सखी

मातृत्व

प्रसुतीचे प्रकार

नैसर्गिक प्रसुती
Delivery type साधारण ४० आठवडे किंवा ९ महिने संपल्यावर ‘कळा’ यायला सुरवात होते. प्रत्येक मातेचा कळा येण्याचा काळ व वेळ वेगवेगळे असू शकते. तुमचे तज्ञ डॉक्टर किंवा सोनोग्राफीच्या मदतीने तुम्हाला हे समजू शकते. (डॉक्टरांच्या देखरेखीखाली प्रसुती, देई बाळाला व मातेला सुरक्षिततेची हमी)

प्रथमत: मातेला बरयाच अंतराने कळा यायला सुरवात होते. कधी कधी कळा मातेला जाणवतही नसतात नंतर कळा एका विशिष्ट अंतराने यायला सुरवात होते. त्यामुळे गर्भाशयाचे तोंड (cervix) प्रसरण पावते तसेच पातळ आणि मऊ होते.

Newborn गर्भाशयाचा वरचा डावा भाग आकुंचन पावतो त्यामुळे गर्भशयाचे ताड अधिकच प्रसरण पावते. त्यामुळे बाळ फिरले जाऊन त्याचे डोके आईच्या ओटीपोटात (pelvis) मध्ये घट्ट बसते. स्नायूंच्या आकूंचन व प्रसरण क्रियेमुळे बाळ आता अधिक पुढे ढकलले जाऊन गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडले जाते. त्यामुळे डोके बाहेर येते. त्यापाठोपाठ पुढच्या कळे बरोबर बाळाचा एक खांदा बाहेर येतो. मग दुसरा त्यानंतर इतर अंग डोक्याच्या तुलनेने लहान असल्यामुळे पटकन बाहेर घसरून येते. त्यानंतर लगेचच बाळाची नाळ बाहेर येते. नाळेला कापून त्यास शिवले जाते.

बाळाच्या जन्मानंतरही जोपर्यंत आईची नाळ व वार (Placenta) संपूर्णपणे बाहेर पडत नाही तोपर्यंत गर्भाशयाची आकुंचन-प्रसरण क्रिया चालू रहाते. बहुतांशी बाळांचा जन्म नैसर्गिकरित्या इस्पितळे किंवा दाईच्या मदतीने सुखरूपपणे होतो. कधीकधी काही विशेष अथवा अत्यावश्यक कारणास्तव वेगळे उपचार किंवा तात्काळ सेवा गर्भावतीस द्यावी लागते.

नैसर्गिक प्रसुती व्यतिरिक्त इतर प्रसुतीचे प्रकार खालील प्रमाणे आहेत.

१. Induction – प्रसुतीचा काळा हा ४० आठवडाचा असतो. एखाद दुसरा आठवडा पुढे मागे प्रसुती होणे हे नैसर्गिक असतं. पण ४२ आठवडे उलटून गेल्यावर डॉक्टर इंजेक्शन अथवा औषधांच्या सह्याने मातेस कळा आणण्यास मदत करतात. त्यामुळे गर्भाशय उघडून बाळ बाहेर यायला मदत होते. ह्याच प्रकारातील अजून काही कारणे खालील प्रमाणे –
१ pre – edampsia
२ एक पेक्षा अधिक गर्भ (जुळे अथवा तीळे)
३ गर्भाशय आकुंचन व प्रसरण पावण्याची क्रिया खुपच हळू असल्यास
४ गर्भाशयातील पाणी वाहून गेल्यास
५ डायबेटीस – बाळ अधिक वजनाचे असल्यास
६ नाळ गर्भाशयापासून अलग झाल्यास

ह्या प्रकारात गर्भ बाहेर येण्याची प्रक्रिया झपाटाने होते. परंतु मातेला त्रासदायक होऊ शकते. गरज पडल्यास औषधे (pain relief) देणे अधिक चांगले.

