हमखास चुकणारे शब्द

शिर-शीर
-हस्वऐवजी दीर्घ उच्चार केल्यास शब्दाचा अर्थ कसा बदलतो हे या उदाहरणावरून दिसन येईल. शिर म्हणजे डोके, शीर म्हणजे रक्तवाहिनी. या शब्दाचा वाक्यात वापर करताना त्या वाक्याचा अर्थ लक्षात घेतल्यास शब्द लिहिताना अडचण येणार नाही.

मौंजीबंधन मनस्ताप अनिर्वचनीय दुष्कृत्य मूर्च्छा जितेंद्रिय महीपाल स्वादुपिंड स्थितिस्थापक शालिनी षड्रिपू गुंजारव षोडशोपचार विजिगीषा भित्तिचित्र भीकबाळी मीनाक्षी धीरोदात्त नीरद संचित पाणिग्रहण माणुसकी शिरस्त्राण अतिथी भानूदय नीरज हळूहळू अमानुष भ्रमिष्ट अस्थिपंजर अत्युच्च टिपूर योगिराज गांभीर्य उखळणी कित्येक बुध्दिबळ जीर्णोध्दार किमती ह्रषीकेश सहायक गुरुत्व वाड्मय प्राणिसंग्रहालय गरिबी परिसर थालीपीठ गृहीत गिरीश मूल्य स्वीकार आजीव स्फुट आधिक्य आगंतुक सर्वेक्षण फलित प्रातिनिधिक पूर्वपीठिका औदासीन्य पौर्णिमा क्षुद्र सेंद्रिय ईश्वर सक्रिय ज्येष्ठ पृथक्करण आविष्कार क्रीडा सह्याद्री षष्टयब्दीपूर्ती श्वासोच्छ्वास हुशार पीतांबर विषाद आनुषंगिक क्लृप्ती पीयूष नि:स्पृह कूपमंडूक उत्स्फूर्त दुढ्ढाचार्य नावीन्य शिथिल अजित जीवित कर्कश उद्ध्वस्त शिशिर रवींद्र ध्रुव विनीत निगडित हिरा आणि हीरक हाहाकार धूमकेतू प्रथितयश घनश्याम पाश्चिमात्य उपाहार निर्भर्त्सना शिर आणि शीर शारीरिक सीमोल्लंघन सुज्ञ ऊर्मी कर्तृत्व प्रदक्षिणा आमिष शुध्द अहल्या दीक्षा अरिष्ट अनिल नूपुर सूची आकस्मिक पीछेहाट क्षणभंगुर भीष्मप्रतिज्ञा यथास्थित सांप्रदायिक निरूपण पापभीरू प्रसिध्दिपराङ्मुख अनभिज्ञ शून्य अग्रिम प्रीतिसंगम योगिराज संकीर्ण रहित सूर्योदय शिलालेख प्रफुल्ल आदरणीय मच्छीमारी ऋषितुल्य तोशीस तकवा समाईक मृदंग मुकुल विश्वसनीय रूढी आख्यायिका कूर्म निषेधार्ह अतीत वैध, अवैध दृष्टिक्षेप धीरोदात्त दृढमूल मधुसूदन रामानुज कंदील नूतनीकरण पुनर्जन्म मुहूर्त मिष्टान्न पुरुषोत्तम दीपावली सुसंबध्द अपूर्वाई अध्याह्रत अक्षता अगत्य विचलित प्राप्तिकर मूलभूत नीलिमा छळणूक विश्वसनीय सुषिर वैचित्र्य पुनर्वसन अंकुश क्षत्रिय आरूढ ज्येष्ठ सामूहिक नीतिवंत हानिकारक विहित द्रविड स्थिर अखंडित विस्तीर्ण संन्यासी अनावृत रूढी शत्रुघ्न जागरूकता एकाहत्तर देदीप्यमान क्रांतिकारक हरिभक्तिपरायण तपश्चर्या क्लेश भागीरथी लघुतम प्रीत्यर्थ प्रगतिशील मयूरेश्वर प्रथितयश घनश्याम मूर्तिकार गौरीनंदन आत्मीयता आस्था बहुश्रुत आद्याक्षर गृहस्थ अधीक्षक अलीकडे व पलीकडे सद्गुण

ध्वनिफीत ऋजू राष्ट्रीयीकरण – राष्ट्रीकरण सीमित साहजिक तब्येत उष्ण दूतावास आगाऊ संचालनालय पूर्वग्रहदूषित नागरिक कोटयधीश आतुर प्रतीक हरिकीर्तन बहि:स्थ भ्रातृभाव पीठासीन विश्लेषण किल्मिष उपजीविका दत्तात्रेय कुतूहल सरस्वतीवीणा बधिर हिंस्र सचिव त्र्यंबक कीटक सदृश मुष्टियुध्द प्रावीण्य अल्पसंख्याक नदीतीर तत्काळ अनिष्ट दीर्घ निर्भीड मलिन ऊर्ध्व व्यावसायिक गिरिजा अक्रीत सच्छील भूकंप शोषण त्वरित वाहन, वाहतूक मनीषा प्रदूषण निरीक्षण ज्योत्स्ना असुर अपर बक्षीस मीमांसा मंदिर परिणती रुपे आणि रूपे अपरिमित शुश्रूषा शेषशायी आग्नेय उच्छृंखल मध्यस्थ पुन:प्रसारण द्वितीया पुनरवलोकन पारंपरिक मथितार्थ खुशमस्क-या इत्थंभूत अनसूया सौहार्द वैशिष्टय टीका विदुर माहात्म्य सहानुभूती दुरवस्था उर्वरित नियमित सुवाच्य कोजागरी शब्द सहस्र शीला आणि शिला आबालवृध्द परीक्षा भीती सदसद्विवेक आश्विन नैऋर्त्य वाल्मीकी सूत आणि सुत.

हमखास चुकणारे शब्द
मराठी लिहिताना ऱ्हस्व-दीर्घाच्या चुकांबरोबरच आपण अनेक शब्दही चुकीने उच्चारत असतो, आणि म्हणूनच चुकीचे लिहीतही असतो. या विभागात नेहमीच्या वापरातील बहुतांशी चुकीच्या पध्दतीने लिहिले जाणारे शब्द दिलेले आहेत. इंग्रजी भाषेत often misspellt words ची यादी दिलेली असते. त्याचधर्तीवर मराठीतील हा उपक्रम आहे. या सदरात जे शब्द चुकीचे लिहिले जातात त्या शब्दांची व्युत्पत्तीही सोबत दिलेली आहे व नक्की चूक कुठे होते हे अत्यंत सोप्या, तरीही रंजक पध्दतीने समजावून सांगितलेले आहे. मराठी भाषिकांच्या दृष्टीने हा विभाग फारच उपयुक्त आहे. शुध्दलेखनाचे सर्व नियम वाचणे खूप वेळ खाणारे व तसे रुक्ष काम आहे. अशावेळी निदान या सदरात दिलेल्या चुका जरी टाळल्या तरी आपले लेखन पुष्कळ शुध्द होईल, तसेच भाषा विषयात ज्यांना रस आहे त्याची करमणूकही होईल. या कारणासाठी येथे त्या शब्दांचे संकलन दिलेले आहे. ह्यातील माहिती दैनिक ‘सकाळ’ या मराठी वृत्तपत्राच्या सौजन्याने दिलेली आहे.

काना मात्रेच्या फरकामुळे, अक्षरांच्या बदलामुळे शब्दांच्या अर्थामध्ये केवढा मोठा बदल होतो!

– सकाळच्या सौजन्याने