गुदगुल्या

शिक्षक : आफ्रिकेत आढळणार्‍या एका प्राण्याचे नाव सांग?
विद्यार्थी : वाघ
शिक्षक : खूपच छान. आता दुसरा एखादा प्राणी सांग?
विद्यार्थी : दुसरा वाघ


शिक्षक : बादशहा अकबरने कुठपर्यंत राज्य केलं?
विद्यार्थी : पान नंबर १४ ते पान नंबर २५


वडील (मुलाला) : तू मघापासून कोंबडा का झाला आहेस?
मुलगा : बाबा तुम्हीच तर म्हणाला होतात की जे काम शाळेत करशील ते घरात अर्धा तास करत जा.


शिक्षक : तुला एखाद्या प्रसिध्द लढाईची माहिती आहे का?
विद्यार्थी : होय सर
शिक्षक : सांग बरं
विद्यार्थी : आईने घरातल्या गोष्टी बाहेर सांगायला बंदी घातली आहे.


विक्की : बाबा, पटकन् मला दहा रूपये द्या.
गल्लीत एक गरीब माणूस केव्हापासून ओरडतोय.
बाबा : तो काय म्हणतोय?
विक्की : आई…स्क्रीम ……… आई…स्क्रीम


तुझे काय?
पहिला : हा शर्ट छान दिसतोय.
दुसरा : पण माझा नाही.
पहिला : हा कोटही छान दिसतोय.
दुसरा : पण माझा नाही.
पहिला : मग तुझे काय आहे?
दुसरा : लॉन्ड्री…


गुरुजी : औषधांच्या गोळ्यांचे पाकीट 10 गोळ्यांचेच का असते? आणि असे पाकीट काढण्याची पध्दत कधी पासून सुरु झाली?
मण्या : रावणाला डोकेदुखी सुरू झाली तेव्हा पासून…


तीने इंग्लिश स्पिकींगचा कोर्स पूर्ण केला आणि
मला म्हणाली कोणताही प्रश्न विचार मी तो मराठीत ट्रांन्सलेट करून सांगते

मी म्हटल SHAREit ला मराठीत काय म्हणतात ?
ती म्हणाली

वाघ जेवतोय…..


एकदा एका शाळेंत डेप्युटी
शाळा तपासायला आले. एका वर्गांत त्यांनी फळ्यावर
‘NATURE’ अशी अक्षरे लिहिली आणि एका मुलाला विचारले
“हा काय शब्द” आहे?

क्षणाचाही विलंब न लावता मुलगा म्हणाला ” नटुरे”.
त्यानंतर एक एक करून सर्व मुलांना तोच प्रश्न विचारला.
सर्व मुलांनी तेच सांगितले “नटुरे”.

डेप्युटी संतापले. शिक्षकाला म्हणाले, “हा काय प्रकार आहे?”
शिक्षक उत्तरले “पोरं अजून ‘मटुरे’ (mature ) झालेली नाहीत. नंतर सुधारतील.”

डेप्युटी वैतागून सर्वांना घेवून हेड- मास्तरांकडे गेले व त्यांना झालेला किस्सा सांगितला.
त्यावर शांतपणे हेडमास्तर म्हणाले, “जाऊ द्या हो साहेब !!! या गोष्टीचा त्यांच्या ‘फुटुरे’ (future ) वर कांहीच परिणाम होणार नाही”.


पहिला : अरे यार, हा sent message काय प्रकार आहे ?
दुसरा : काढलीस ना लाज, एवढं पण माहीत नाही..
sent message म्हणजे perfume वाला message…


आता मला सांगा यातल कोन वेड आहे ???????

ग्राहक : एक कोलगेट द्या ओ
दुकानदार : कुठली
ग्राहक : pepsodent

– मानसी खानझोडे

बालमित्रांनो, तुम्हीही तुमच्या माहितीतले चुटकुले/किस्से/जोक्स आमच्याकडे पाठवा. सार्‍यांसाठी ते प्रसिध्द करूयात. सारेच जण मज्जा लुटुयात!