समुद्रकिनारे

भोगवे समुद्र किनारा

Bhogave भोगव्याच्या समुद्र किना-यापर्यंत चांगला रस्ता आहे. त्यामुळे गाडीने किना-यापर्यंत जाता येते. भोगव्याच्या उत्तरेला देवबाग आहे. मध्ये कर्लीची विस्तीर्ण खाडी पसरलेली आहे. फारसा प्रसिध्द नसल्याने भोगव्याच्या किनाऱ्यावर गोव्यासारखी गर्दी नसते. त्यामुळे गोव्यातील कुठल्याही किना-याची बरोबरी करेल अशा या ठिकाणी सहकुटुंब भेट देऊन नारळीच्या बागेमध्ये जेवून मजेत एक दिवसाची सहल साधता येते. गावातील एक-दोन कुटुंबांमध्ये पूर्व कल्पना दिल्यास जेवण मिळण्याची सोय आहे.

देवबाग गाव- खाडी आणि समुद्राच्या मध्ये लांबच्या लांब गाव, चिंचोळी पट्टी. पावसाळयात समुद्र आणि खाडीचे पाणी एक होते. त्यावेळी येथे राहणा-या लोकांच्या हालाला पारावार नसतो. देवबाग भोगव्याच्या उत्तरेस आणि तारकर्लीच्या दक्षिणेस दक्षिणोत्तर पसरलेली चिंचोळी पट्टी- पूर्वेला कर्ली नदीची खाडी आणि पश्चिमेला अथांग सागर. नारळी पोफळीच्या बागांतून जाणारा रस्ता आणि झाडीत लपलेली घरे. अत्यंत रमणीय ठिकाण. Location Icon

Bhogave Beach भोगवे किनारा (कर्ली नदी समुद्राला मिळते ते ठिकाण)
Bhogave Beach कर्लीची खाडी
Bhogave Beach देवबाग किनारा- कर्ली नदी समुद्राला मिळते ते ठिकाण. खाडीच्या पलिकडे भोगव्याचा किनारा.
Bhogave Beach झाडीमध्ये वसलेले देवबाग गाव- डावीकडे समुद्र व उजवीकडे कर्लीची खाडी यामध्ये वसलेले
Bhogave Beach १८.२ देवबागचा समुद्र किनारा.
Bhogave Beach या किना-यावर असे समुद्रपक्षी विपुल आहेत.

तारकर्ली समुद्रकिनारा

मालवणपासून साधारण १०-११ किलोमीटरवर बसलेले देवबाग म्हणजे खरोखरच देवानेच बसवले असावे असे. कुसुमाग्रजांच्या कवितेचे मूर्तीमंत उदाहरण जणू. मानवाचे ध्येय आणि आसक्ती ही उत्तुंग आहे. समुद्राला मात्र किना-याचे बंधन आहे. प्रत्येक वर्षी पावसाळयात समुद्राचे पाणी सगळे गाव धुवून काढून कर्ली नदीत मिसळते. गावाचे अपरिमित नुकसान होते. पण तरीही वर्षानुवर्षे इथल्या माणसांनी पराभव पत्करला नाही. त्यांची विजीगिषु वृत्ती लोपलेली नाही. Location Icon

Tarkarli Beach तारकर्ली-मालवण मधील समुद्र किनारा
Tarkarli Beach तारकर्लीचे सुरूबन