अन्न हे पूर्णब्रम्ह मुख्यपान

 

उपवासाचे पदार्थ

 


 

धार्मिक कारणांसाठी उपवास करणे ही भारतीयांची श्रध्दा आहे, प्रथा आहे. महाराष्ट्रात आषाढी आणि कार्तिकी एकादशी, चतुर्थी, महाशिवरात्र यासारख्या निमित्ताने उपवास धरला जातो. कित्येकजण आराध्य देवतेनुसार आठवडयातून एकदा सोमवार, गुरूवार किंवा शनिवार या दिवशी असे वर्षभरही उपवास करीत असतात. रोजच्या जंवणातल्या पदार्थापेक्षा वेगळया वस्तूंपासून बनविलेले पदार्थ उपवासाच्या दिवशी आवडीने खाल्ले जातात. उपवासाचा मूळ हेतू - पोटाला विश्रांती देणे - दूरच राहून 'एकादशी दुप्पट खाशी' अशी वस्तूस्थिती असते. उपवासाचे पदार्थच तितके चविष्ट असतात हे त्यामागचे खरे कारण त्यामुळे उपवास नसतानासुध्दा साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा यासारखे पदार्थ हल्ली हॉटेलांमधूनही खूपच लोकप्रिय झालेले आहेत. बटाटा, शेंगदाणे, रताळी, राजगिरा, वरई वगैरे वापरून केलेले खास महाराष्ट्रीय उपवासाचे पदार्थ व त्याच्या पाककृती या विभागात दिलेल्या आहेत.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF