पौष महिन्यात, हिंदूंच्या ‘संक्रांत’ या सणाच्या आदल्या दिवशी, म्हणजे १३ जानेवारीला भोगी हा सण दरवर्षी साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पध्दत आहे. ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे-गाजर- हरभरे- वांगी या सर्वांची मिळून भाजी वगैरे. देवाची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिला तेल, शिकेकाईने नहावयास घालतात. जेवणानंतर विडा, दक्षिणा दिली जाते. अधिक वाचा…
सूर्य एका राशीतून दुस-या राशीत जाणे यालाच ‘संक्रमण’ म्हणतात. मकर राशीमध्ये सूर्य जाणे यालाच ‘मकर संक्रमण ‘ असे म्हणतात. ज्या दिवशी सूर्य धन राशीतून मकर राशीमध्ये जातो त्या संक्रमणाच्या दिवशी दरवर्षी हिंदू लोक ‘संक्रांत’ हा सण साजरा करतात. हा सण पौष महिन्यात येतो. हिंदू लोकांचे सण हे चांद्रवर्षानुसार असल्याने सध्या वापरल्या जाणा-या इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हिंदूंचा सण हा दरवर्षी विशिष्ट तारखेलाच येईल असे नसते. याला एकमेव अपवाद म्हणजे संक्रांत. संक्रांत हा सण प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या १४ तारखेलाच साजरा केला जातो.अधिक वाचा…
प्रत्येक ऋतू बदलतांना हवामानात बदल होत असतो. आणि बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होत असतो. म्हणून हवामानाच्या बदलाबरोबर आपल्याला आपल्या आहारातही बदल करावा लागतो. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे भारतातील एका वर्षात क्रमाने येणारे ऋतू आहेत. आपले आरोग्य चांगले टिकवायचे असेल तर या ऋतूमानानुसार आपला आहार ठेवला पाहिजे आणि आशा तऱ्हेने आहारात सतत बदल करणे फार महत्वाचे आहे. उन्हाळयाचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. वसंत ऋतूमध्ये उन्हाळयाची तीव्रता कमी असते. अधिक वाचा…
केसांत मोती निरनिराळी पदके वापरून केशरचना करण्याची पध्दत आजही आहे. पुर्वी वेणी घातलेल्या केसांत नगाचा वापर केला जाई. या नगात गोंडे फुलांचा संच असून नाग, केवडा, चंद्र, सूर्य, स्वस्तिक या चित्रांची पदके असत. अंबाडा सजविण्यासाठी नगाचा वापर करत. भांगाच्या मध्यभागी, बिंदी, बोर, भांगसर, बिजवरा यांसारखी आभूषणे लावली जात.
आंबोडयातील फुले – ही अंबाडा तसेच वेणी सजवण्यासाठी वापरतात. ही सतराव्या शतकापासून प्रचलित आहेत.
वेणी – ही कोकणपट्टीत जास्त प्रसिध्द आहे.
अधिक वाचा…