२. Ceaserean सिझेरियन
Ceasor ceaserean गर्भवती मातेच्या गर्भाशयात विशिष्ट प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याने सिझेरियन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. शस्त्रक्रिया साधारण एक तासाची असते व बाळ पाच ते दहा मिनिटात बाहेर येते. ओटीपोटाला एक छोटीशी आडवी चीर देऊन बाळाला बाहेर काढले जाते. तसेच नाळ बाहेर काढून सर्व भाग परत शिवला जातो. ह्या दरम्यान मातेला भूल दिली जाते.
खालील परिस्थिती उदभवल्यास सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात येते.

Abnormal position of baby१ गर्भास हानी झाल्यास
२ प्रसुतीला वेळ लागत असल्यास
३ पायाळू गर्भ, गर्भाशयातील पाणी वाहून गेल्यास
४ Pre – eclampsia
५ Cord prolapse

Abnormal संपूर्ण जन्मपूर्व अवस्था किंवा गर्भावस्थेचा कालखंड २८० दिवस किंवा नऊ महिने, नऊ दिवसांचा असतो. परंतु सर्वच अर्भकांचा जन्म बरोबर तेवढाच कालखंडाने होत नाही. काही अर्भके खूप आधी (premature birth) जन्मतात, तर काही हा उलटून गेल्यावर जन्मतात (postmature birth)
अलीकडे प्रसवकाल उलटून होणारया जन्माचे प्रमाण कमी झाले आहे. कारण प्रसूतीपूर्वीच्या प्रसववेदना हव्या तेवढया तीव्रतेने व वारंवारीतेने सुरू करण्यासाठी मातेस विशिष्ट औषधे किंवा इंजेक्शन देता येतात. त्यामुळे नंतर संभवणारे धोके प्रामुख्याने टाळले जातात.
गर्भावस्थेचा काळ पूर्ण होण्यापूर्वी काही दिवस आगोदर जन्म झाल्यास अकस्मात जन्म (Premature Birth) होतो. ही मुले अशक्त, कमी वजन असलेली व अपूरी वाढ झालेली देखील असू शकतात.

३ Episiotomy
episiotomy Episiotomy कधी कधी प्रसुती दरम्यान बाळ योनी मार्गातून बाहेर येण्यास त्रास होत असेल तर योनी मार्ग वाकडा तिकडा फाटण्याची शक्यता असते. म्हणून तज्ञ योनी मार्गाला छोटी चीर देऊन बाळ बाहेर येण्या मदत करतात. ती जागा भूल देऊन बधीर केली जाते. प्रसुतीनंतर जागा शिवली जाते.

Episiotomy खालील परिस्थितीत केली जाते
१ बाळाचे डोके योनीमार्गातून बाहेर येण्यासाठी खूप मोठे असल्यास
२ बाळाला बाहेर ढकलण्याची क्रिया (कळा देणे) खूप हळू असल्यास
३ बाळ पायाळू असून तातडीची परिस्थिती उदभवल्यास
४ your babay is in distress.

४ Forcep (चिमटा) किंवा Vaccum
Forcep प्रसुतीला वेळ लागत असल्यास कळा नीट येत नसल्यास तसेच बाळाला बाहेर ढकलतांना माता थकून गेल्यास forcep किंवा vaccum चा वापर करतात. vaccum & Forcep म्हणजे चिमटाच्या सहाय्याने बाळाचे डोके घट्ट धरून त्याला बाहेर काढतात. कित्येक वेळा चिमटाच्या खुणा बाळाच्या डोक्याला तशाच रहातात. पण काही दिवसात निघून जातात.

हल्ली डॉक्टर forcep चा वापर कमी व vaccum extraction अधिक करतात. vaccum extraction मध्ये शंखाकृती भांडे असते. ते बाळाच्या डोक्यावर ठेऊन त्यात हवेची पोकळी निर्माण केली जाते व बाळाला बाहेर काढले जाते.