सखी

मातृत्व

विहार, विश्रांती आणि व्यायाम

विहार
pregnant woman walking आहाराबरोबर विहारालाही तितकेच महत्व आहे. रोज २ कि. मी. चालणे सर्वात उत्तम. म्हणून गर्भवतीने मोकळ्या हवेत सकाळ संध्याकाळ फिरायला जावे खरेतर सुर्योदयापूर्वी हवेत ऒझोन वायू असतो. तो मिळण्यासाठी पहाटे उठून फिरावे. तज्ञाच्या सल्लयानुसार व प्रसुतीपूर्व शारीरिक व्यायाम करणे अधिक चांगले श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम, ॐकार करण्याने मानसिक स्थैर्य लाभते.

बाळंतपणानंतर प्रसूतीनंतरचे व्यायाम तुम्ही तज्ञांच्या सल्ल्यानुसार करु शकता. तसेच बसल्याबसल्या हातापायांच्या हलचालीचे व्यायाम, थोडे श्वसनाचे प्रकार, उšत्थत एकपादासन, पवन मुक्तासन, अर्ध द्रोणोसन हे करावे. तसेच उभे राहून ताडासन, चक्रासन करावेत. शेवटी शवासन करावे.

हे व्यायाम केल्यास सैल पडलेले शरीर हळूहळू कडक होऊ लागते व त्यामुळे अशक्तपणा वाटणारा नाही. गर्भवती स्त्रीने सुती कपडेच घालावेत. त्यामुळ शरीरातून बाहेर पडणारा घाम शोषला जातो. तसेच ह्या कपडामधून त्वचेला हवा मिळत रहाते. सिंथेटीक कपडामुळे घाम शोषला जात नाही व त्वचेवर तो राहून त्वाचारोगांना निमंत्रण देतो. आपल्यावर आणखी एक जीव आवलंबून आहे हे लक्षात घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. नेहमी सकाळी उठल्याबरोबर नैसर्गिकरित्या पोट साफ राहील याची काळजी घ्यावी. पोट साफ होण्यासाठी औषधे किंवा रेचके यांचा उपयोग करू नये. आहार याजना अशी असली पाहिजे की आज घेतलेल्या आहारामुळे दुसया दिवशी शौचाला साफ होईल. पोट साफ न झाल्यामुळे विजातीय पदार्थ साठून रहातात व ते रक्ताची घटना बिघडवतात. अशा रक्तामुळे गर्भाचेही नीट पोषण होत नाही व पुढे समस्या निर्माण होतात.

विश्रांती
pregnant womanon bed rest गर्भवती मातेसाठी विश्रांती अत्यंत आवश्यक आहे. रात्रीची ८ तास झोप तसेच दुपारची दोन तास विश्रांती मातेच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. पण विश्रांती म्हणजे झोप नव्हे त्यामुळे उठसुट झोपणे टाळावे. ३-४ तास झोपल्यामुळे शरीराला जडत्व येते दुपारच्या वेळात चांगली पुस्तके वाचल्यामुळे शरीराला व मनाला हलके वाटते व विश्रांतीही मिळते. अकारण अवजड काम, जड उचलणे, उंच चढणे, ५-६ तास उभे रहाणे, खूप वेळ एकाच जागी बसून रहाणे, भरभर चालणे टाळावे, लांबचा व दगदगीचा प्रवास, बाल्कनीतून ऒणवे होणे, उंच जागेवरून खाली वाकणे, सफाईसाठी उंच स्टूल किंवा बाकावर चढणे ह्या गोष्टी कटाकाक्षाने टाळाव्या. खूप घाई वा गडबडीने कोणतेही काम करू नये. घरात कोठेही निसरडे किंवा पाणी सांडलेले असू नये कारण यामुळे पाय घसरून पडून गर्भास इजा होण्याचा संभव असतो. सकाळ संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरणे, वाकून केर काढणे, उठबस करणे इ. कामे व हलचाली जरूर कराव्यात.

वाईट विचार, टि व्ही किंवा चित्रपटातील हिंसात्मक दृष्ये, भयपट इत्यादी पासून दूर रहाणे चांगले.

pregnancy exercises
pregnancy exercises
pregnancy exercises

सूचना
वरील दिलेले व्यायाम प्रकार तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखाली करावेत.
प्रत्येक स्त्रीचे गर्भारपणीचे आरोग्य आणि समस्या लक्षात घेऊन व्यायाम प्रकारात बदल होऊ शकतो. त्यामुळे तज्ञांचे मार्गदर्शन घेणे अधीक लाभदायी ठरेल.