सखी

मातृत्व

दिवस गर्भारपणाचे

Pregnancy Days आई-बाबा होणार आहात म्हणून अभिनंदन! डॉक्टरांच्या तपासण्या, घरच्या मोठयां बायकांचा सल्ला आणि समवयस्कांच्या अनुभवाने भावी माता-पिता बरयाच वेळा गांगरुन जातात. गर्भारपणाचे नऊ महिने आणि बाळाचा जन्म ह्या विषयी बरीच माहितीसाठी आपल्याला वेबसाईट्स वरुन मिळू शकते. गर्भारपणाचे हे नऊ महिने तीन महिन्यांच्या टप्प्यानुसार (Trimester) विभागले गेले आहेत. प्रत्येक आठवडयाला, महिन्याला गर्भाची होत असलेली वाढ, मातेचे शारिरीक, मानसिक बदल ह्याची सचित्र माहिती वाचायची असल्यास ह्या साईट्स बघायलाच हव्यात –

http://marathiworld.com/motherhood,
http://www.women-health-care.com/4-week-pregnancy.htm,
http://www.kidshealth.org/parent/pregnancy_calendar/pregnancy_calendar_i…,
www.pregnancytrimester.com,
http://www.webindia123.com/health/women/pregnancy/first.htm,
http://www.pregnancyweekly.com,
http://www.janani.org/protopdf/manual1tri.pdf,
http://www.indiaparenting.com/pregnancy

ह्या प्रत्येक साईटवर प्रत्येक आठवडयाची गर्भाची होत असलेली वाढ दिलेली असल्याने आपल्या बाळाच्या वाढीचा (साधारण) आलेख सतत आईबाबांजवळ असतो जो इतर वेळेला सोनोग्राफीनेच शक्य असतो.

गर्भारपणात आईच्या मनात अनेक शंका, भीती व गैरसमज आढळतात. बरेच वेळा आजूबाजूच्या लोकांकडून त्यात भर टाकली जाते. प्रत्येक गर्भार स्त्रीला वाटते आपले बाळ जगातले सर्वात सुंदर आणि गोरे बाळ असावे. त्यासाठी फक्त पांढरया पदार्थांचा उपयोग आहारात केला जातो. प्रत्येक बाळाची ठेवण, दिसणे हे अनुवंशिकतेवर अवलंबून असते. येणारे बाळ मुलगा असेल का मुलगी ह्या वरुनही अनेक तर्कवितर्क केले जातात. आईचे पोट खूप बाहेर असल्यास मुलगा किंवा खाली उतरले असल्यास मुलगी असे म्हटले जाते. आईच्या चेहरयावरुन, खाण्यावरुन, चालण्यावरुन, हृदयाच्या ठोक्यावरुन गर्भलिंगाचे तर्क केले जातात. गर्भारस्त्रीवरही अनेक बंधने टाकली जातात. काही समाजात विशिष्ट पदार्थ खाऊ दिले जात नाही, डोक्यावरुन अंघोळ करु देत नाहीत. ह्या सर्व ‘ओल्ड वाईफ्स टेल्स’ अत्यंत शास्त्रीय आणि परखड शब्दात पुढील साईट्सवर दिल्या आहेत –

http://www.womenfitness.net/preg_index.html,
http://www.indiaparenting.com/pregnancy/data/preg47_05.shtml,
http://www.pregnancy-info.net/wives_tales_and_myths.html,
http://www.kidshealth.org/parent/pregnancy_newborn/pregnancy/myths_tales,
http://pregnancy.about.com/cs/myths/a/aa042299.htm

गर्भारपणात स्त्रीच्या खाण्याची गरज दुप्पट होते. परंतु डोहाळे ह्या नावाखाली अनेकदा चुकीचा आहार घेतली जाण्याची शक्यता आहे. गर्भार मातेचा आहार फक्त संख्यात्मकच नव्हे तर गुणात्मकही हवा. ह्या काळात फॉलिक ऍसिड, कॅलशियम, आयर्न इत्यादी घटकांची गरज वाढलेली असते. काय खावे, कितीवेळा खावे, अन्नघटक कसे मोजावे हे बरेचदा माहिती नसते. अश्या वेळेला

http://www.iloveindia.com/nutrition/pregnancy/index.html,
http://en.wikipedia.org/wiki/Nutrition_and_pregnancy,
http://www.babycenter.in/pregnancy/nutrition/nutrientsyouneed/,
http://www.indiaparenting.com/pregnancy/data/preg10_00.shtml,\
www.babycenter.com/eating-well-during-pregnancy,
http://www.homeandfamilynetwork.com/pregnancy/nutrition.html

ह्या साईट्सवर अन्न घटकाचे तक्ते दिले आहेत त्यानुसार आपला आहार ठरवता येतो. खरं तर ह्या साईटसच्या वाचनामुळे मातेला भविष्यात मुलांचा आहार ठरवतांनाही खूप उपयोग होतो. जशी जशी डिलेव्हरीची तारीख जवळ येते तशी आईच्या मनात ‘कळांची’ भीती वाढत असते. अनुभवी मातांकडून ऐकलेले वर्णन, सिनेमांमधून जोरजोरात किंचाळणारया नायिका ह्या भीतीत अधिक भर टाकत असतात. ‘ नॉर्मल’ डिलेव्हरी असल्यास कळा ह्या येणारच हे समजून घेऊन त्याला सामोरे गेले पाहिजे. भारतात मातेला झोपूनच कळा द्यायला सांगितल्या जातात परंतु परदेशात मातेला उभे करुन किंवा उकिडवे बसून (squatting position) बाळाला जन्म देण्यासाठी तयार केले जाते. गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने जोर लावत असल्यामुळे बाळ बाहेर पडायला अधिक सोपे जाते. ह्या विषयीची अधिक माहिती पुढील साईट्सवर आहे –

http://www.lifepositive.com/Body/natural-childbirth/childbirth-india.asp,
http://www.indiwo.com/india/guides/childbirth-pregnancy/choosing-your-de…,
http://www.childbirthsolutions.com/articles/stories.php

डिलिव्हरी दरम्यान प्राणायाम किंवा श्वसनाचे व्यायाम केल्यासही अधिक फायदा होतो. ह्या विषयीची अधिक माहिती – www.babycenter.in/pregnancy/fitness/yoga/,
http://www.childbirthsolutions.com/articles/pregnancy/yoga/index.php,
www.askbaby.com/breathing-exercises-for-labour.htm,
www.healthandyoga.com/html/pbreath.html,
www.indianmoms.com/guide/exerciseduring.htm

बरेच वेळा मातेला आणि नातेवाईकांना, मातेला येणारया कळांची, तिला होणारया त्रासाची अधिक काळजी असते. पण लक्षात घ्या आई इतकेच तिचे बाळही घाबरलेले असते. ह्या विषयीचा अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख
http://www.indianmoms.com/guide/aninfantspoint.htm
ह्या लिंकवर आहे. ही साईट म्हणते जेव्हा मातेला कळा सुरु होतात तेव्हा बाळालाही भूकंप झाल्यासारखे वाटते. आधी असलेल्या शांत वातावरणातून त्याला बाहेर ढकलले जाते. ह्या वेळेला मातेनी ओरडण्यापेक्षा, शांत राहून श्वसनाचे व्यायाम केल्यास, चालत राहिल्यास आणि पोटावरुन हात फिरवून बाळालाही दिलासा दिल्यास लवकर बाळंत व्हायला मदत होते. ही साईट पुढे म्हणते आपल्या गरजेपेक्षा बाळाची गरज अधिक महत्त्वाची हे प्रत्येक पालकांनी लक्षात ठेवले पाहिजे. बाळंत झाल्यावर लवकरात लवकर मातेने बाळाला जवळ घेणे आणि स्तनपान देणे गरजेचे आहे. ह्याने बाळाला सुरक्षित असल्याचा अनुभव मिळेल. इवल्याश्या जीवाला जवळ घेतल्यावर आई तिचे सारे श्रम विसरेल ह्यात शंकाच नाही.