वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी) - बुधवार २६/१०/२०१६
वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पध्दत आहे. अधिक वाचा...

 

धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) - शुक्रवार २८/१०/२०१६
धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. व्यापारी, दुकानदार लोक ह्या दिवशी या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. ह्या दिवशी दिवा अंगणात मुद्दाम दक्षिणेकडे तोंड करून ठेवतात. ह्याला 'यमदीपदान' असे म्हणतात. अधिक वाचा...

 

नरक चतुर्दशी (आश्विन वद्य चतुर्दशी) - शनिवार २९/१०/२०१६
आश्विन वद्य चतुर्दशी या दिवशी नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले. ह्या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वजण स्नान करतात. स्नानाच्या वेळी उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरतात. सूर्योदयापूर्वीच्या ह्या स्नानाला अभ्यंगस्नान असे म्हणतात. ह्या दिवशी जो कोणी अभ्यंगस्नान करणार नाही तो नरकात जातो अशी समजूत आहे. अधिक वाचा...

 

लक्ष्मीपूजन (आश्विन वद्य अमावास्या) - रविवार ३०/१०/२०१६
व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रूपया, मोत्यांचे दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. जिथे स्वच्छता असते त्या ठिकाणीच लक्ष्मी वास करते अशी धारणा असल्याने पुष्कळ ठिकाणी लोक या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरूवात करतात. अधिक वाचा...

लक्ष्मीपूजन मुहूर्त : सायं ०६.०४ ते रात्री ०८.३६

 

पाडवा (कार्तिक शुध्द प्रतिपदा) - सोमवार ३१/१०/२०१६
या दिवशी विक्रम संवत सुरू होते. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला तबकांत ओवाळणी घालतो. अधिक वाचा...

 

भाऊबीज-यमद्वितीया (कार्तिक शुध्द द्वितीया) - मंगळवार ०१/११/२०१६
या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते अशी पौराणिक कथा आहे. म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी ज्याला मरण येईल त्याला मोक्ष मिळतो असे म्हणतात. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण साजरा करतात. अधिक वाचा......


 
 
 

व्यवस्थापन तणावाचे
यमाने लाच घेतली असती तर लोकांनी काय काय केलं असत. आपला शेवट माहित असूनही लोक आयुष्यभर पैसा, नाव, सन्मान कमवण्याच्या मागे लागतात. काहींचा तर अगदी अट्टाहास असतो. यम लाच घेत नाही हेच यांच्यासाठी दुर्दैव! म्हणजे आयुष्यात काही मिळवायचंच नाही असं नाही; पण आपल्याला आपल्या मर्यादा समजणे उचित ठरते. अति हव्यासाच्या नादात स्वास्थ्य गमवून हे लोक तणावाला निमंत्रण देतात. अधिक वाचा...

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF