अभयारण्ये

महाराष्ट्रातील अभयारण्ये
 • चांदोली राष्ट्रीय उद्यान
 • जायकवाडी अभयारण्य
 • ज्ञानगंगा अभयारण्य
 • टिपेश्वर अभयारण्य
 • तानसा अभयारण्य
 • दाजीपूर अभयारण्य
 • नरनाळा अभयारण्य
 • नान्नज अभयारण्य
 • नायगाव अभयारण्य
 • फणसाड अभयारण्य
 • भामरागड अभयारण्य
 • भीमाशंकर अभयारण्य
 • मालवण समुद्री अभयारण्य
 • मेळघाट अभयारण्य
 • यावल अभयारण्य
 • येडशी अभयारण्य
 • राधानगरी अभयारण्य
 • लोणार अभयारण्य
 • वान अभयारण्य
 • सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
 • सागरेश्वर अभयारण्य
 • गौताळा औटराम घाट अभयारण्य

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य

Nandur Madhmeshwar Abhayaranya नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील खानगाव थडी येथे गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर इ.स. १९११ च्या सुमारास दगडी बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे निर्माण झालेल्या जलाशयाच्या परिसरास, इ.स. १९८६ मध्ये अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. १००.१२ चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्यास जगप्रसिध्द पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी महाराष्ट्र राज्याचे भरतपूर म्हणून गौरवले आहे. नांदूरमध्यमेश्वर येथील पक्ष्यांच्या अधिवासामुळे तसेच दुर्मिळ पक्ष्यांच्या अस्तित्वामुळे हे क्षेत्र महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्र (IBA) म्हणून घोषित करण्यात आले आहे.

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात विरळ सदाहरित जंगल आणि माळरान परिसर आढळून येतो. ४०० हून अधिक विविध प्रकारच्या वनस्पती प्रजाती येथे बघायला मिळतात. वेगवेगळ्या पाणवनस्पती, आसपासची हिरवीगार शेते, नदी किना-यावरची वनराई ह्या बाबी देशी- विदेशी पक्ष्यांना आकर्षित करत असतात.

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात उदमांजर, कोल्हे, लांडगे, बिबळे, मुंगूस, विविध प्रजातीचे साप, कासव हे वन्यप्राणी आढळतात. हिवाळ्यात रोहित, चक्रवाक, तलवार बदक, लालसरी, चतुरंग, सुरय, कादंब, झोळीवाला, करकोचे, शराटी, तुतारी, क्रौंच, गल, चिलखे, कुरल, हरीण इत्यादी पाणपक्षी भेट देत असतात. चमचा बदक, बगळे, चांदवा, कमळपक्षी, पाणकोंबडी, मुग्धबलाक, खंड्या, ससाणे, पाणबुडी हे स्थानिक पक्षी बघायला मिळतात.

Nandur Madhmeshwar Abhayaranya पक्षी निरीक्षणासाठी येथे निरीक्षण मनोरे, स्पोटिंग स्कोप अशा सुविधा उपलब्ध आहेत. येथे पक्षी निरीक्षणासाठी प्याडल बोट अभयारण्य व्यवस्थापनेकडून उपलब्ध करून दिली जाते परंतु जलाशयातील पाण्याची पातळी, पक्षी जलाशयात विहार करत असल्यास ही बोट उपलब्ध नसते. तसेच ही बोट आपल्यालाच चालवावी लागते. अभयारण्य व्यवस्थापनेकडून कोणताही बोट चालक उपलब्ध करून दिला जात नाही. तसेच चापडगाव येथील स्वागतकक्षात फिल्ड गाईड, दुर्बिण आणि मार्गदर्शक उपलब्ध असतात. पर्यटकांना मुक्काम करण्यासाठी किंवा सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या वेळचा अविष्कार बघायचा असेल तर अभयारण्यालगतच खानगाव थडी येथे सिंचन विभागाद्वारा विश्राम गृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

पक्षी निरीक्षणासाठी डिसेंबर ते फेब्रुवारी हा उत्तम कालावधी असतो. तसेच नाशिक हे तिर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ असल्याने अभयारण्या सोबतच इतर ठिकाणी देखील फेरफटका मारता येतो.

संपर्क

१) वनसंरक्षक
सहाय्यक वनरक्षक वन्यजीव विभाग, नाशिक.
दूरध्वनी क्र. (०२५३) २३१७११४ / २३१७११५

२) वनक्षेत्रपाल
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य,
दूरध्वनी क्र. (०२५३) २३१०६३५

कसे जाल ?
जवळचे विमानतळ : औरंगाबाद (१८० कि.मी), मुंबई (२२५ कि.मी)
जवळचे रेल्वे स्थानक : निफाड (१२ कि.मी),
रस्त्याने : जवळचे शहर – निफाड (१२ कि.मी), नाशिक (५० कि.मी ), सिन्नर (२० कि.मी) Location Icon