सृष्टीरंग – लेख

पाऊस

Rain आपण २१ व्या शतकात शब्दांचे लघुस्वरूप वापरून त्यातून मोठे शब्द लक्षात ठेवतो. उदा. I.T. म्हणजे Information Technology किंवा Income Tax आणि DOS म्हणजे Digital Opreated System किंवा Department of Sychology. हया लघुशब्दांचा अर्थ संदर्भानुरूप घ्यावा लागतो. पंरतु आजपासून ६००० वर्षापूर्वी आपल्या ॠषीमुनींनी जे शब्द वापरलेले आहेत ते किती अनुरूप, योग्य व संदर्भ निर्देशीत आहेत हे पहाणार आहोत.

१) पाऊस : पाण्यापासून उत्पन्न झालेला सर्वत्र पडणारा तो पाऊस.

२) वर्षा : वर्षातून एकदाच सुरू होणारी घटना. सूर्य रोहिणी नक्षत्रांत असता पावसाळा सुरू होतो. सूर्य स्वाति नक्षत्रातून गेला की पावसाळा संपतो. सूर्य १२ राशीतून भ्रमण करून पुन्हा रोहिणी नक्षत्रात येण्यास १२ महिने लागतात आणि पावसाळा सुरू होतो आणि म्हणूनच आपण मुलांना शिकवतो हिवाळा, उन्हाळा नेमेचि येतो मग पावसाळा. ”नेमेचि” कारण नियमित पाऊस सुरू होण्यास सूर्याची नियमीत गती कारणीभूत असते.

३) वृष्टी विशेषण सृष्ट : (घटट् होणे) विशेषत्वाने घट्ट झालेले म्हणजे गारा, बर्फ. ज्यावेळी गारा पडतात किंवा हिमपात होतो, त्या पावसाला वृष्टी म्हणतात. ह्या पावसाच्या पाण्याचे तपमान वातावरणापेक्षा कमी असते.

४) पर्जन्य : वराहमिहीर बृहत् संहितेत अध्याय २१, श्लोक ७ मध्ये म्हणतो, तत्पश्चात् मेध: “प्रसवति” हया एका शब्दावरून त्याने पुढील २० अध्याय लिहीलेले आहेत.

आता पर्जन्य शब्दाचा अर्थ पाहू

पर म्हणजे अन्य किंवा दुसरा. जन्य म्हणजे जन्मलेला. दुस-या ठिकाणी जन्मलेला तो पर्जन्य. जन्म आहे म्हटले की जन्म चार प्रकारे होऊ शकतो.

१) अंडज-पक्षी २) जारज- सस्तन प्राणी व मानव ३) उदभिज ४) स्वेदज

पाऊस हा उदभिज -उदकापासून जन्मलेला. आपण निसर्गचक्र पाहिले तर आठवेल समुद्राच्या पाण्याची वाफ होउन आकाशात जाते. ८-१० मैल उंच गेलेली ही वाफ ओबड-धोबड आकार घेते. अब्जावधी कण एकत्र येउन ढग बनतो व हे ढग वा-याबरोबर एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात. भूपृष्ठावरील कमी दाबाच्या पट्टयावरून जातांना जमिनीकडे ओढले जातात व पाऊस पडतो. म्हणजेच ”मेघ: प्रसवति”।

प्रसव म्हटलं की प्रसवाच्या ४ पध्दति आहेत

१) सामान्य प्रसव २) अपक्व प्रसव ३) आपघाति प्रसव ४) कृत्रिम प्रसव

हे चारही पर्जन्यासाठी अनुभवास येतात. प्रसव म्हटल की गर्भकाल अनिवार्य ठरतो. हा मेघगर्भ कालावधी गणिताने काढता येतो. बृहत संहिता अध्याय २१ श्लोक ७ पहा.

यन्नक्षत्रमुपगतेगर्भश्चन्द्रे भवेत्सचंद्रवशात् ।
पंचनवते दिन शते तत्रैव प्रसवं आयाति।।

अर्थ – ज्या नक्षत्री चंद्र प्राप्त होऊन, जो गर्भ होतो तो १९५ दिवसांनंतर त्याच नक्षत्रास चंद्र येइल तेव्हा प्रसूति पावतो.

हा गर्भकाल ज्योतिर्गणिताद्वारे काढावयाचा असल्यास गर्भाधान काळी असलेले स्पष्ट लग्न, जन्मकाळी तितक्याच राशी अंशाचा चन्द्र असता आणि अधान काळी असलेल्या स्पष्ट चन्द्रा इतकाच जन्मकाळी लग्न असतां, जन्म होतो. हया नियमाप्रमाणे जन्माकाळ व अधानाची वेळ यात अंदाजे १२ तासांचे अंतर येते. अधान म्हटले की प्रकृति पुरूष संबंध अटळ आहे. हयाचा उल्लेख ब्रम्हवैवर्त पुराणात, कृष्णजन्माध्याय २१ मध्ये सापडतो तो असा-

चन्द्राद् घौ गर्भआधत्ते वातेन, अभ्रेण विद्युता
गर्जितेना अल्पवृष्टी स च पंच गर्भलक्षणा:।।

अर्थ – समागमासाठी स्थळ घर पाहिजे. नक्षत्रांना देवतांची घरे म्हणतात. हया क्षितीजावर २७ नक्षत्रे आहेत. हयातील दहा नक्षत्रे पर्जन्यधारणेसाठी सांगितलेली आहेत.

