सखी

मातृत्व

स्तनपान

१ बाळाला प्रथम स्तनाला केव्हा लावावे.
brestfeeding स्तनातील दूध-उत्पादक ग्रंर्थींमध्ये दूध तयार होते. बाळ जेव्हा आईच्या अंगावर दूध प्यायला (स्तनाग्र चोखायला) लागते, त्यावेळी आईच्या शरीरात दूध उत्पादक अंत:स्त्राव स्त्रवू लागतात. बाळाने स्तनाग्र चोखणे चालू ठेवल्यावर आईच्या शरीरात दूसरा अंत:स्त्राव स्त्रवू लागतो. त्यामूळे तयार झालेले दूध स्तनांच्या काळ्या भागातील दूग्धनलिकेमार्फत स्तनाग्राकडे येऊ लागते. प्रसूतीनंतर एक तासाचे आत स्तनपान सुरू करा. सिझेरियन ऑपरेशन झाले असेल व आईला शिरेतील इंजेक्शन चालू असतांनाही कमाल ४ तासानंतर दुध उतरल्यावर स्तनपान सुरू करावे. (स्तनपान हेच अमृतपान!)

२ सुरवातीला येणारे चिकाचे दूध बाळाला पाजावे का
Breast Draw प्रसूतीनंतरचे सुरवातीचे थोडे दिवस चीक-दूध (कोलोस्ट्रम) निर्माण होते व तेवढेच बाळाला पुरेसे असते आणि बाळाला दुसरे काहीही पिण्याची जरूरी नसते. चीक-दूध कमी असेल, तरी बाळाला ते पुरेसे आहे व त्यातूनच बाळाच्या सर्व गरजा भागविल्या जातात. चीक दूधात जीवनसत्वे आणि विशेषत: जीवनसत्व ए व के जास्त प्रमाणात असते. त्यात बरीच ऍन्टीबॉडीज (प्रतिबंधात्मक द्रव्ये) व इतर आवश्यक घटक असतात, ज्यामुळे जंतूसंसर्गापासून रक्षण होते. त्यात इम्युनोग्लोबीन असतात. बाळाच्या आतडाच्या अंत:त्वचेला लिंपण होते व त्यामूळे बाळाच्या रक्ताभिसरणात प्रथिनांचे मोठे कण जात नाही. ह्यामूळे बाळाला ऍलर्जी, क्षय, दमा व इसबसारख्या त्वचारोगांपासून संरक्षण मिळते.

३ स्तनपान कितीवेळा करावे

बाळ मागेल त्या वेळी त्याला स्तनपान द्यावे. जेवढे चोखणे जास्त तेवढे दूध उत्पादन जास्त, हे लक्षात ठेवावे. बाहेरच्या दूधापेक्षा आईचे स्तन्य बाळाला लवकर व सहज पचते. बाळाला रात्रीही स्तनपान करावयास हवे. पण ज्या ज्या वेळी बाळ रडते, त्या त्या वेळी स्तनपान करणे योग्य नाही. पुरेसे स्तनपान झाल्यावर अर्ध्या तासात बाळ रडू लागले तर ते भुकेने रडत नाही, तर इतर काही कारणाने रडत असावे. अशा बाळाला नुसत्या आजारण्या-गाजारण्याने व ओले दुपटे बदलल्याने भागते. कदाचित बाळाला गरम होत असेल, वा पांघरायला हवे असेल. ह्या सर्वाचे निराकरण करूनही बाळ रडत असेल तरच त्याला स्तनपान द्या.

४ स्तनपानासाठी चांगली स्थिती कोणती
Breast Feed Feeding position आईने स्वत:च्या हाताने आपले स्तन उंचावून बाळाच्या तोंडात घालावे. फक्त स्तनाग्रे नाही, तर ऍरिओला (स्तनाग्राभोवतालचा काळा भाग) बाळाच्या तोंडात असावा.
आईने आपले स्तनाग्र बाळाच्या ओठांना लावावे व बाळ तोड मोठे उघडेपर्यंत वाट पाहावी. त्यानंतर बाळाचा खालचा ओठ स्तनाग्राच्या काळ्या भागामागे येईल असे करून बाळाला स्तनावर घ्यावे.
Feeding position बाळाचे पूर्ण अंग आईच्या शेजारी तिच्याकडे तोंड करून असावे. बाळाचे तोंड व हनुवटी स्तनाच्या जवळ असावीत. बाळाचे तोंड पूर्ण उघडलेले असावे. त्याचे ओठ बाहेर वाकलेले असावे. अशा अवस्थेत बाळ जोराने दूध ओढीत असते. ते शांत व समाधानी दिसते व आईलाही स्तनाग्र दुखल्याचे जाणवत नाही.
स्तनाग्राला कातरे पडणे हे स्तनपानाची स्थिती चांगली नसण्याचे एक मुख्य कारण आहे. त्यामूळे दूध कमी होऊन बाळ स्तन नाकारेल. वरचेवर (पुन:पुन्हा:) स्तनपान करण्याने स्तनाला कातरे पडत नाहीत.
स्तनपानाच्या वेळी आईचे मन प्रसन्न असणे महत्वाचे आहे. यामुळे बाळावर चांगले संस्कार होतात. कारण दूध पाजतांना आई व बाळ शरीरापेक्षा मनाने जास्त जवळ येतात.

५ बाळाला स्तनपानापासून पुरेसे दूध मिळत असल्याचे कसे समजावे?
Breast Feed जुळ्या व कमी दिवसाच्या बाळालाही पुरेसे दूध मिळू शकेल काय?
ज्या बाळाला फक्त स्तनपान (वेगळे पाणीही नाही) चालू आहे व त्या बाळाचा दिवसातून सहा अगर जास्त वेळा शू होत असेल तर त्यास पुरेसे दूध मिळते असे समजा. पण सुरुवातीच्या ३ ते ४ दिवसांत फक्त चीक-दूध (ज्यात पाण्याचे प्रमाण कमी असते) मिळत असल्याने शूचे प्रमाण कमी असेल.

जुळ्या मुलांच्या बाबतीत सतत स्तनपान केले तर दोन्ही बाळांना पुरेसे दूध मिळू शकते. जी बाळे दूध गिळू शकतात, पण स्तन चोखून दूध ओढू शकत नाही अशा कमी दिवसांच्या बालकांना आईचे दूध पिळून काढावे व ते बाळाला चमचा वाटीने भरवावे. अगदी कमी दिवसांची व कमी वजनाची बाळे दूध गिळूही शकत नाहीत. त्यांना आईच स्तन पिळून काढलेले दूध नळीवाटे पोटात घातले जाते.

६ काही मातांना आपले दूध अगदीच पातळ असल्यासारखे वाटते ते का
स्तनाच्या आकारवरून दूधाचे प्रमाण ठरत नाही. अगदी छोटे स्तन असले तरी बाळाला त्यातून भरपूर दूध मिळते. स्तनपानाच्या सुरवातीचे दूध पाणचट दिसते, पण त्यात भरपूर प्रथिने, लॅक्टोज, साखर, जीवनसत्वे, क्षार व पाणी असते. स्तनपानाच्या शेवटी येणारे शेवटचे दूध पांढरे दिसते. कारण त्यात भरपूर चरबी असते. बाळाला सुरवातीच्या व शेवटच्या दोन्ही दुधाची जरूरी असते. म्हणून बाळाने स्वत:हून स्तन सोडेपर्यंत त्याच स्तनाने स्तनपान करावयास हवे. त्यानंतरच त्याला दूसया स्तनाला लावा.

७. स्तनाचे तटतटणे व गळू होणे कसे टाळावे
Breast Milk काही मातांना प्रसुतीनंतर ३-४ दिवसांनी स्तन सुजतात (तटतटतात) ह्याची जाणीव करून द्यावी. स्तन तटतटले तर हाताने वा पंपाने दूध काढून घ्यावे बाळ ज्या ज्या वेळी भुकेले होऊन रडत असेल त्या त्या वेळी स्तनपान देण्यानेही स्तनाची सूज कमी होते.

स्तनाला जंतूसंसर्ग झाला असेल (गळू) तरी त्या स्तनाने बाळाला स्तनपान करू द्यावे व स्तनपान चालू ठेवावे. आई त्या स्तनाने बाळाला दूध द्यावयास तयार नसेल तर त्या स्तनातले दूध पिळून काढा. स्तन गरम पाण्याने शेकावे. आईला भरपूर विश्रांती द्यावी. जरूर वाटल्यास डॉक्टर ऍटीबायोटीक देतील. गळू मोठे असेल तर त्याला चीर देऊन वाट करून द्यावी लागेल. ते डॉक्टर ठरवतील. जंतूसंसर्ग झालेल्या स्तनाने लवकरात लवकर स्तनपान सुरू करा. त्यामुळे जखम लवकर भरते.

८. स्तनपान किती काळ चालू ठेवावे
बाळाला दोन वर्षा वयापर्यंत स्तनपान चालू ठेवावे. स्तनांतून बाळाला ऊर्जा व प्रथिने मिळतात. एवढेच नव्हे; तर बाळाच्या दुसया वर्षापर्यंत रोगसंरक्षण मिळते. शिवाय बाळ रांगू चालू लागते व इतर मुलांत मिसळते. त्या वेळी जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असल्याने त्या वेळी त्याला स्तनपानाची आवश्यकता असते. आजारात भूक मंदावल्याने सहज पचणारे अन्नघटक आईच्या दूधातूनच मिळतात.

