खेळाडू


हॉकी उस्ताद ध्यानचंद सिंग

dhyanchand हॉकी म्हटले की मेजर ध्यानचंद हे नाव सर्वात प्रथम डोळ्यांसमोर येते. त्यांचे शिक्षण फक्त ६ वी पर्यंतच.

हरणा-या ०-२ अशा संघातर्फे खेळत ४ गोल करत संघाला जिंकवणा-या ध्यानचंदला १६ व्या वर्षीच सैन्यात शिपाई म्हणून भरती होण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय पातळीवरही अगदी शेवटच्या ४ मिनिटात ३ गोल करत ०-२ च्या पिचाडीवरच्या संघास विजयश्री मिळवून दिल्यामुळे त्यांना भारतीय संघातून खेळण्यासाठी निवडण्यात आले. १९२६ च्या नुझीलंड दौ-यात एकूण २१ सामने खेळणा-या भारतीय संघातर्फे १९२ गोल झाले त्यातील १०० गोल एकट्या ध्यानचंद यांचे होते. १९२८ साली झालेल्या ऑल्मपिक हॉकीत भारत अजिंक्य ठरला. स्पर्धेच्या पाच सामन्यात भारतावर एकही गोल झाला नव्हता. उलट भारताने २९ गोल केले होते. या स्पर्धेचा हिरो होता ध्यानचंद.

१९२८ च्या ऑमस्टरडॅम ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम सामन्यात नॅदरलेंड विरुद्ध ३-० अशा जिंकलेल्या सामन्यात, ३ पैकी दोन गोल ध्यानचंद होते. १९३२ च्या लॉस एन्जलीस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेस तर २३ – १ अशा फरकाने भारताने हरवले. हा उच्चांक २००३ पर्यंत अबाधित होता. त्यातील ध्यानचंदने ८ गोल केलेले होते. हंगेरी विरुद्ध ४-०, अमेरिका ७-०, जपान ९-० असा प्रवास करत फ्रान्स विरुद्ध १०-० असा जिंकला तर जर्मनी विरुद्ध ८-१ असा जिंकल. हिटरने त्यांच्या सैन्यात वरच्या हुद्द्यावर दिलेली नोकरी त्यांनी स्वाभिमानाने आणि देशप्रेमामुळे नाकारली.

ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप. ध्यानचंद यांना १९५६ साली पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले. आज ते हयात नाही पण त्यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट हा भारतात खेल दिन ( National Sport Day ) म्हणून साजरा होतो.