सखी

मातृत्व

संगोपन तान्हुल्याचे

Newborn बाळाचा जन्म ही आनंदाची घटना असली तरी बहुतेक वेळेला नवोदीत मातापिता गोंधळलेले असतात. घरातल्या मोठया स्त्रीयांच्या सांगण्यानुसार त्यांचे बालसंगोपन चालू असते. परंतु आताची विभक्त कुटूंब पध्दती पाहाता प्रत्येक पालकाने स्वतः संगोपनाविषयी माहिती मिळवणे आवश्यक आहे. ह्यासाठी कुठल्या वेबसाईट्सचा उपयुक्त आहेत हे आपण बघणार आहोत.

बाळाचा जन्म झाल्यावर लवकरात लवकर मातेने बाळाला स्तनपान दिले पाहिजे. प्रयोगांती हे सिध्द झाले आहे की नुकत्याच जन्मलेल्या बाळाला जर त्याच्या आईच्या पोटावर आडवे झोपवले तर बाळ स्वत:हून आईच्या स्तनाकडे सरकते व स्तनपान करते ह्याला ‘ब्रेस्ट क्रॉल’ म्हणतात. ह्या विषयीची माहिती आपल्याला
breastcrawl.org,
www.unicef.org/infobycountry/india_40548.html,
breastfeeding.blog.motherwear.com/2007/09/the-breast-craw.html

‘ब्रेस्ट क्रॉल’चे व्हिडीयोजहीसाईटवर उपलब्ध आहेत.

‘ब्रेस्ट क्रॉल’ वरुन सिध्द होते की बाळाला http://www.breastcrawl.org स्तपान हे नितांत आवश्यक आहे. इतकेच नाही तर मातेचे दूध पिणारया बाळांची प्रतिकार शक्ती व बुध्दांक सर्वसामान्य मुलांपेक्षा अधिक असतो असे आढळून आले आहे. बरयाचवेळा पहिले येणारे चीकाचे दूध ‘कोलेस्ट्रॉम’ बाळाला पाजले जात नाही. परंतू हे दूध बाळाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ऍलर्जी, अस्थमा, लठ्ठपणा इत्यादी रोगांपासून बाळाचे संरक्षण होण्यास मदत होते.

नवीन मातेला बहुतेक वेळेला स्तनपान कसे करायचे , ह्या दरम्यान कसा आहार घ्यावा, कोणते कपडे घालावे, ‘टेंडर ब्रेस्ट’, ‘इनव्हर्टेड निप्पल्स’ म्हणजे काय इत्यादी विषयांची सखोल माहिती नसते. त्यासाठी ब्रेस्टफिडींगवर अतिशय माहितीपूर्ण साईट्स आहेत –
www.breastfeeding.com,
en.wikipedia.org/wiki/Breastfeeding,
www.nlm.nih.gov/medlineplus/breastfeeding.html,
www.medindia.net/patients/patientinfo/breastfeed_direction.htm,
www.who.int/topics/breastfeeding/en

दरवर्षी १-७ ऑगस्ट स्तपान दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात Breastfeeding Promotion Network of India ही संस्था त्यासाठी कार्यरत आहे. ह्या संस्थेची माहिती http://www.bpni.org ह्या साईटवर मिळेल.

दुर्दैवाने कधी कधी माता आपल्या बाळाला दूध पाजण्यास शारिरीक सक्षम नसते. बाळ अपुरया दिवसांचे असल्यास त्याला मातेच्या दूधाची आवश्यकता असते. त्यासाठी नॅशनल मिल्क बॅंक असतात. येथे मातेचे दूध साठवले जाते आणि गरजे नुसार बाळांना पुरवले जाते. ह्या विषयी माहिती आणि मातेचे दूध दान करण्याचे आव्हान
http://www.breastfeeding.com/promotions/nmb_signup.html,
www.breastfeeding.com/all_about/all_about_milk_banks.html,
milkshare.birthingforlife.com
ह्या साईट्सवर वाचायला मिळतात.

