सेवासुविधा

जगभर विखुरलेल्या मराठी संस्थांचे पत्ते, मराठी पुस्तके, मराठी भाषेसंबंधीच्या काही सेवा उदाहरणार्थ भाषांतरसेवा, भाषांतराचे शिक्षण देणारा अभ्यासक्रम, मराठी भाषेच्या विविध परिक्षांची माहिती इत्यादींसाठी उघडलेले हे खास दालन.

सुविचार

 • पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ (गोंदवलेकर महाराज)
 • दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही.
 • त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे. (महात्मा गांधी)
 • युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.
 • जगात काही अजरामर नाही तुमच्या चिंतासुध्दा!
 • जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते.
 • लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.
 • आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही.
 • सत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते.
 • माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.
 • दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वत: प्रज्वलीत होऊन दुसयाला प्रजलीत करते.
 • आयुष्यात निश्चित काही मिळवावयाचे असल्यास साहस असावयास पाहिजे.
 • सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे संस्काराचा झरा !
 • उगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.
 • जिथे मोल जाणत नाही तिथे शब्द टाकू नये.
 • संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.
 • ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.
 • शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.
 • कलीयुग कलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा!
 • मृत्यु नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामुळे मन वैराग्याकडे वळते.
 • अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दु:ख आहे.
 • चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.
 • काजव्याला वाटते जग आपल्याच लुकलुकण्यामुळे उजळले आहे.
 • कर्तव्यदक्ष असावे पण कर्मठ नसावे.
 • उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.
 • कृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे.
 • पवित्र असावे पण पतित होऊ नये.
 • त्याग करावा पण ताठा नसावा.
 • स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.
 • आत्मविश्वास असावा पण अंहकार नसावा.
 • स्वतंत्र असावे पण स्वैर नसावे.
 • घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.
 • माणसाचे प्रेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.
 • सुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे निसर्गावर, नियतीवर, परमेश्वरावर कोणावर तरी विश्वास ठेवा!
 • मानवी संबंध धावणाया आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात…ते असतात औदुबंराच्या आडव्यातिडव्या पाय वाटासारखे.
 • श्रध्दा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रध्दा ठेवल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही.
 • ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते.
 • पाण्याचा एक थेंब महत्त्वाचा नसेल पण ह्या थेंबाची संततधार जर दगडावर पडली तर ती धार दगडाला विंधते.
 • श्रध्दावान, बुध्दीवान, कर्तृत्ववान व ऐश्वर्यवान माणसाची ती कोठेही गेली तरी हार्दिक स्वागत होते. (गौतम बुध्द)
 • विचारांचा चिराग झाला तर आचार आंधळा बनेल. (विनोबा भावे)
 • प्रसंगावधान महत्त्वाचे.
 • जीवन क्षणभंगूर आहे आणि कडूही आहे असे सगळेच सांगत आले पण त्याचा प्रत्येक क्षण अडुळशाच्या फुलासारखा देठात मधाने भरलेला असतो.
 • कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे. पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरी लागते. (महात्मा गांधी)
 • जीवन ही आश्चर्याची श्रृंखला असते. आज आपल्याला उद्याचा रागरंग कधीच कळत नाही. (इमर्सन)
 • सुसंस्कृता अंगीकारण्यास काही द्यावे लागत नाही. पण तिच्यामुळे बरेच काही प्राप्त होते. (लेडी मॉटेज)
 • समृध्दता हे एक जगण्याचे साधन आहे, त्याची पूजा करून दैवत बनायचे नसते.
 • पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत आणि सुखी असतो.
 • यशस्वी व्हायचे असेल तर कल्पना नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीच मदत करतात.
 • हि-याहूनही ‘ज्ञान’ अधिक मौल्यवान आहे.
 • आपले प्रत्येक कृत्य हे आयुष्यातले शेवटचे कृत्य आहे असे समजून वागत जा !
 • मनुष्याला आपल्या दारिद्रयाची लाज वाटता कामा नये, लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणाची.
 • दुस-यांनी तुमच्याशी चांगले वागावे असे वाटत असल्यास आपणही त्यांच्याशी तसेच वागले पाहिजे.
 • मार्गातील अनेक अडचणी बाजूला सारून, जो पुढे पाऊल टाकतो त्यालाच यश मिळते. अलीकडच्या तीरावर बसून जो नुसता संकल्प करतो त्याला यश मिळत नाही.
 • मन अतिशय सुंदर आहे (असते) त्याला प्रसन्न ठेवयाशिवाय आपल्याला चालना येत नाही.
 • कष्टाने पैसा मिळवावा.
 • सततच्या वापराने जिची धार वाढतच जाते अशी एकमेव सुरी म्हणजेच जीभ.
 • स्वत:साठी जे करू ते स्वत:बरोबरच संपते.
 • शस्त्र हे धारण करणा-यालाही घातकच असते.
 • देण्याची पात्रता जो कमावतो त्यालाच घेण्याचा अधिकार असतो.
 • नव्या बादलीतून पाणी तर गळत नाही ना, याची खात्री होईपर्यंत जुनी बादली फेकून देऊ नये.
 • स्वप्ने प्रत्यक्षात यायला हवी असतील तर झोपून राहू नका.
 • जास्त मिळवायचे असेल तर मुळात अपेक्षा कमी मिळविण्याची ठेवा.
 • ह्दयाची श्रीमंती नसेल तर कुबेरही भिकारडाच राहतो.
 • कोणत्याही स्थितीत शांत आणि संयमी राहण्याची ताकद हेच सर्वोच्च सामर्थ्य.
 • काळानुसार न बदलणारे शेवटी विनाश ओढवून घेतात.
 • अयोग्य माणसा बरोबर आनंद करण्यापेक्षा योग्य माणसाबरोबर दु:खात राहणे बेहत्तर.
 • झोप आली असतांना जो झोपी जात नाही आणि झोप येत असतांना जो जागा राहतो असा मनुष्य, हा भूतलावर एक मात्र प्राणी आहे.
 • जीवन सुखी होण्यासाठी ज्ञान, कर्म व भक्ती यांचा समन्वय साधला गेला पाहिजे.
 • शांतता टिकविण्याचे सामर्थ्य नसेल तर तो नेता होऊ शकणार नाहीत (महात्मा गांधी)
 • समाज, देश व जगातील सर्वात जटील समस्यांचे एकमात्र निरसन म्हणजे चारित्र्य.
 • शांतता बाहेर सापडणे फार कठीण आहे कारण ती आपल्या आतच दडलेली असावी.
 • अडचणी आल्याशिवाय खरा मित्र कोण ते कळत नाही.
 • राग आणि सहनशीलता हे योग्य समंजसपणाचे जुळे शत्रू आहेत.
 • आपण सुस्वभावी आणि प्रेमळ असल्यास आपोआपच प्रेम मिळते.
 • मान मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आधी तो देणे होय.
 • व्यक्तिच्या मनात वसत असलेला सलोखा गुण्यागोंविदाने राहणा-या समाजाला प्रतिबिंबीत करीत असतो.
 • सर्वकाही आनंदीवृत्तीने केल्यास करायला कठीण असे कोणतेच काम असणार नाही.
 • चिडणे हा विरोधावर मात करण्याचा मार्ग नव्हे तर संयम आणि निराशेने तुमच्यावर मात केल्याचे लक्षण आहे.
 • कोणतीही बिकट परिस्थिती आली तरी धीर सोडता कामा नये.
 • गुणवत्तेच्या दारी पोहचण्याआधी घाम गाळला पाहिजे हेच उत्तम ध्येय ठेवावे.
 • प्रेमळ व सत्य बोलण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही.