नदी/तलाव

कृष्णा नदी

krishna river वाईजवळ महाबळेश्वर येथे कृष्णा नदी उगम पाऊन आग्नेय दिशेने सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून वाहत जाते. पश्चिमेस सह्याद्री पर्वत, ईशन्येस शंभू महादेव डोंगररांगा कृष्णेचे खोरे मर्यादित करीत असून तिला उजव्या काठाने कोयना, वारणा, पंचगंगा, दुधगंगा व वेदगंगा तर डाव्या काठाने फक्त येरळा नदी येउन मिळते.

महाराष्ट्र पठारावरून वाहणा-या गोदावरी नदीच्या खालोखाल महत्त्वाची अशी कृष्णा ही नदी आहे. ही नदी दक्खनच्या पठारावर पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहून पुढे बंगालच्या उपसागरास मिळते.

ऐतिहासिक, धार्मिक आख्यायिका : स्कांद्पुराणात नदीचे महातम्य ६० अध्यायात वर्णन केलेले आहे. त्यामध्ये वाई (वैराजक्षेत्र) लिंब-गोवे, माहुली, कराड, नरसोबाची वाडी (अमरेश्वर) औदुंबर (भुवनेश्वरी) इत्यादी तीर्थक्षेत्रांचे वर्णन केलेले आहे.

इ . स. १२१५ मध्ये यादव राजांनी बांधलेल्या महाबळेश्वरच्या हेमाडपंथी शिवमंदिराजवळ चंद्रराव मोरे यांनी पंचगंगा मंदिर बांधले त्यात कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या ५ नद्या उगम पावल्या आहेत असा सर्व सामान्य भाविकांचा समाज असतो. दक्षिण भारतातील इतर काही ठिकाणांप्रमाणेच कृष्णेच्या खो-यात ही अश्मयुगीन अवशेष आढळून आले आहेत.

नदीप्रणालीचे क्षेत्र : कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला १२२० मीटर उंचीवर झालेला आहे. ‘क्षेत्र महाबळेश्वर’ येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या पाच नद्यांची उगम क्षेत्रे पहावयास मिळतात . कृष्णा नदीच्या उगमाच्या ठिकाणापासून पश्चिमेस ६५ किमी अंतरावर अरबी समुद्र आहे. कृष्णा नदीचा उतार सुरुवातीस दक्षिणेस आहे. नंतर नदीचा प्रवाह पूर्वेस व आग्नेयेस होतो. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून कृष्णा नदी वाहत जाते व शेवटी त्रिभुज प्रदेश निर्माण होऊन मच्छली पट्टनमजवळ बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते. कृष्णा नदीची एकूण लांबी १२९० किमी असून नदीप्रणालीचे क्षेत्र २८,४२० दशलक्ष घनमीटर आहे.

राजकीय क्षेत्र : कृष्णा नदीच्या खो-यात सातारा (भीमा खो-याचे खंडाला, फलटण व मान तालुके वगळून) सांगली (जात व खनपुरचा पूर्व भाग वगळून) व संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो.

पश्चिमेस सह्याद्री पर्वत व पूर्वेस शंभू महादेव डोंगरांच्या रांगा दरम्यान कृष्णा नदी वाहते. तसेच सर्वसाधारणपणे नदी प्रवाहाची दिशा उत्तर दक्षिण असून ती सह्याद्री पर्वतास ब-याच अंशी महाराष्ट्रात समांतर आहे. महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खो-यास अप्पर कृष्णा खोरे असे म्हटले जाते . कृष्णा नदीच्या उगमाच्या क्षेत्रात महाबळेश्वरच्या परिसरात पावसाचे प्रमाण ५००० ते ६२५० से. मि. आहे.

कृष्णा नदीचा प्रवाह मार्ग : कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे झाल्यावर ती आग्नेयेस वाहू लागते. त्यानंतर कृष्णा नदी वाई क्षेत्रास पावन करून सातारा जिल्ह्यात माहुली येथे येते . येथे कृष्णा व वेण्णा नद्यांचा संगम होतो. नंतर कृष्णा नदी दक्षिण वाहिनी होते. पूर्वेकडील सुळक्यांना वळसा घालून माहुली पासून सुमारे ५० किमी अंतरावर कराड येथे कृष्णा व कोयनेचा प्रीतीसंगम होतो . सातारा जिल्ह्यात या नद्यांव्यातिरिक्त कुडली , उरमोडी व तारळी या नद्या वाहतात . वारणा नदी पूर्व व पुढे आग्नेय दिशेने १३० किमी वाहत जाते. सांगली जवळ उजव्या किना-याने कृष्णेस मिळते . सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणारी पंचगंगा नदी कुरुन्द वाड जवळ कृष्णा नदीस मिळते तेथून जवळच श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी) येथे दत्ताचे जागृत देवस्थान आहे, तेथे जाते . कोल्हापूर जिल्ह्यात दक्षिण भागातून वाहणा-या दूधगंगा व वेदगंगा या नद्या ईशान्येकडे वाहत जाऊन त्यांचा संगम होतो व कुरुन्द वाडच्या पुढे १५ किमी अंतरावर कृष्णा नदीस हा संयुक्त प्रवाह येऊन मिळतो . कोल्हापूर जिल्ह्याची उत्तर सरहद्द वारणा नदी प्रवाहाने निश्चित होते.

या नदीवरील शहरे : महाबळेश्वर ,सातारा, ,कोल्हापूर, किर्लोस्करवाडी,कराड ,वाई,सांगली, मिरज, वाळवा, इस्लामपुर

गावे : अथणी, कुरुंदवाड, चिक्कोडी, धन्गाव , धोम, नृसिहवाडी (नरसोबाची वाडी) पसरणी, बहे, माहुली, मेणवली, रायबाग

उपनद्या
उरमोडी नदी कृष्णा नदिस काशीळ येथे मिळते
कोयना नदी कृष्णा नदिस– कराडयेथे मिळते
तरली कृष्णा नदिस संगमेश्वरयेथे मिळते
पंचगंगा कृष्णा नदिस नरसोबाची वाडी (सांगली) येथे मिळते
भीमा कृष्णा नदिस हरिपूर येथे मिळते
वेण्णा कृष्णा नदिस माहुली येथे मिळते.

* समर्थ रामदासांनी कृष्ण नदीची आरती लिहिली आहे. Location Icon