बाळ रडत असलं की घरातली सगळी मंडळी घाबरुन जातात. http://www.indiaparenting.com/newborn/data/newb01_02.shtml ही साईट म्हणते बाळाच रडणं हे त्याच्या संवादाच माध्यम आहे. त्याला कदाचित भूक लागली असल्यास, झोप आली असल्यास, उकडत किंवा थंडी वाजत असल्यास, पोटात दुखत (कॉलिक पेन्स) असल्यास.. ह्यापैकी कुठल्याही कारणांसाठी रडतात. बरेचवेळा ही लहान बाळं संध्याकाळच्या वेळेला टीपेचा सूर लावतात. सवयीने पालकांना बाळाच्या रडण्यातला फरक लक्षात येतो. बाळांच हे रडणं समजावून घेतल्यास त्याला शांत करणं सोप जात त्यासाठी पुढील साईट्स अत्यंत उपयुक्त आहेत –
http://www.babycentre.co.uk/baby/newborn/babycrying/,
www.babycenter.com/0_seven-reasons-babies-cry-and-how-to-soothe-them_979… ,
www.babycenter.in/baby/sleep/cryingexpert/,
www.theparentszone.com/category/infants

नवजात बालकाच्या जन्मापासून ते तीन महिन्यांपर्यंत बाळाच्या बरयाचश्या हालचाली ह्या ‘रिफ्लेक्सईव्ह’ असतात. परंतु बाळ साधारण तीन महिन्याचे झाले की त्याची समज अधिक वाढलेली असते. त्याच्या हनुवटीवर बोट ठेवल्यास, स्तनाचा वास किंवा स्पर्श झाल्यास बाळ आपोआप मान त्या दिशेने वळवते. वातावरणातला फरकही बाळाला कळतो. कपडे किंवा दुपटी बदलतांना आपले हातपाय लांब करुन बाळ ते जाहीर करत असते. ह्या ‘रिफ्लेक्सेस’ ची शास्त्रीय माहिती http://www.yourbabytoday.com/features/reflexes/index.html साईटवर आहे.

पहिल्या पाच वर्षात बाळाची बौध्दीक, भावनिक, मानसिक, शारिरीक वाढ झपाटयाने होत असते. प्रत्येक वर्षात होत असलेली बाळाची सर्वांगीण वाढ आपल्याला
http://www.indiaparenting.com/develop/index.shtml,
www.babycenter.in/baby/development/,
www.webindia123.com/health/child/baby/growth.htm,
www.webindia123.com/health/child/baby/milestones/foursix.htm,
www.blog4mom.com/index_files/BabyDevelopmentII.htm
साईट्सवर वाचायला मिळते. लक्षात घ्या प्रत्येक मूल हे वेगळे असून ह्या साईट्सची माहिती आपल्याला बाळाच्या वाढीचे टप्पे साधारणपणे कळण्यास उपयुक्त ठरतात.

बाळाचा आहार हा प्रत्येक मातेचा जिव्हाळ्याचा आणि काळजीचा विषय आहे. आपल्या बाळानी भरपूर आणि पौष्टीक खावे, दूध प्यावे असे तिला कायम वाटते. पण प्रत्येक बाळाच्या आहाराच्या पध्दती, सवयी व मोजमाप वेगळे असते. सकस अन्नघटक कोणते, बाळांना घन आहार कधी सुरु करावा, पौष्टीक पाककृती कुठल्या, आजारी मुलांचा आहार तसेच वयानुसार आहाराची माहिती हवी असल्यास –
www.indiaparenting.com/diet/data/diet16_00.shtml,
www.babycenter.in/baby/startingsolids/saltexpert/,
www.punjabkesari.com/health/dietnutrition.htm,
www.tarladalal.com/BabyToddler.asp

माहिती वाचून तुम्ही सुजाण पालक व्हाल ह्यात शंकाच नाही. हॅपी पेरेटींग !

– भाग्यश्री केंगे