साहित्य संमेलन

९४वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

marathi-sahitya-sammelan दिनांक : शुक्रवार, शनिवार, रविवार, ०३, ०४, ०५ डिसेंबर २०२१
स्थळ : कविवर्य कुसुमाग्रजनगरी, मुंबई एज्युकेशन ट्रस्ट, नाशिक कॅम्पस, भुजबळ नॉलेज सिटी, आडगांव, नाशिक – ४२२२०७

संमेलनाचे अध्यक्ष : प्रसिध्द खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर

स्वागताध्यक्ष : नाशिकचे पालकमंत्री मा. ना. छगनरावजी भुजबळ

नाशिकच्या संमेलनात होणारे विविध कार्यक्रमांचे वेळापत्रक ≫

विश्वसेतू २००५, ‘NRI मराठी साहित्य संमेलन’ अधिवेशन वृत्तांत

अधिवेशन वृत्तांत
अवाहन

विश्वसेतू २००५, ‘NRI मराठी साहित्य संमेलन’ अधिवेशन वृत्तांत
विश्वसेतू या संस्थेचे तिसरे अधिवेशन / स्नेहसंमेलन
१७ आणि १८ डिसेंबर २००५ ला मुंबई येथे होणार आहे.
मराठी माणसाला साद घालणारी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणारे मराठीवर्ल्ड.कॉम आपल्याकरता ह्या सोहोळयाच्या ताज्या घडामोडी आणि वृत्तांत उपलब्ध करून देत आहे

विश्वसेतू २००५ अवाहन
विश्वसेतू – साहित्य संस्कृती विशेषांक

विश्वसेतू या संस्थेचे तिसरे अधिवेशन / स्नेहसंमेलन १७ आणि १८ डिसेंबर २००५ ला मुंबई येथे होणार आहे. विश्वसेतू ही संस्था पुण्यात २००२ मध्ये स्थापन झाली. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट अनिवासी भारतीय आणि भारत देश यामधला सांस्कृतिक आणि सामाजिक दुवा जागता आणि वाढता ठेवण हा आहे. अनिवासी भारतीयांनी भारताबाहेर राहूनही भारताच्या विकासासाठी वेळोवेळी मदत आणि सहकार्य दिलेले आहे. दोन दिवसाच्या ह्या स्नेहसंमेलनात आपल्या मधल्या ह्या नात्याला उजाळा दिला जाणार आहे.

परिसंवाद, चर्चासत्रे, करमणूक अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांचा अंतर्भाव ह्यात असेल. त्यातला एक दिवस संपूर्णपणे NRI मराठी साहित्य सम्मेलनासाठी राखून ठेवण्यात येईल. सम्मेलनाच्या उरलेल्या काळात संगीत, नृत्य आणि कला या क्षेत्रात NRI मंडळींच्या योगदानासंबधित विषयावर चर्चासत्रे असतील. पुढल्या काही महिन्यांत सम्मेलनाच्या कार्यक्रमांची रुपरेषा ठरवली जाईल. या सम्मेलनासाठी तुमच्या सुचना, तुमचे सहकार्य आणि सगळयात महत्त्वाचे म्हणजे तुमचा सहभाग ह्यांची अपेक्षा आहे.

या सम्मेलनाच्या निमित्ताने एक स्मरणिका काढण्यात येईल. ह्या स्मरणिकेसाठी काही साहित्य पाठवायचे असल्यास ते १५ ऑक्टोबर २००५ पूर्वी पाठवावे. संमेलनाचे विचार सूत्र आहे. ‘सेतू संस्कृतीचा बांधू या अंतरी!’ आपले साहित्य या विचार सूत्राशी मिळते जुळते असावे. ज्या NRI मराठी लेखकांनी पुस्तक लेखन केले असेल त्यांनी आपापल्या पुस्तकांची नावे प्रकाशकाच्या नावासह आमच्याकडे पाठवावीत. १५ ऑक्टोबर २००५ पूर्वी हाती आलेल्या सर्व पुस्तकांची नावे वरील यादीत समाविष्ट करण्यात येतील.

देशोदेशी विखूरलेली माणसं जेव्हा समान सूत्रामुळे एकत्र येतात तेव्हा दशदिशांमधले अंतर गळून पडते. ‘जेथे जातो तेथे माझी भावंड आहेत.’ असे म्हणत भेटीगाठीचे मनसुबे रचतो. ह्या ऋणानुबंधाच्या नात्याला उजाळा देणारे हे संमेलन आणि त्याची क्षणचित्रे रेखाटणारी ही स्मरणिका.

साहित्य पाठविण्याचा पत्ता
Sandhya Karnik
34645 Winslow Terrace
Fremont, CA
USA 94555

विशेष सवलतीच्या नोंदणी शुल्कासाठी ३१ ऑक्टोबर
२००५ पूर्वी नोंदणी आवश्यक. अधिक माहिती आणि नोंदणीपत्रकासाठी संपर्क
वेबसाईट – www.setuonline.in
ईमेल – wani@math.ucalgary.ca
जगन्नाथ वाणी (४०३) २८८-००४८