१. जगन्नाथ पुरी (ओरीसा) येथील सूर्योदय : सूर्य किरणे व त्यांचे रंग ह्यावरून ग्रहस्थितीचे संकेत मिळतात. लाल रंग- मंगळ व सूर्य यामधील अंतराचा निर्देशक आहे. सूर्यापुढे मंगळ असता पाऊस पडत नाही. पंरतु त्या दोन्ही ग्रहावर गुरू, शनि दोन्ही किंवा पैकी एकाची दृष्टी असल्यास पाऊस पडतो. ढग – प्रकार – स्तरीय मेघ, पावसाच्या आगमनाची तसेच कार्तिक ते चैत्रा ह्या काळात मेघ धारणेचे लक्षण हे रब्बी हंगामासाठी उपयुक्त असल्याचे दर्शविते. |
|
२. अकोला – सायंकाळ : साध्रिप्रकाश वेळ निळे आकाश, काळे पांढरे ढग, ढंगाच्या विविध छटा व ढग एका मागून एक येत असतांना. |
|
३. कावारवाडी :दोन दिवसांच्या यज्ञानंतर जमा झालेले ढग. निम्नस्तरीय वर्षा. मेघ काळे, पांढरे पिवळी, मिश्र छटा असलेले. | |
४. नीरा नरसिंहपूर : निळया ढगांचे मागे लपलेले पांढरे ढग. पाठीमागे निळे आकाश. हे ढग साधारणत: १० ते १२ कि.मी. उंचीवर आढळतात. उशीरा परंतु दीर्घ वर्षा करतात. | |
५. परावाडी :अस्तंगत सूर्यानंतर – निम्नस्तरीय काळे मेघ व उंच आकाशात क्षितीजाजवळ गडद निळे ढग. आकाशाच्या पार्श्वभूमीवर मनमोहून घेतात. ह्या स्थितीत पाऊस ३ ते ४ महिन्यांनी संभवतो. |
|
६. कासारवाडी : मेघ धारण झाल्याचे घोतक – सूर्यास्ताला जमिनीजवळ (२ ते ३ कि.मी.वर आकाशात) काळे ढग. क्षितीजावर, सूर्य अस्तास जातांना वर लाल, काळे, निळे ढग. नयन मनोहर दृश्य. मन प्रसन्न होत राहते. |
|
७. इंद्र धनुष्य :पाऊस चालू असतांना इंद्रधनुष्य दिसले तर पाऊस बंद होण्याची सूचना आणि पाऊस न पडता दिसलेले इंद्रधनुष्य पाऊस येत असल्याची वर्दी जाणावी. |
|
८. सूर्याभोवती दिसणारे खळे (आभा) कसे ओळखावे. सूर्याचे खेळ : १) पसरलेले वायुचे वर्तुळ झालेले अनेक रंगाचे व आकाराचे सूर्याचे किरण, थोडया अभ्राने युक्त अशा आकाशात दिसतात त्याला परीवेष म्हणतात. |
|
९. आणि १०. मेघगर्भधारणेचे बिजारोपण : ह्या दोन्ही फोटो, लाल रंगाची उधळण, शेंदरी रंगाचे प्राबल्य तसेच काळया व निळया रंगाचे खालीवर ढग, पिवळया रंगाची मिश्रीत झलक शिक्कामार्तब करते. | |
११. चंद्राभोवती खळे : -चंद्र ज्या नक्षत्रात असतात परीवेष दिसतो तेव्हा सूर्य नक्षत्र आणि चंद्र नक्षत्रात २ किंवा ३ नक्षत्रांचे अंतर असेल तर राष्ट्रावर आपत्ती येते. – १ नक्षत्र असता बुध्दीजीवी उच्चवर्णीयांस अशुभ. – २ नक्षत्रे असता शस्त्रास्त्र धारक देश रक्षकांस अशुभ. – ३ असता व्यापार उदीम करणा-यांना कष्ट सहन करावे लागतात. धान्य आणि पर्जन्यासंबंधी सूर्यास खळे पडते तसेच फलीत जाणावे. तिथीनुसार फलीत – प्रतिपदा ते चतुर्थी चातुवर्णीयांस क्रमसाह ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व अत्यजांस त्रासदायक. पंचमी कोणत्याही १ जाती विशेषास त्रास, षष्ठीस १ नगरीचा (ज्या बाजुचा श्रृंग उंच असेल त्या दिशेचे नगर). सप्तमीस आर्थिक हानी. अष्टमी ते एकादशी राजघराण्यातील व्यक्तींचा नाश, उत्तरोत्तर तिथींना दिसणारा परीवेष (खळे) अशुभ होय. |