९. बाळाला कोणते बाहेरचे दूध पाजावे
Coe Milkज्या बाळाची आई गेली असेल, किंवा ज्या बालकांना बाटलीची सवय लागली असेल ज्यांचे स्तनपान दीर्घकाळ बंद असेल; त्यांनाच बाहेरचे दूध द्यावे लागेल. अशांना पावडरच्या दुधा पेक्षा गाई-म्हशीचे दूध निवडावे. पावडरच्या दुधात कमी जास्त पाणी मिसळण्याची शक्यता असते. ४ महिन्यांपर्यंत बाळाला २ भाग गाईचे दूध व १ भाग उकळून थंड केलेले पाणी मिसळून पाजावे. त्यानंतर पाण्याशिवाय दूध पाजावे व म्हशीचे दूध असल्यास त्यातील साय काढून घ्यावी. ४ औंस किंवा १२० मिलिलिटर दुधात १ चमाचा साखर घालावी. ४-४ तासांनी दिवसातून पाच वेळा दूध पाजावे. बाळाच्या प्रति १ किलो वजनाला १ औंस वा ३० मिलिलिटर दुधाने सुरवात करावी नाईलाजास्तव पावडरचे दुध वापरावेच लागले, तर १ औंस पाण्यात १ मापटे पावडर दूध घालावे. लहान बाळांना स्किम मिल्क योग्य नाही. पण ६ महिन्यांनंतर बाळ खाऊ लागल्यास त्याच्या अन्नपदार्थात दुधाची पावडर मिसळावयास हरकत नाही. बाहेरचे दूध बोंडल्याने किंवा वाटी चमच्याने पाजावे. बाटली वापरावीच लागली, तर प्रत्येक दूध पाजण्याला उकळून निर्जंतूक केलेली बाटलीच वापरावी.

१०. स्तनपानाशिवाय इतर अन्नपदार्थ कधी सुरू करावेत
Fruits वयाच्या ५-६ व्या महिन्यापासूनच चिरडलेले केळे, आंबा, पपई, चिकू, सफरचंद, इ. फळे आणि तांदूळ, गहू, नाचणी इ. शिजविलेले अन्न पदार्थ वा रव्याची पेज, खिचडी इ. स्तनपानाबरोबरच देण्यासाठी सुरवात करावी. बाजारात मिळणारे डबाबंद फॅरेक्स, नेस्टम इ. तयार अन्नपदार्थ शक्यतो टाळावे. तांदूळ, गहू, नाचणी व मूग डाळ समभाग घेऊन तव्यावर परतून भरड पावडर तयार करावी व हवाबंद डब्यात बंद करून ठेवावी. ह्या भरड पावडरीत दूध, साखर, मीठ घालून चांगला सांजा करता येईल व बाळाला तो आवडेलही. ह्याच वेळी बाळाला उकळून थंड केलेले पाणी कप वा लहान ग्लासने पाजण्यास सुरवात करा. कुठल्याही वयात बाटली नको.

एक वर्षापासून फळे, हिरवी-पिवळी पालेभाजी, मोड आलेले कडधान्य, तांदूळ, कोंडायुक्त गव्हाचे पीठ असलेला नेहमीचा आहार बाळास सुरू करावा. लहान मुलाला जास्त खाऊ देऊ नये असा एक गैरसमज असतो. पण साधारण बालके एका वेळी जास्त खाऊ शकत नाहीत, त्यांना दर २-३ तासांनी भरवावे. जेवणात तेल-तूप जास्त असावे.

११. स्तनपान करण्याचे आईला काही फायदे आहे का
होय. प्रसुतीनंतर स्तनपान करणा-या मातेची शरीराची ठेवण (बांधा) लवकर पूर्वस्थितीत येतो. स्तनपान न करणा-या आईच्या मानाने स्तनपान करणाया मातेमध्ये ऒव्हरी (बीजांडकोश) व स्तनाचे कर्करोग कमी अढळतात. स्तनपानाने गर्भधारणा लांबत असली, तरी कुटुंब नियोजनाची इतर साधने वापरणे चांगले. बाटलीने दूध पाजण्यापेक्षा स्तनपान सोईचे व स्वस्त असते.

१२. आईला स्तनपान कधी करू देऊ नये
आईला कर्करोग (कॅन्सर) असेल, अगर आई गंभीर आजारी असेल, आई क्षकिरण वा इतर कॅन्सर-विरोधी औषधे वापरत असेल, तर तिने आपल्या बाळाला स्तनपान देऊ नये. आईला संसर्गजन्य कावीळ, विषमज्वर, कॉलरा (पटकी, हगवण) क्षय व कुष्ठरोगासारखे आजार असताना स्तनपान द्यावयास हरकत नाही. आईने घेतलेल्या औषधाचे थोडे प्रमाण तिच्या दूधात येते, पण बाळाला त्याचा दुष्परिणाम होत नाही. मासिक पाळी चालू असतांना व दुस-या गर्भारपणाच्या मध्यापर्यंत स्तनपान द्यावयास हरकत नाही. आई भरपूर जेवत असेल तर तिच्या गर्भारपणाच्या पूर्ण काळातही स्तनपान द्यावयास हरकत नाही.