साहित्य मुख्यपान

 

मराठी भाषा व साहित्याच्या परीक्षा

मराठीवर्ल्ड.कॉम मराठी भाषा व संस्कृती यांच्यासाठी वाहिलेले पोर्टल असल्यामुळे भाषा व साहित्य यांच्या प्रसारासाठी ते कार्यरत आहे. या दृष्टीकोणातून ज्यांना मराठी भाषा नव्याने शिकायची आहे किंवा ज्यांना आपली भाषा सुधारायची आहे व साहित्यिक अभ्यासात रस आहे अशांसाठी मराठी भाषेच्या ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यांची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. ती भाषेच्या अभ्यासकांना खचितच अत्यंत उपयुक्त होईल अशी खात्री आहे.

१) महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे 
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रत्येक वर्षी जानेवारीच्या पहिल्या / दुस-या आठवडयात (शुक्रवार ते रविवार) प्रथमा, प्रवेश, साहित्य-प्राज्ञ व साहित्य विशारद या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांची माहिती खाली दिलेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उपसमितीतर्फे महामंडळांतर्गत साहित्य-संस्थांच्या परीक्षांच्या संदर्भात जी मार्गदर्शक तत्वे सुचविण्यात आली त्यानुसार मराठीच्या परीक्षांचा अभ्यासक्रम निश्चित केला आहे.

परीक्षेचे नाव प्रश्नपत्रिकांची संख्या एकूण गुण कालावधी शुल्क
प्रथमा  १००  एक वर्ष १० रु.
प्रवेश   २०० एक वर्ष २० रु.
साहित्य-प्राज्ञ ३  ३००  एक वर्ष ३० रु.
साहित्य-विशारद ६  ६०० दोन वर्ष ६० रु.
१ ते ३ प्रश्नपत्रिकांसाठी पहिल्या वर्षी ३० रु. शुल्क व
४ ते ६ प्रश्नपत्रिकांसाठी दुस-या वर्षी ३० रु.

प्रवेशासाठी पात्रता

इयत्ता सातवीपासूनच्या कोणाही विद्यार्थ्यास प्रथमा किंवा प्रवेश परीक्षेस बसता येईल. मात्र एकाच वेळी या दोन्ही परीक्षांना बसता येणार नाही.
परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कोणाही व्यक्तीस साहित्य-प्राज्ञ या परीक्षेस बसता येईल. तसेच ज्या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे, आणि वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली आहेत, अशा व्यक्तीस परीक्षेस बसता येईल. मात्र अशा व्यक्तीने वयाच्या अधिकृत दाखल्याची प्रत आवेदनपत्रास जोडली पाहिजे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची साहित्य-प्राज्ञ परीक्षा किंवा उच्च माध्यमिक मंडळाची १२ वीची परीक्षा किंवा शासनमान्य विद्यापीठाची प्रथम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कोणाही व्यक्तीस साहित्य-विशारद या परीक्षेस बसता येईल.
साहित्य-विशारद या परीक्षेस बसायचे असल्यास पूर्व मान्यता घ्यावी लागेल यासाठी विशेष गुणवत्तेची आवश्यकता आहे. पहिल्या व दुस-या वर्षी प्रत्येकी ३ प्रश्नपत्रिका किंवा दुस-या वर्षी एकदम ६ प्रश्नपत्रिका देता येतील.

उत्तीर्णत्व

प्रथमा परीक्षा - ३५ टक्के
प्रवेश परीक्षा - ३५ टक्के (प्रत्येक प्रश्नपत्रिकेत)
साहित्य-प्राज्ञ - ४० टक्के (प्रत्येक प्रश्नपत्रिकेत)
साहित्य-विशारद ४० टक्के (प्रत्येक प्रश्नपत्रिकेत)

श्रेणींचे निकष

४९ टक्क्यांपर्यंत - तृतीय श्रेणी
५० ते ५९ टक्के -  द्वितीय श्रेणी
६० ते ७४ टक्के - प्रथम श्रेणी
७५ आणि त्यापुढील गुण - विशेष गुणवत्ता श्रेणी

पुन: परीक्षार्थींना सवलत

अनुत्तीर्ण उमेदवाराला त्याच परीक्षेस पुन्हा बसता येईल. अशा वेळी ज्या प्रश्नपत्रिकेत ५० किंवा अधिक गुण मिळाले असतील ती प्रश्नपत्रिका न देण्याची त्यास मुभा राहील. मात्र ही सवलत तो विशिष्ट अभ्यासक्रम चालू असेपर्यंतच राहील. अभ्यासक्रम बदललेला अस्ल्यास पुन्हा सर्व प्रश्नपत्रिका द्याव्या लागतील.

प्रवेश-अर्ज व परीक्षा शुल्क

परीक्षा-प्रवेश अर्जाचे (आवेदन-पत्र) छापील नमुने कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळकरस्ता, पुणे ४११०३० यांच्याकडून कार्यालयाच्या वेळेत (रोज सकाळी ९ ते १२, दुपारी ४ ते ८, रविवारी बंद) समक्ष किंवा तीन रुपयांची पोस्टाची तिकिटे पाठवून मागवून घ्यावेत.
आधीच्या वर्षाच्या केंद्र-चालकांनी केंद्र चालू ठेवण्या संबंधीचे पत्र परिषदेकडे त्वरित पाठवावे.
परीक्षा आवेदन-पत्रांची मागणी प्रतिवर्षी २५ ऑक्टोबरच्या आत करावी.
परीक्षा आवेदन-पत्रे परिषदेच्या कार्यालयात पोहोचण्याचा अंतीम दिनांक प्रतिवर्षी २५ नोव्हेंबर असा राहील.
एकदा परीक्षा शुल्क भरले की कोणत्याही कारणास्तव ते परत केले जाणार नाही.
परिक्षा शुल्क रोख किंवा मनी ऑर्डर अथवा डिमांड ड्राफ्टने कार्यवाह, म.सा.परिषद, टिळकरस्ता, पुणे ३० यांच्या नावे पाठवावे.

निर्णय व प्रमाणपत्र
परीक्षांचा निर्णय प्रतिवर्षी सामान्यत: एप्रिलअखेर जाहीर केला जाईल आणि जूनअखेरपर्यंत केंद्राकडे प्रमाणपत्रे रवाना केली जातील. एखाद्या उमेदवाराला प्रमाणपत्र वैयक्तिक पत्त्यावर हवे असेल, तर केंद्राधिका-याचे ओळखपत्र सादर करून समक्ष अथवा १० रु. ची मनिऑर्डर पाठवून स्वीकारता येईल. प्रमाणपत्र गहाळ झाल्यास नव्या प्रतीसाठी १० रु. शुल्क पाठवून सोबत योग्य त्या तपशिलासहित अर्ज जोडावा.

परीक्षांचा अभ्यासक्रम
अभ्यासक्रमात दिलेली पुस्तके ४ वर्षांच्या कालावधीसाठी असतात. ती नंतर बदलतात. १९९७ ते २००० च्या अभ्यासक्रमातील पुस्तके आता बदलतील त्यासाठी त्या पुस्तकांची नावे खाली दिली नाहीत. ती जुलै/ऑगस्ट २००१ ला मिळू शकतील.

