठयांमध्ये अगदी लोकप्रिय आहे. चिंटूच्या बरोबरीने आपल्याला भेटायला येतात मिनी, पप्पू, बगळ्या, आई-बाबा आणि जोशी काकू. थोडासा खटयाळ पण हुशार चिंटूचे निर्माते आहेत चारुहास पंडीत आणि प्रभाकर वाडेकर. त्यांनी प्रथम चिंटूची निर्मिती १९९० साली केली आणि त्यादिवसापासून चिंटू लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. चारुहास पंडीत आणि प्रभाकर वाडेकर दोघेही कलाकार असून कार्टून निर्मिती त्यांची खासियत आहे. आजपर्यंत चिंटूच्या २५०० पेक्षा जास्त चित्रकथा प्रसिध्द झाल्या आहेत. तसेच ३० पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मराठीत दिर्घकाळ चालणारे कदाचित चिंटू हे एकमेव कार्टून असेल. चिंटूच्या साईटवरुन तुम्ही चक्क ईमेल द्वारे चिंटूचे विनोद मागवू शकता आणि तेही मोफत. तर मग रोज खदाखदा हसण्यासाठी वाचणार ना www.chintoo.com वरचे चिंटूचे विनोद.

– भाग्यश्री केंगे

विनी द पू …

winnie cartoon विनी द पू हे पिवळ्या रंगाचे टेडीबेअर असून ए.ए. मिल्ने ह्या कार्टूनीस्टने १९२६ साली निर्माण केले. प्रथम त्याने विनी द पूची पुस्तके आणली आणि मग कविता संग्रह. कालांतराने ‘वॉल्ट डिस्ने’ ह्या कंपनीने त्यांच्या कार्टून मालिकेत सामाविष्ट केले. त्यावेळेला विनी द पूने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडलेत. पर्यायाने विनी द पू फक्त इंग्रजी भाषेपुरते मर्यादित न राहता इतर अनेक आंतरराष्ट्रीय भाषेतही बालदोस्तांसाठी दाखल झाले.

मिल्ने ह्यांनी विनी द पूचे पात्र कसे निर्माण केले ह्याची कथा मनोरंजक आहे. त्यांचा मुलगा क्रिटोफर रॉबीन छोटा असतांना त्याच्या खेळण्यात ‘ विनीपेग’ नावाचे पिवळे टेडीबेअर होते. एकदा संपूर्ण कुटूंब लंडनला सुट्टी घालवायला गेले असतांना त्यांना प्राणीसंग्रहालयात ‘पू’ नावाचा हंस भेटला. त्या हंसा इतकाच सुंदर आणि मनमिळाऊ आपला ‘ विनीपेग’ आहे असे क्रिटोफर रॉबीनला वाटे. तेव्हांपासुन त्याने त्याचे नाव विनी द पू ठेवले.

कालांतराने टिव्हीमुळे विनी द पू खुपच लोकप्रिय झाला. गेले तीस वर्ष विनी द पू बालदोस्तांचे मनोरंजन करत आहे. विनी द पू वर सिनेमा, रेडिओवर श्रुतीका, पुस्तके, कविता, व्हिडीओ गेम्स आहेत. तर मग एवढा मोठा इतिहास असणार्‍य़ा विनी द पूला पाहयला, पुस्तके सुट्टीत वाचायला विसरु नका.

शीनचॅन नोहारा

shinchan cartoon हंगामा चॅनलवर मस्ती करणारा शीनचॅन, त्याची सतत ओरडणारी आई, वैतागलेली टीचर आणि झोपा काढणारे बाबा… ही सारी मंडळी शीनचॅन नोहाराबच्चे कंपनीची अतिशय लाडकी आहे. शीनचॅन नोहारा हे पात्र लिहीले योशितो उसुइ ह्यांनी. शीनचॅन हा पाच वर्षांचा बालवाडीत जाणारा मुलगा. प्रथम एका जपानी मॅगझीन करता लिहिलेल्या शीनचॅनच्या गोष्टी १९९२ मध्ये टिव्हीवर दाखवल्या गेल्या. जपानच्या कुसूकाबे शहरात राहाणारा शीनचॅन त्याचे कुटूंबिय, शाळेतले मित्र, शिक्षक आणि त्याचा लाडका कुत्रा शिरो ह्यांच्या भोवती हया कथा घडतात. शीनचॅनच्या वागण्या, विनोदी बोलण्यामुळे तो लोकप्रिय आहे. परंतु कधीकधी त्याच्या आगाऊ बोलण्यामुळे आणि वयापेक्षा मोठे असल्यासारखे वागण्यामुळे तसेच मोठया स्त्रियांबरोबर त्याच्या चुकीच्या वागण्यामुळे शीनचॅन वादाच्या भोव-यात सापडला होता. तरी ह्या वर्षात शीनचॅन आपला पंधरावा वाढदिवस साजरा करत आहे. दोस्तांनो, शीनचॅन तुम्ही बघा पण त्याच्या सारखे वागायला जाऊ नका.

टॉम ऍंन्ड जेरी

Tom and Jerry Cartoon उंदीर आणि मांजराची ही ऍनिमेटेड कथा बच्चे कंपनी मध्ये भलतीच लोकप्रिय आहे. सतत त्रास देणारा उंदीर आणि कायम त्याच्या टॉम ऍंन्ड जेरीमागावर असणारी मांजर आणि ह्या दरम्यान घडणा-या गमती-जमती पाहून हसून हसून पुरे वाट होते. ऍनिमेटर्स विल्लियम हन्ना आणि जोजेफ बार्बरा टॉम ऍंड जेरीचे जनक आहेत. त्यांनी एकूण एकशे चौदा भाग लिहीले आहेत. ह्या सिरीजने प्रतिष्ठेचा ऍकॅडेमी पुरस्कार प्राप्त केला आहे. १९४० ते १९५७ पर्यंत चालणारे हे लोकप्रिय कार्टून नंतर काही काळासाठी बंद पडले. वॉट डिस्ने ह्या जगप्रसिध्द कार्टून कंपनीने नंतर ते पुन्हा वितरीत केले. टॉम ऍंड जेरी वर चित्रपटही तयार केला गेला आहे. आता तर त्यांच्या DVD/VCD ही उपलब्ध आहेत. प्रत्येक वेळेला जेरी (उंदीर) शिताफतीने टॉम (मांजर)च्या तडाख्यातून हुशारीने आणि चपळाईने सुटतो. नेटवर टॉम ऍंड जेरीला भेटायचे असल्यास जरुर बघा –
https://www.cartoonnetworkindia.com/show/tom-and-jerry
http://www.tomandjerryonline.com

← कार्टून मुख्यपान