अभयारण्ये

महाराष्ट्रातील अभयारण्ये
  • चांदोली राष्ट्रीय उद्यान
  • जायकवाडी अभयारण्य
  • ज्ञानगंगा अभयारण्य
  • टिपेश्वर अभयारण्य
  • तानसा अभयारण्य
  • दाजीपूर अभयारण्य
  • नरनाळा अभयारण्य
  • नान्नज अभयारण्य
  • नायगाव अभयारण्य
  • फणसाड अभयारण्य
  • भामरागड अभयारण्य
  • भीमाशंकर अभयारण्य
  • मालवण समुद्री अभयारण्य
  • मेळघाट अभयारण्य
  • यावल अभयारण्य
  • येडशी अभयारण्य
  • राधानगरी अभयारण्य
  • लोणार अभयारण्य
  • वान अभयारण्य
  • सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
  • सागरेश्वर अभयारण्य
  • गौताळा औटराम घाट अभयारण्य

कोयना – महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील सरताज

Koyana Abhayaranya 2012-13 हे वर्ष महाराष्ट्रातील अनेक पयर्टनस्थळांसाठी खुपच खास ठरले. कारण याच वर्षात जवळपास राज्यातली 30 स्थळे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समिवष्ट झाली. त्यात संपूर्ण पश्चिम घाटाचा समावेश झाल्याने तेथील अत्यंतिक निसर्ग सौदर्याने नटलेले कोयना अभयारण्यही अपोआपच यात समाविष्ट झाले.

कोयना अभयारण्य म्हणजे उभ्या पश्चिम घाटाच्या शिरपेचात खोवलेला मानाचा तुरा आहे. कोयना अभयारण्य हे सातारा जिल्ह्यात असून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वधिक घनदाट जंगलांमध्ये या जंगलाचा समावेश होतो. हे अभयारण्य कोयना धरणाच्या भिंतीमागील शिवसागर जलाशयाच्या कडेकडेने पसरले आहे. इतिहासात हे जंगल जावळीचे खोरे म्हणून ओळखले जाते. अभयारण्याचे एकूण 427 चौ. की. मी. आहे. 1985 साली या जंगलाला अभयारण्याचा दर्जा मिळाला. मात्र व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळावा म्हणून अद्यापही राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र युनेस्कोच्या यादीत याचा समावेश झाल्याने पर्यावरणीय सुरक्षा आणि बायोडायव्हर्सिटी या गोष्टी पुढे अशाच टिकून राहतील अशी आशा आहे.

कोयना नगर ते महाबळेश्वरजवळील तापोळा या साधारणपणे 70 ते 75 किलोमिटरच्या पट्ट्यात हे अभयारण्य पसरले आहे. ढोबळमानाने याचे तीन प्रमुख भाग पडतात. पहिला महारखोरे, दुसरा वासोटा आणि तिसरा मेट इंदवली. त्यातही मुख्यत्वे इंदवली, कुसवळी, सिंधी, बलवण, मोरवी, म्हाळूंग, वाचावळे, कुसापूर, तापोळा, कंदाटकी खोरे या गावांचा समावेश होतो. शिवसागर जलाशयाची नैसर्गिक तटबंदी या अभयारण्याला लाभली आहे. कोयना धरणाच्या बॅकवॉटरमध्ये येथील बहुतांश जंगल पाण्याखाली गेले आहे. जलाशयाच्या पश्चिमेकडील बाजूसच अभयारण्याचा बहुतांश भाग येतो, जो अतिशय घनदाट आहे. एका बाजुला सह्याद्रीची मुख्य रांग आहे, तर दुस-या बाजूला उपरांग आहे. या दोन्हींच्या मधोमध कोयना नदी वाहते. मुख्य रांगेचा उतार नदीच्या बाजूला सौम्य आहे, तर पश्चिम बाजूला 90 अंशांचा कडा आहे. महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचा उंच कडा म्हणून जो ओळखला जातो, तो बाबू कडा येथे आहे. दुसरीकडे अभयारण्यातील सर्वोच्च ठिकाण अर्थातच वासोटा किल्ला (उंची – 1100 मीटर) याच ठिकाणी आहे. त्याच्या पायथ्यापर्यंत फेरी बोटीतून जाता येते. एका बाजुला नैसर्गिक कडा, तर दुस-या बाजुला मानवनिर्मित जलाशय त्यामुळे या जंगलाला एका प्रकारे जंगलतोडीपासून अभयच मिळाले आहे. कोयनेसोबतच सोळशी व कांदाटी या नद्याही याच अभयारण्यातून वाहतात. जून ते सप्टेंबर दरम्यान इथे प्रचंड पाऊस पडतो. त्याची वर्षाची सरासरी सुमारे 5000 मी.मी. आहे.

जंगलाचा प्रकार

येथील जंगलाचा समावेश प्रामुख्याने दमट विषुववृत्तीय सदाहरीत जंगलात होतो. असे जंगल राज्यात अन्यत्र केवळ महाबळेश्वर येथे आढळते. या ठिकाणी जंगलतोड कमी असल्याने महाराष्ट्रातील ब-याच दुर्मिळ वनस्पती व झाडे येथे आढळतात. प्रथम प्रचंड मोठे वृक्ष, त्याखाली मध्यम उंचीच्या वनस्पती, त्याखाली नेच्यासारख्या वनस्पती, त्याखाली गवतासारख्या वनस्पती अशा चार प्रकारातील झाडांनी हे जंगल घनदाट केले आहे. येथे प्रामुख्याने अंजनी, जांभूळ, हिरडा, आवळा, ऐन, आंबा, काटक, उंबर, जांभा, बिब्बा, शिकेकाई, गारंबी, करवंद, धायटी, कडुनिंब, मुरुडशेंग आदी वृक्षसंपदा विपुल प्रमाणात आढळते.

पश्चिम महाराष्ट्रातील प्राण्यांची सर्वाधिक घनता याच अभयारण्यात आहे, मात्र याच्या अतिघनदाटपणामुळे येथील वन्यप्राण्यांची गणना करणेच अवघड आहे. सर्वसाधारणपणे आढळणारे भारतीय प्राणी येथेही आढळतात. येथे बिबट्याचे दर्शन नशिबवंतांना होते. दिवसा व रात्रीच्या डरकाळ्यांच्या आवाजाने आणि ठश्यांवरुन येथे वाघ आहेत, हे सिद्धही होते. परंतू सहसा ते कोणाला दिसत नाहीत. साधारणपणे येथे फिरणा-या ट्रेकर्सना नेहमी अस्वल दिसते, बरेचदा आमना-सामनाही होतो. त्यामुळे भयापोटी ट्रेकर्स फटाके वाजवत जंगलातून फिरायचे मात्र आता फटाके वाजवायला येथे पूर्णपणे बंदी आहे. येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राक्षसी खारी. मराठीत त्याला शेकरु असे म्हणतात. भीमाशंकर येथे आढळणा-या खारींपेक्षा या थोड्या वेगळ्या आहेत.

वासोट्याप्रमाणेच या जंगलात जंगली जयगड, मधुमकरंदगड असे किल्लेही आहेत. जे नेहमी ट्रेकर्सना खुणावत असतात. जलाशयाच्या कडेकडेने वसलेले आणि फिरण्यासाठी बोटीचा वापर करावे लागणारे आपल्या राज्यातील हे एकमेव अभयारण्य आहे. नेहमीपेक्षा इथली मजा आणि अनुभव नक्कीच सर्वांसाठी वेगळा ठरू शकतो. त्यामुळे किमान एकदा तरी येथे भेट द्यायला हरकत नाही. Location Icon