प्रथमा परीक्षा ( प्रश्नपत्रिका १ - १०० गुण, वेळ ३ तास )

पाठयपुस्तक - ५० गुण
व्याकरण व लेखन - ५० गुण
लिंग,वचन,शब्दांच्या जाती, दिलेल्या शब्दांवरून दुसरा शब्द बनविणे, 
-हस्व-दीर्घ शब्दांचे निर्दोष लेखन, संधी व त्याचे प्रकार -
३० गुण
घरगुती पत्रलेखन १० गुण
दिलेल्या विषयावर सुमारे १०० शब्दांचा परिच्छेद लिहिणे - १० गुण

संदर्भ पुस्तक - सुगम मराठी व्याकरण व लेखन - मो.रा. बाळंबे 

 

प्रवेश परीक्षा ( प्रश्नपत्रिका १ : गद्यसंग्रह व पद्यसंग्रह - १०० गुण, वेळ ३ तास )

गद्य संग्रह - ५० गुण
पद्य संग्रह - ५० गुण

( प्रश्नपत्रिका २ - व्याकरण, अलंकार, लेखन व भाषांतर - १०० गुण, वेळ ३ तास )

विभक्ती विचार, सामान्यरूप, वाक्य्विचार, वाख्यांचे प्रकार, काळ व अर्थ, सांगितल्याप्रमाणे वाक्यरचना करणे, अनुस्वारासंबंधीचे शुध्दलेखन ३० गुण
यमक,अनुप्रास,श्लेष,उपमा,उत्प्रेक्षा, रूपक, अपन्हुती,दृष्टांत या अलंकारांची सोदाहरण माहिती २० गुण
वाक्प्रचार आणि म्हणी यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग १० गुण
कल्पनाविस्तार १० गुण
मित्रास/मैत्रिणीस पत्र १० गुण
संवाद-लेखन १० गुण
इंग्रजी उता-याचे मराठी भाषांतर (५ वाक्ये) १० गुण

संदर्भ पुस्तके - सुगम मराठी व्याकरण व लेखन - मो. रा. वाळंबे, मराठी लेखनविकास - ना. वि. पाटणकर 

 

साहित्य - प्राज्ञ परीक्षा

 प्रश्नपत्रिका १ - अर्वाचीन मराठी गद्य-पद्य - १०० गुण, वेळ ३ तास )

कादंबरी, कथासंग्रह, एकांकिका-संग्रह व प्रवासवर्णन यांपैकी दोन पुस्तके ३० गुण प्रत्येकी
अनेक कवींच्या प्रातिनिधिक कवितांचा संग्रह किंवा एका कवीचा कवितासंग्रह ४० गुण

( प्रश्नपत्रिका २ - एका ग्रंथकाराचा विशेष परिचय - १०० गुण, वेळ ३ तास )

संबंधित लेखकाच्या वाङमयीन व्यक्तिमत्त्वाची जडण-घडाण, त्याच्या वाङमनिर्मितीचे टप्पे, त्याचे यशापयश, त्याच्या वाङमयीन भूमिकेचे व लेखनशैलीचे विशेष, मराठी साहित्यात त्याने घातलेली मोलाची भर इत्यादी घटकांचा परिचय या प्रश्नपत्रिकेतून अपेक्षित आहे.

( प्रश्नपत्रिका ३ - मराठीचे व्याकरण व लेखन - एकूण गुण १००, वेळ ३ तास )

विभक्तीविचार, आख्यात विचार, प्रयोगविचार, समास, वाक्यरूपंतर  ३० गुण
ओवी, अभंग, भुजंगप्रयात, वसंत तिलका, मालिनी, मंदाक्रांता, शिखरिणी, पृथ्वी, शार्दूलविक्रीडित, दिंडी, आर्या, साकी, पादाकुलक, चंद्रकांत, मुक्तछंद या वृत्तांची सोदाहरण माहिती २० गुण
अनन्वय, व्यतिरेक, सांग रूपक, भ्रांतिमान निदर्श्ना, प्रतीप, अतिशयोक्ती, व्याजोक्ती, स्वभावोक्ती, चेतनगुणा क्ती, सहोक्ती, अन्योक्ती, अर्थांतरन्यास, विरोधाभास व सार या अलंकारांची सोदाहरण माहिती २० गुण
सारांशलेखन / सार्वजनिक पत्रलेखन १० गुण
निबंधलेखन /संवादलेखन २० गुण
 

साहित्य - विशारद
प्रत्येकी १०० गुणांच्या एकूण ६ प्रश्नपत्रिका

(प्रश्नपत्रिका १ - वैचारिक निबंध - एकूण गुण १००, वेळ ३ तास)

(प्रश्नपत्रिका २ - मध्ययुगीन गद्य व पद्य - एकूण गुण १००, वेळ ३ तास )

ज्ञानेश्वरीचा एक अध्याय किंवा संतकवीचे निवडक काव्य किंवा मध्ययुगीन काव्याचा प्रातिनिधिक संग्रह ५० गुण
महानुभाव गद्य किंवा बखरगद्य किंवा संपादित गद्यसंग्रह ५० गुण

(प्रश्नपत्रिका ३ -  एका अर्वाचीन वाङमयप्रकाराचा अभ्यास - एकूण गुण १००, वेळ ३ तास )

या वाङमयप्रकाराची तात्विक चर्चा, वाङमयप्रकाराचे घटक व त्यांचा परस्परसंबंध, वाङमयप्रकाराचे उपप्रकार, तंत्र व शैली ५० गुण
नेमलेल्या वाङमयप्रकाराच्या प्रारंभाची व विकासक्रमाची चर्चा, कालानुसार पडणारे टप्पे, या वाङमयप्रकारातील चढउतार, त्यांची कारणे हा वाङयप्रकार उपयोजिणा-या साहित्यिकांच्या कार्याचे मूल्यमापन ५० गुण

(प्रश्नपत्रिका ४ - भारतीय साहित्यशास्त्राची मूलतत्वे - एकूण गुण १००, वेळ ३ तास)

साहित्यलक्षण, साहित्यप्रयोजन,साहित्यकारण, साहित्याची निर्मितीप्रक्रिया, प्रतिभाव्यापार ३० गुण
अलंकार, रीती, ध्वनी, काव्यगुण, औचित्य इ. सिध्दांताचा परिचय ३० गुण
रससिध्दांत, रसनिर्मिती-प्रक्रिया, रसांचे वर्गीकरण, रसविघ्ने इ. ३० गुण
वर्तमानकालात या सिध्दांतांचे स्थान १० गुण

(प्रश्नपत्रिका ५ - भाषाविज्ञान व व्याकरण - एकूण गुण १००, वेळ ३ तास)

भाषेचे स्वरूप व कार्य, अन्य संज्ञापन-साधने व भाषा, भाषाभ्यासाची अंगे, भाषाभ्यासाच्या पध्दती, भाषेसंबंधीचा जुना व आधुनिक दृष्टिकोण, वागिन्द्रिये - रचना व कार्य, स्वनिम संकल्पना ६० गुण
शब्दांच्या जाती व शब्दांचे विकरण, लिंग-वचन-विभक्ती, आख्यातविचार, प्रयोगविचार, लेखननियम व तत्संबंधी व्याकरणातील वादांची चर्चा ४० गुण

(प्रश्नपत्रिका ६ - उपयोजित मराठी - एकूण गुण १००, वेळ ३ तास)

मराठीचा कार्यालयीन वापर , पारिभाषिक संज्ञा, इंग्रजी किंवा हिंदी उता-याचे मराठीत भाषांतर २० गुण
संस्थांची परिपत्रके, माहितीपत्रके, निवेदनपत्रके तयार करणे, सभावृत्त, संस्था-कार्यवृत्त तयार करणे, मुद्रित शोधन करणे ४० गुण
वृत्तपत्रांसाठी वृत्त व इतर मजकूर सिध्द करणे, नभोवाणी, चित्रवाणी या प्रसारमाध्यमांसाठी लेखन करणे, नियतकालिके, नभोवाणी व चित्रवाणी या माध्यमांसाठी जाहिरातींचे लेखन करणे ४० गुण

पुढे >>

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा