संग्रहालये/ऐतिहासिक स्थळे

गारगोटी संग्रहालय (माळेगाव – सिन्नर)

Gargoti Museum माळेगावच्या औद्योगिक वसाहतीत श्री. के. सी. पांडे यांनी दोन काटी रुपये खर्च करून आशिया खंडातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे गारगोटी संग्रहालय उभारले आहे. गारगोटयांचा विविध आकारातील, रंगातील संग्रह थक्क करणारा आहे.

निसर्गाची ही किमया श्री. पांडे ह्यांच्या कित्येक वर्षाच्या परिश्रमामुळे संग्रहालयात आपल्याला पहायला मिळते.

सोने, हिरा, झिओराईट, कॉव्हानाईट असे अनेक प्रकारच्या नैसर्गिक गारगोटया आपल्याला पहायला मिळतात. मुख्य म्हणजे आगाऊ सुचना दिल्यास हे प्रदर्शन प्रेक्षकांकरिता २४ तास खुले असते.

ह्या संग्रहालयात प्रवेश केल्यावर भारतमातेची भव्य व तेजस्वी मूर्ती आपले लक्ष वेधून घेते.

या संग्रहालयातील काही गारगोट्या

Gargoti Museum
Gargoti Museum
Gargoti Museum
Gargoti Museum
Gargoti Museum
Gargoti Museum

शिवाजी विद्यापीठ

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे बोलके व्यासपीठ म्हणजे, कोल्हापूर! १९६३ या सालात दिवंगत माननीय श्री. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांनी शिवाजी विद्यापीठ स्थापन करण्यामधे पुढाकार घेतला. हया विद्यापीठाच्या सीमांतर्गत, सांगली, सातारा आणि सोलापूर यांचा समावेश होतो. १००० एकराच्या प्रशस्त वास्तुचे हे विद्यापीठ म्हणजे, महाराष्ट्राच्या शैक्षणिक आघाडीवरील एक लक्षणीय घोडदौड आहे. प्रमुख कार्यालयाच्या बरोबरीने बॅ. कर्देकर ग्रंथालय, मानव्यशाखा इमारत, जीवशास्त्र इमारत, सांस्कृतिक सभागृह तसेच महिला व पुरूष विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल हे सारे दिमाखदारपणे उभे आहे. पदवीदान समारंभाकरिता एक खास सभागृह आहे. Shivaji University मुख्य इमारतीसमोर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हे नयनरम्य दृष्य होय. नानाविध झाडे, वेली, फुले, फळझाडे यांनी विद्यापीठाचे आवार हिरवेगार आहे. एस्. एस्. सी. परिक्षेसाठी दरवर्षी १,२५,००० विद्यार्थी इथे दाखल होतात. हया परिक्षा सुकर होण्यासाठी, लेखा विभाग, स्टोर कंट्रोल आणि निधी विभाग हे व्यवस्थापनातील भाग कार्यरत असतात. कुलपती, कुलगुरू, विद्यार्थी प्रतिनिधी, शासकीय प्रतिनिधी इ. हया व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवतात.