अभयारण्ये

महाराष्ट्रातील अभयारण्ये
 • चांदोली राष्ट्रीय उद्यान
 • जायकवाडी अभयारण्य
 • ज्ञानगंगा अभयारण्य
 • टिपेश्वर अभयारण्य
 • तानसा अभयारण्य
 • दाजीपूर अभयारण्य
 • नरनाळा अभयारण्य
 • नान्नज अभयारण्य
 • नायगाव अभयारण्य
 • फणसाड अभयारण्य
 • भामरागड अभयारण्य
 • भीमाशंकर अभयारण्य
 • मालवण समुद्री अभयारण्य
 • मेळघाट अभयारण्य
 • यावल अभयारण्य
 • येडशी अभयारण्य
 • राधानगरी अभयारण्य
 • लोणार अभयारण्य
 • वान अभयारण्य
 • सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
 • सागरेश्वर अभयारण्य
 • गौताळा औटराम घाट अभयारण्य

नागझिरा अभयारणे

Nagzira Abhayaranya निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणून नागझिराच्या औचित्यपूर्ण गौरव केला जातो. जंगलात एक तळ असावं, तळ्याकाठी आज्ञाधारक रक्षाकाप्रमाणे उभे असणारे सरळ बुन्ध्यचे वृक्ष असावे, त्या वृक्षाचा प्रतिबिंब तळ्यात पडलेलं असावं. तळाच्या काठानें जाणारी वाट असावी, आजूबाजूला डोंगररांगा असाव्या, असे सारे कल्पनेत वाटणारे, प्रत्यक्ष पाहण्यासाठी नागझीरालाच जावे. रानात राहून या सर्व सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी या अभयारण्यात आधुनिक दर्जाची निवासगृहे पर्यटकांच्या सेवेसाठी हजर आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील हे अभयारण्य पानझडी वृक्षाचे आहे. तब्बल १५३ चौ.कि. मी. इतक्या मोठया क्षेत्रात पसरलेल्या या परिसरावर निसर्गाने आपले सगळे रंग मुक्तहस्ते उधळले आहेत. या अभयारण्यात साग, अंजान, धावडा, ऐन, तिवस, सप्तवर्णी यांचे उंच वृक्ष आढळतात. शिवाय मोहफुले, चार, आवळा, बेहडा, तेंभूर्णी इ. फळझाडेही बघावयास मिळतात. अंगाचा ताठा कायम ठेवून आकाशाला भिडणारी बांबूची बेटे देखील नजरेस भुरळ पाडून जातात.

वन्य प्राण्यांच्या अस्तित्वामुळे या अभयारण्याचे अरण्यपण अधिकच गडद होताना दिसते. वाघ, बिबटे, रानगवे, चितळ, सांभर, नीलगाय, अस्वल इ. प्राणी इथे मुक्तपणे संचार करतात. येथील वनविभाग येणा-या पाहुण्यांच्या स्वागतासाठी नेहमीच तत्पर असतो. वनविभागाच्या वतीने जवळच्या पिटेझारी व चोर ख्म्बारा गावातील तरुणांना गाईड साठीचे प्रशिक्षण दिले गेले आहे. आग टेहळणी बुरुजावरून लांबवर पसरलेल्या या अभयारण्याचे विहंगम अवलोकन करताना त्याचा विशालतेची व विशेषतेची खात्री पटते. शिवाय टायगर पॉईंट, बंदर चूवा पॉईंट, वाकडा वेहाडा, हत्ती खोदारा रोड अशी विविध ठिकाणी निसर्गाची निरनिराळी रूपे पहावयास मिळतात. हे सारे निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात साठवताना अक्षरशः कसरत करावी लागते. म्हणूनच महाराष्ट्रातील या वैविध्यतेने नटलेल्या अभयारण्याची वाट पुनःपुन्हा येण्यासाठी खुणावत राहते.

कसे जाल ?
जवळचे विमानतळ : नागपूर ( १२० कि.मी.)
जवळचे रेल्वे स्थानक : गोंदिया ( ४५ कि.मी.)
रस्ते मार्ग : नागपूर – साकोली – नागझिरा, गोंदिया – तिरोडा – चोरखमारा.( १३५ कि.मी ) Location Icon

संकलन – राजश्री नानकर

रेहेकुरी काळवीट अभयारण्य

Rehekuri Abhayaranya हरणांमध्ये दिसायला सुंदर, चपळ, वेगवान, म्हणजे कृष्णमृग अर्थात काळवीट. या काळवीटांच्या संरक्षणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात रेहेकुरी येथे २.१७ चौ.कि.मी क्षेत्रात इ.स १९८० मध्ये या अभयारण्याची स्थापना करण्यात आली.

गवताळ कुरणे व बाभळीच्या वनाने अभयारण्याचा बहुतांश भाग व्यापलेला आहे. हिवर, खैर, तरवड, बाभूळ, बोर, कडुलिंब, हे येथील प्रमुख झाडे आहेत. तर मारवेल, पवन्या, फुली, शेड्या, कुसळी, डोंगरी, या गवती वनस्पती देखील येथे आढळतात.

काळवीट, लांडगे, कोल्हे, तरस, चिंकारा, साळींदर, मुंगुस, खोकड हे वन्य प्राणी तर धामण, नाग, अजगर, सरडे, घोरपड हे सरीसृप वर्गातील प्राणी येथे बघायला मिळतात. मोर, लावा, तितर, माळढोक, सातभाई, कापशी, घार, सुतार, चंडोल, भारद्वाज हे पक्षी देखील येथे आहेत.

रेहेकुरी येथे निरीक्षण कुटी असून विश्रांतीसाठी दोन कक्ष व युथ हॉस्टेल मध्ये पर्यटकांच्या निवासाची सोय उपलब्ध आहे. सिद्धटेक हे अष्टविनायक यात्रेतील प्रमुख गणपती मंदिर येथून ४० किमी अंतरावर आहे, तर राशीन येथे जगदंबा देवीचे मंदीर २५ किमी अंतरावर आहे. मार्च ते मे ह्या कालावधीत या ठिकाणी पर्यटनाचा आनंद अनुभवता येतो.

संपर्क :
वनसंरक्षक, वन्यजीव, पुणे
स.नं. ४९, वनवसाहत, नरेन हिल्स हौसिंग सोसायटीजवळ
वानवाडी, पुणे.
दुरध्वनी : (०२०) २६८५११४३

कसे जाल ?

रस्त्याने : पुणे – पाटस – दौंड – वालवड मार्गे रेहेकुरीस जाता येते. पुणे (१६० कि.मी ), श्रीगोंदा (३५ कि.मी), वालवड (३ कि.मी).
रेल्वेने : पुणे – सोलापूर मार्गावरील दौंड हे जवळचे रेल्वे स्टेशन (८० कि.मी ) तर श्रीगोंदा रोड रेल्वे स्टेशन (३८ कि.मी) आहे.
विमानाने : जवळचे विमानतळ लोहगाव (पुणे १६० कि.मी) Location Icon