प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तसेच जबाबदारीची घटना असते. बालसंगोपन यशस्वीपणे व सुजाणपणे करणे ही आजच्या आई बाबांची जबाबदारी आहे. अपत्य जन्म ही घटना योगायोग नसावा त्याउलट माता पिता दोघांनी पूर्ण विचारांती हा निर्णय घेतलेला असावा. शरीरविज्ञानशास्त्रज्ञ, तत्वज्ञ व समाजशास्त्रज्ञ यांचे असे मत आहे की विवाहानंतर कमीत कमी दोन वर्षांनी गर्भधारणा होण्यास योग्य काळ असतो.
बाळाच्या प्रत्यक्ष जन्माआधीपासूनच आई बाबांना त्यांची शारीरिक व मानसिक तयारी करावी लागते. बाळाचा जन्म होतो तेव्हापासून त्याचा जन्म न होता खरे तर तो गर्भधारणेच्या क्षणांपासून सुरू होतो. हा पाया जितका मजबूत व निकोप असेल तितकीच इमारत भव्य व सुंदर दीर्घायु होईल.
मूल आईच्या पोटात असणाया गर्भाशयात वाढत असते, ते जणू त्याचे घर असते. गर्भाशयात शिरणारा जीव हा पेशीच्या रूपात असतो. त्या पेशीला बीज म्हणतात. हे बीज गर्भाशयात येण्यापूर्वी गर्भाशयाच्या डाव्या उजव्या बाजूंना जोडलेल्या दोन बीज वाहिन्यांपैकी एकीत असते. बीजाचा जन्म बीजवाहिनीत होतो. एक मातृपेशी व एक पितृपेशी यांच्या संयोगाने बीज जन्माला येते. मातृपेशीला बीजांड म्हणतात व ते बीजवाहिनीत शिरण्यापूर्वी अंडाशयात असते. The sperm appraoching ovum मातेच्या शरीरात दोन अंडाशय असून ते बीजवाहिन्यांच्या गर्भाशयापासूनही दूरच्या टोकाजवळ असतात. अंडाशयात परिपक्व झालेले बीजांडे बीजवाहिनीत शिरते व ते गर्भाशयाकडे सरकते. पितृपेशी पित्याच्या शरीरातून येते. तिला शूक्रजंतू म्हणतात. ते शुक्राशयात निर्माण होतात. बिजवाहिनीत बीजांडाशी शुक्रजंतूचा संयोग होतो. या क्रियेला फलन क्रिया म्हणतात. Fertilized egg, Beginning of human life फुलात ज्याप्रमाणे परागीभवन झाल्यावर स्त्रीपेशी व पूपेशी यांच्या संयोगाने फलधारणा होते. त्याप्रमाणे माणसात बीजांड व शुक्रजंतू यांच्या मिलनाने गर्भधारणा होते. त्यालाच बीज म्हटले जाते. हे बीज पुढे सरकत सरकत बीजवाहिनीतून गर्भाशयात उतरते. ते प्रथम गर्भाशयाच्या आतील भिंतीला चिटकून रहाते. व त्या भिंतीतून मिळणाया पोषक रसावर वाढते. पेशीविभाजनामुळे त्या पेशीपासून अनेक पेशी निर्माण होतात व त्या मानवी गर्भाचा आकार घेतात.
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. उत्तम व आरोग्यदायी संतती निर्माण करणे हे प्रत्येक मातेचे कर्तव्य आहे. सुरक्षित मातृत्वाचा हा पाया तिच्या बाल्यावस्थेत व पौडंगावस्थेत घेतल्या जाणाया आहार, विहार, व विचार ह्या त्रयीवर अवलंबून आहे.
मातृत्वाचे योग्य वय
वयाच्या अठरा वर्षाआधी गर्भारपण टाळावयास हवे. वयाने लहान मातांच्या पोटी अपु-या दिवसांची तसेच अशक्त बालके जन्माला येतात. तसेच अश्या मातांचे आरोग्य व बाळंतपण दोन्ही असुरक्षित असते. जे लहान वयाचे तेच उतार वयाचे वयाच्या ३५ वर्षे वयानंतर गर्भारपण व बाळंतपणातील धोके अधिक वाढतात. वरील दोन्ही प्रकारात डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे आचरण करणे अधिक गरजेचे असते. (भावी मातेचे वय १८ वर्षापेक्षा कमी तसेच ३५ वर्षापेक्षा जास्त नको.)
बाळांतील अंतर
दोन बाळांत किमान दोन वर्षाचे अंतर असावयास हवे. स्त्रीला गर्भारपण व बाळंतपणातून उभारण्यासाठी किमान दोन वर्षे लागतात तसेच पहिल्या बाळास वर्ष-दीडवर्ष स्तनपान देता येते. दोन वर्षापेक्षा कमी अंतर असणारी बालके ह्यांना शारीरिक तसेच मानसिक व्याधींना तोंड द्यावे लागते.
प्रसुतिपूर्व चिकित्सा
अपत्य जन्म ही घटना योगायोग नसावा त्याउलट माता पिता दोघांनी पूर्ण विचारांती हा निर्णय घेतलेला असावा. त्यासाठी त्यांनी किमान काही महिने आपल्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी नियोजन करायला हवे. तसेच दुसरे बाळ जन्माला आणतांना पहिल्या बाळाच्या मानसिकतेचा विचार अवश्य करायला हवा. मातेने व पित्याने आपल्याला कॅल्शियम, लोह, फॉलिक ऍसिड व इतर जीवनसत्वांचा सुयोग्य पुरवठा होईल ह्याची दक्षता घेतली पाहिजे. उत्तम दर्जाचे स्त्रीबीज व पुरूषबीज आरोग्यदायी संततीचा पाया रुजवू शकतात. (दर महिन्याला डॉक्टरांकडे तपासणी, आई व बाळाच्या स्वस्थतेची हमी.)
मासिक पाळी चुकल्यास डॉक्टरी सल्ला घेऊन गर्भारपणाची खात्री व चाचणी करून घ्या. आता लघवीवरुनही तुमच्या ह्या तपासण्या करता येतात. तुम्ही गर्भार असाल तर डॉक्टर तुमचे वजन, उंची व रक्तदाब तपासून दर महिन्याला त्याची नोंद ठेवतील गर्भारपणाचे पहिले सात महिने डॉक्टर तुम्हाला तपासणीसाठी दर महिन्याला व त्यानंतर दर पंधरवडयाला बोलावतील. शेवटच्या महिन्यात कदाचित दर आठवडयाला तपासणी करतील. जननक्षम स्त्रीला गर्भारपणात ऍनीमिया (रक्तातील हेमोग्लोबीनचे प्रमाण कमी असणे) व कॅल्शियमची कमतरता असण्याची शक्यता असेत. त्यामुळे डक्टर तुम्हाला लोह व कॅल्शियमच्या गोळ्या घ्यावयास सुचवतील. बाळाचे व मातेचे धनुर्वातापासून संरक्षण व्हावे म्हणून गर्भारपणाच्या काळात एक वा दोन टी. टी. (टिटॅनस टॉक्साइड) चे इंजेक्शन देतील. रक्तदाब, लघवीतील साखर, ऍल्ब्युमिन व पू पेशी तपासतील. तुमचा रक्तगट व रक्तातील आर-एच गट तपासतील.