|
१२.वीजा : फोटोस दिसत असलेली वीज मेघप्रभा अर्थात मेघज्योती आहे. अशा वीज पश्चिमेला दिसतील तर खूप पाऊस पडतो. (कादांबीनी पृष्ठ १४५ आद्य ३/३) |
|
१३. जमिनीपासून ७-८ किलोमीटर उंचीवर असणारे ढग अशा निळे, पिवळे, शिखर मेघ दिसत आहे. ह्या ढगांचा पाऊस दिर्घकाळ पडतो. |
|
१४. वावटळ/चक्रियवात : हा सव्य घडयाळाप्रमाणे उडणारा वारा सरळ वर जात असेल तर शुभ परंतू अपसव्य घडयाळाच्या विरूध्द दिशेने जात असेल तर अशुभ जाणावे. |
|
१५. मेघ पाऊस धारण करीत असतांनाचे स्थित्यंतर ही स्थिती फाल्गुन पौर्णिमा ते चैत्र आमावस्या यांचे दरम्यान पाहावयास मिळते. डिसेंबर १५ ते जानेवारी २६. |
|
१६. मेघ गर्भधारणेचे बीज एक अदभुत अनुभव. | |
१७. पतंग : पाऊस पडण्यापुर्वीची स्थिती पाऊस सुरू होतांना हे पतंग दिव्यावर झेप घेऊन जळून मरतात. |
|
१८. कावळयाचे घरटे :सविस्तर माहितीसाठी पर्जन्य पुस्तक प्रकरण ६ पृष्ठ ४९ पाहा. | |
१९.२०.२१. सूर्य आकाश आणि ढग मेघगर्भ धारणेच्या प्रतिक्षेत :रंग संगतीत पांढ-या रंगाचा पुंज विखुरलेल्या निळया ढगांसह. अन्नदाता शेतकरी चहुबाजूने येणा-या वा-याच्या निरीक्षणात पावसाची वाट पहात नांगरणीसाठी प्रस्थान करीत आहे. | |
२२. सुर्यास्तानंतर लाल रंग रेंगाळतांना दिसला (बराच वेळ लाल रंग मागे राहीला तर जोराची वृष्टी होईल) | |
२३. मंद वृष्टी : दिर्घकाळ साधारणत: ३ ते ४ दिवस सतत पाऊस पडण्याचे लक्षण जाणावे. ह्यावेळी जागोजाग अधुनमधुन काळे ढग दिसतात. | |
२४. निश्चित गर्भधारणेचे लक्षण :आकाशात काळे ढग सूर्याच्या मागे पुढे असून लाल, शेंदरी, पांढरे तसेच पीत वर्णीय किरणे सूर्याचे भोवती दिसतात. | |
२५. आनंदी आनंदगडे, प्रसन्न वातावरण:पश्चिमेकडील काळे ढग शिखर प्रकारातील दीर्घकाळ पाऊस संभवतो. | |
२६. छत्री ज्या पाऊस येण्याच्या बेतात आहे. सूर्य घरी गेला की पाऊस आणि पाऊसच. | |
२७. चौकोनातील शेतकरी येणा-या वा-याची दिशा पाहात आहे.शेताकडे निघालेला हा बळीराजा वा-याची दिशा सांगत आहे. शेतक-याच्या डोक्यावर उत्तर, पायाजवळ दक्षिण, पाठीमागे पूर्व, समोर पश्चिम, उत्तर पूर्वेच्यामध्ये ईशान्य, पूर्व दक्षिणमध्ये आग्नेय, दक्षिण आणि पश्चिममध्ये नैऋत्य, पश्चिम उत्तरेमध्ये वायव्य ह्याप्रमाणे दिशा जाणाव्या लावलेल्या ध्वजाचे टोक ज्या दिशेस असेल ती दिशा लिहावी. |
संकलन – सुधाकर रघुनाथ जोशी देवळाली, नाशिक
सदर लेखाचे इंग्लिश रुपांतर वाचण्यासाठी येथे क्लिक करा