भाद्रपदा व्दयविश्वांबु दैव पैतामहेष्यथर्क्षेषु।
सर्वेष्वृतुषुविवृध्दोगर्भोबहुतोयदोभवति।।२८।। अ.२१

अर्थ – पूर्वाभाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, उत्तराषाढा, पूर्वाषाढा, रोहिणी या पाच नक्षत्रांच्याठायी सर्वऋतुमध्ये (मार्गशीर्ष दिमासी संध्यारागादि लक्षणांनी) वाढलेला गर्भ बहुत वृष्टी देणारा होतो.

शतिभिषगाश्लेषार्द्रा स्वाति मघा संयुत: शुभोगर्भ:।
पुर्ष्णात बहून दिवसात् हंत्युत्पातैहंत स्त्रिविधै:।।२९।। अ.२१

अर्थ – शततारका, आश्लेषा, आर्द्रा स्वाति, मघा या नक्षत्री झालेला गर्भ शुभ होय. तो गर्भ बहुत दिवस वृष्टि करतो. तोच गर्भ त्रिविध उत्पातांनी हत झाल्यास आपण नाश पावतो.
(जर विविध उत्पातांनीयुक्त असेल तर गर्भ नाश पावतो.) हया उत्पात ग्रस्त ग्रहयोगाने हानि झाल्याचे आपण सर्वांनी २६ जून २००५ रोजी अनुभवले आहे.

पर्जन्य जाणून घेण्यासाठी काही प्राथमिक माहिती ज्योतिष जाणकारांना असते जसे, राशी व त्यांची तत्त्वे, अग्नि, पृथ्वी,वारा, जल तसेच स्थिर, चर द्विस्वभाव, राशींचे स्वमी, त्यांच्या राशी इ. ह्या व्यतिरिक्त नाडी आणि मंडळ माहित असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे गर्भधारणेचे नियम, यमल जातक अवगत असावे.

मेघगर्भ धारणा पर्जन्य

१) १४-१२-२००४ उत्तराषाढा ६.४१ मुंबई उत्तराषाढा १७.१० दि.-३-९-२००५
२) १६-१२-२००४ शततारका २३.५४ मुंबई शततारका २६-६-०५ वेळ ९/३२
३) १७-१२-२००४ पूर्वाभाद्रपदा २२.४८ मुंबई पूर्वाभाद्रपदा २६-६-०५ वेळ ७/४७

वरील ६ कुंडल्यांपैकी मेघधारणेच्या कुंडल्या सायनपद्धतीने सोडविल्यास नाडी, मंडळ, राशी आणि ग्रह स्थितीवरुन पर्जन्यानुमान जाणून घेता येते. उदा. म्हणून उत्तराषाढा नक्षत्र प्रवेशाची कुंडली –

१) उदीत —- पूर्वाषाढात १ चरणांत.
२) लग्नेश गुरु स्वाति/३ वातनाडीत.
३) लग्नासह अष्टक वर्ग पद्धतिनुसार ७ ग्रह शुभ नाडीत आहेत.

गर्भधरणेच्या नियमानुसार लग्न,चंद्र व रवि कुंडलींचा विचार करतां,
Rain १) चंद्र कुंडलीत मेघधारणा झाल्याचे स्पष्ट होते.
२) मेघधारणा झाली तर – संतती. यमल जातक प्रमाणें लग्नेश गुरु, पंचमेश मंगळ परस्पर अशुभ द्विद्विदश योगात. परंतु पंचमावर गुरुची पूर्ण दृष्टी त्याचप्रमाणे गुरु बुध लाभ योग, शनि गुरु लाभ योग, तृतीयेष शनि सुद्धा गुरुच्या शुभ योगात आहे. ३ शुभ योग एक अशुभ योग तीन दिवस पावसाचे संदेश देतो ह्या ३ योगांचा विचार करतां, ११,१,३,५,७ सर्वच विषम राशीत असून एकटा पंचमेश समराशीत. ३ दिवस मुसळधार व सुरूवातीचा दिवस मंद पावसाचा निर्देशीत होतो.

ह्याच प्रमाणे इतर दोन्ही कुंडल्यांचा विचार ज्योतिर्गणिताधारे केल्यास आपण अनुभवलेला पाऊस आधि काढणे शक्य आहे.

पर्जन्याच्या कुंडलीमध्ये – २३-०६-२००५, २६-०६-२००५ आणि २७-०६-२००५ नीर, अंबू, अमृत नाडीत जास्त आहेत. अष्टक वर्ग पद्धतीने भावबलवत्ता, ग्रह, राशी बलवत्ता – ग्रहपिंड व राशीपिंड काढून त्रयराशीकाने किती पऊस पडेल हे काढने शक्य आहे.
पृथ्वीवर पडणारा पऊस हा भूपृष्ठरचना, भौगोलिक स्थिती, वने-वनस्पति, जलाशय, बारमाही वाहणा-या नद्या, पर्जन्य छायेचा प्रवेश हयावर अवलंबून आहे. ह्यासाठी प्रत्यक्ष अनुभवांति ‘गुणक ठरवावा लागेल ज्यायोगे पर्जन्याची मात्रा, प्रत तसेच वेळ व दिनांक काढणे शक्य आहे.

१) २००२ – ७९%
२) २००३ – ८१%
३) २००४ – ८४%
४) २००५ – ८३%
५) २००६ – ८०%

ह्या विषयांत संशोधन होणे गरजेचे आहे. मला ८५% पेक्षा जास्त यश मिळविता आले नाही. प्रयत्नांति यश मिळेल याची खात्री आहे.

– सुधाकर रघुनाथ जोशी देवळाली, नाशिक

सदर लेखाचे इंग्लिश रुपांतर वाचण्यासाठी येथे क्लिक करा