आपल्या दैनंदिन व एकसूरी आयुष्यात हास्याची कारंजी उडवा.मराठीवर्ल्डच्या वाचकांनी हास्यकॉर्नर सदरासाठी पाठवलेले साहित्य खालील प्रमाणे.
मामा आणि आई यांच्यामुळे मोठी बहिण शहरात येते आणि वेश्या बनते. मुलीकरवी कुटुंब चालावं ही यामागे अपेक्षा असते. रेणुका दफ्तरदार हिनं ही मोठी बहिण साकारली आहे. धाकटया बहिणीचं (सोनाली कुलकर्णी) लग्न ठरतं. तेव्हा मोठया बहिणीला बोलवायच्या आई विरुध्द असते, पण धाकटीच्या आग्रहामुळे मोठया बहिणीला बोलावलं जातं. पुढे नाटयमय प्रसंगातून आई विरघळते, मामालाही त्याच्या हातून घडलेल्या पापाची जाणीव होते आणि सुखान्त होतो. अधिक वाचा…
१९५३ साली प्र.के.अत्र्यांनी ह्या पुस्तकावर चित्रपट काढायचा ठरवला. चित्रपटाचा नायक श्याम होता माधव वझे आणि आईच्या भूमिकेत त्यावेळच्या उच्च शिक्षित शिक्षिका संध्या पवार अर्थातच वनमाला. चित्रपट जरी १५३ मिनिटांचा असला तरी एकदा पाहिलेल्या ह्या चित्रपटाचा ‘इम्पॅक्ट’ (परिणाम) मात्र आयुष्यभर राहतो……चित्रपटाने १९५३ सालचे राष्ट्रपती सुवर्ण पदक पटकावले. राष्ट्रीय पुरस्कार १९५४ साली सुरू झाले त्यामुळे त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कारही ‘श्यामची आई’ला मिळाला. अधिक वाचा…
‘श्यामची आई’ ह्या अजरामर चित्रकृतीला आज (शुक्रवार, ६.०३.२००९) रोजी छपन्न वर्ष पूर्ण झाली. शुक्रवार, ६ मार्च १९५३ रोजी मुंबईच्या कृष्णा टॉकीज (आताचे ड्रीमलॅन्ड) मध्ये दुपारी ३ वाजता ‘श्यामची आई’चा पहिला खेळ (प्रिमियर) झाला. त्यावेळचे कृष्णा टॉकीज पार्शी माणसाच्या मालकीचे होते. सिनेमाचा पहिला खेळ पंचमातांच्या हस्ते झाला. ह्या पंचमाता होत्या – श्री. आचार्य अत्रे ह्यांच्या मातोश्री, श्री. व्ही.शांताराम ह्यांच्या मातोश्री, श्री. साने गुरुजींच्या मावशी व भगिनी, श्री. माधव वझे ह्यांच्या मातोश्री आणि श्री. माधव अलतेकर ह्यांच्या मातोश्री. अश्या अनोख्या पध्तीने चित्रपटाच्या खेळाला सुरुवात झाली. अधिक वाचा…
‘श्यामची आई’ सारखी अजरामर कलाकृती निर्मिणारे संवेदनाशील लेखक, प्रथितयश शिक्षक, बहुजनांचा तसेच कष्टकऱ्यांचा कळवळा असणारे साने गुरूजी, लहान मूल होऊन मूलांमध्ये रमणारे साने गुरूजी… महाराष्ट्राची माय माऊली अशा सार्थ विशेषणाने गौरविले गेलेले साने गुरूजी…साने गुरूजींनी कितीतरी धडपडणाऱ्या मुलांना भावी आयुष्याचे दिशादर्शन केले; आपणही त्यातलेच एक असाल. या महामानवाचे कार्य आजच्या पिढीला ज्ञात व्हावे, आपल्या जीवनात त्यांच्या विचारांचा उपयोग व्हावा आणि गुरूजींना आदरांजली वाहावी म्हणून ‘साने गुरूजी’ या चित्रपटाची निर्मिती; त्याचबरोबर गुरूजींच्या गाण्याच्या कॅसेटची निर्मिती ‘श्री क्रिएशन्स’ ही संस्था करीत आहे.अधिक वाचा…
सगळ छान आणि सुरळीत सुरू असताना अचानक समीरच्या बाबतीत काही विचित्र घटना घडायला लागल्या. समीर श्रॉफ एकाच वेळी दोन वेगवेगळया ठिकाणी दिसला होता. जयश्रीची मैत्रिण इझारिवाला हिने समीरला ह्या शहरात त्यावेळी बघितलेलं होतं….ज्यावेळी समीर कोचिनला होता. हा इझारिवालाच्या वयाचा दोष मानून सगळयांनीच त्या घटनेकडे दुर्लक्ष केले होते. पण जेव्हा समीर श्रॉफच्या ऑफिसमध्ये काम करणार्या मोहनलाही तसाच अनुभव आला…तेव्हा मात्र सगळयांच्याच मनात प्रश्न उभे राहिले. जेव्हा स्वत: नेहाने हाच अनुभव घेतला …तेव्हा ह्याच प्रश्नाचं रूपातंर रहस्यात झालं. अधिक वाचा…
१३ व्या शतकातील संतश्रेष्ठ स्त्री मुक्ताबाई हिच्या जीवनावर सदर चित्रपट आधारीत आहे. संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ व सोपानदेव या अलौकिक भावंडांची १४ वर्षाची मुक्ता ही धाकटी बहिण आहे. महाराष्ट्राच्या संत मंदियाळीत ज्या स्त्री संत झाल्यात त्यात मुक्ता सर्वात लहान. परंतु बुध्दीने आणि कृतीने खूप मोठी! आई रुक्मिणी व वडिल विठ्ठलपंत यांच्या वेदांत प्रायश्चित्तानंतर आपल्या मोठया भावडांना आईची माया अन् जननिंदेपासून जगण्याचा आधार देणारी मुक्ता ही आदिशक्तीचं रूप होती. अधिक वाचा…
जेजुरीचा खंडोबा हे साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. जेजुरीच्या आसपासचं एक गावं. त्यात सुखानं रहाणारं धोंडीबा, सरजा, मुलगा कृष्णा व मुलगी आक्का असं ग्रामीण कुटुंब. रामदासबुवा हा त्यांचा घरचा मित्र. कृष्णा एकदा इतका आजारी पडतो की, विश्वास नसतानाही नाईलाज म्हणून वाघ्याच्या आग्रहास्तव धोंडीबा खंडोबाला मुरळी वहाण्याचा नवस बोलतो. एका वाघ्या अन् मुरळीचा हा धंदाच असतो की, नवीन कोवळया मुलींना मुरळया करायचं अन मग भुजंगरावासारख्या हैवानाकडून पैसे उकळायचे. बिचाऱ्या आक्काच्या बाबतीत नेमके हेच घडते. अधिक वाचा…
देवराई म्हणजे देवांसाठी राखलेली वनश्री!
स्क्रिझोफ्रेनिया या विचित्र मनस्कतेत वावरणारा शेष (अतुल कुलकर्णी) च्या भोवती देवराईची कथा गुंफली आहे. त्याला कोकणात वाडीजवळच्या देवराईच भयंकर वेड. बहिण सीना(सोनाली कुलकर्णी) व मामेबहिण कल्याणी (देवीका दफ्तरदार) याच्या सोबत तो देवराईतच लहानाचा मोठा झालाय. या कुटूंबाची चाकरी करणारी पार्वती आणि तिचा नवरा शंभू राजेंद्र मोरे ही सारी पात्रे एकमेकांना अनुरूप आहेत. अधिक वाचा…
प्रोफेसर ब्रजेश शास्त्री, अपंग, व्हिल चेअर शिवाय आयुष्याची कल्पनाही न करु शकणारा जागतिक किर्तीचा शास्त्रज्ञ ! ब्रम्हांडाची निर्मिती कधी व कशी झाली तसेच काळाचा प्रवाह कोठून व कधी सुरु झाला? ‘कृष्ण विवर’ या सारखी अवघड समीकरणे सोडवून जागतिक, वैज्ञानिक विकासाची नवी मानव जातीला अर्पण केली ! या विश्वातील अपंग मानवास नवा आव्हानात्मक संदेश पाठविला ‘मन में अगर लगी लगन मुठ्ठी में आ जायें सारा गगन’…! अधिक वाचा…