पुण्य-भू बाहूबली


Bahubali ३०० वर्षांपूर्वी महान साधक बाहूबलींनी ज्या जागी तपाचरण केले होते, तिथे ऋषी बाहूबलींच्या नावाने १९३५ साली एक ‘सेलेबसी रिसॉर्ट’ बांधण्यात आले. चार मनोऱ्यांची संगत असलेली त्यांची समाधी येथे आहे. गुरूदेव, सामंत भद्र महाराज १०८ वे यांच्या मार्गदर्शनाखाली, ७५ वर्षांपूर्वी, अनेक रिसॉर्टस् व शाळा बांधण्यात आल्या.

मूळनायक : भगवान बाहूबली यांची श्वेत-मूर्ती, ही जवळपास ८५० सेमी. उंच असून खड्गासनातील आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी : हे तीर्थ म्हणजे, अनेक तपस्व्यांची तपोभूमी आहे. दिगंबर सन्यास्यांच्या नुसार हे क्षेत्र एक ‘अतिशय क्षेत्र’ आहे. ३५० वर्षांपूर्वी, महान व ज्ञानी आचार्य, सामंतभद्रजी महाराज साहेब यांनी हया जागी अतिशय उग्र तपश्चर्या केली. हया टेकडीवर प्राचीन मंदिरे आहेत. पण सामंतभद्रजी महाराज साहेबांच्या धर्मकारणाच्या विद्यमाने बाहूबलींच्या नव्या मूर्तीची अलिकडेच प्रतिष्ठापना झाली.

इतर मंदिरे : हया मंदिराच्या आवारात कलात्मकतेने व सौंदर्यपूर्ण रीतीने बनविलेल्या सिध्दक्षेत्र आणि सामोवसरण यांच्या भव्य तसेच मनमोहक प्रतिकृती आहेत. हया टेकडीवर श्वेतांबर तसेच दिगंबर मंदिर आहे.

कला व शिल्पाकृती : जंगलातील टेकडयांनी वेढलेल्या हया परिसरातले हे मंदिर फारच सुंदर व रमणीय आहे. बाहूबलीची मूर्ती व प्रवेशद्वारावरील दोन गज-आकृती हया भव्य आणि विलोभनीय आहेत. समावोसरणांच्या रचनेतून कलात्मक कौशल्य प्रतीत होते. हया मंदिराला भेट देणा-या उपासकांचे हृदय भक्तीने उचंबळून येते.

शंकरायार्च मठ

जगद्गुरू शंकराचार्य हयांनी स्थापन केलेल्या चार मठांपैकी, शृंगेरी हा एक मठ. तेराव्या शतकामधे त्यावेळचे अधिपती शंकराचार्य, श्री. विद्याशंकर भारती यांनी कोल्हापूर येथे हा मठ स्थापन केला. कोल्हापूरच्या त्या काळातल्या धार्मिक महात्म्यामुळे, त्यांनी हा मठ स्थापन केला. महालक्ष्मी जगदंबेच्या पवित्र स्थानापाशी, दक्षिण काशीच्या पुण्य-भू पाशी, एक मठ असावा असे, स्वामींना वाटले असल्यास त्यात काहीच नवल नाही. ‘अभिनव पंचगंगा तीर्वास’, ‘कमल निकेतन करवीर सिंहासनाधिश्वर श्री. विद्या शंकर भारती स्वामी’ हया प्रस्तुत मठातील शंकराचार्यांच्या उपाधी आहेत. पंचगंगेचा काठ आणि महालक्ष्मी मंदिर हयांचे स्थान माहात्म्य शंकराचार्यांना, श्री. विद्या शंकर भारती यांना वाटत होते, हे यावरून समजते. मठासाठी जागा मुक्रर करताना सुध्दा, पंचगंगेचा काठच त्यांनी त्यामुळे पसंत केला. मठाची ही जागा निवडण्यामागे, दुसरे देखील एक कारण दाखवता येईल. मठ म्हणजे शेवटी समाधीची जागा, हे विसरणे शक्य नाही. समाधी स्थान हे नदीकिनारी असणे, खरे तर उचित ठरते. त्यामुळे शंकराचार्यांनी हया ठिकाणाची निवड केली.

कान्हेरी मठ : शिवाची पुण्य भूमी

Kaneri Mathe प्रसिध्दीच्या झोतापासून दूर, एकाकी ठिकाणी, असलेले आणि तरीही नेमाने चालू असलेले हे मंदिर कोल्हापूरपासून फक्त 1 किमी. अंतरावर आहे. निसर्ग-सौंदर्यात, आकंठ बुडालेल्या एका उंच टेकडीवर इ. सनाच्या 14 व्या शतकामधे एका लिंगायत उपासकाने शिवलिंगाची स्थापना केली.

मूळ मंदिर हेमाडपंती शैलीत बांधलेले होते. 10 चौरस फूट व्याप्तीच्या मंदिराच्या गर्भगृहासमोर दोन छोटे मंडप आहेत. या मंडापाच्या आवारात भव्य दगडी खांबावरती विराजमान झालेला नंदी आहे. हया मंदिराचे सौंदर्य आणि शांतता प्रतीत झाल्यावाचून राहात नाही.

500 वर्षांपूर्वी कदसिध्देश्वर या लिंगायत उपासकाने हे मंदिर विकसित केले. तिथे 125 फूट खोल विहीर आहे. शिवाजी व संभाजी महाराजांनी या जागेस भेट देऊ ती विहीर दान केल्याची नोंद तिथे आहे. शिवाचा महान भक्त असलेल्या ‘मीरसाहेब’ या मुस्लीम महंताची बखर, जशी मिरजेला आहे, तशीच ती या टेकडीवर देखील आहे. हे थडगे देखील तितक्याच श्रध्देने पूजले जाते. कर्नाटक आणि महाराष्ट्रातून लाखो भाविक येथे शिवरात्रीस एकत्र जमतात.

त्यांच्या देणग्यांद्वारा जमा झालेल्या निधीमधून कदसिध्देश्वर संस्था अनेक योजना आखते. संस्थेमार्फत 42 फूट उंच शिवप्रतिमेचार प्रतिष्ठापना केली असून, हत्तीच्या सोंडेतून पावन जलाचा वर्षाव तिथे करतात. कोल्हापूर शहरापासून या ठिकाणापर्यंत बस-सेवा उपलब्ध आहे. हे ठिकाण खरोखरच प्रेक्षणीय आहे.