गणपतीच्या आरत्या, स्तोत्रे

ganpati puja वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ |
निर्विघ्नं कुरुमे देव
सर्वकार्येषु सर्वदा ||

|| मंत्रपुष्पांजली||

ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवा स्थानि धर्माणि प्रथमान्यासन्|
तेहनाकं महिमानःसचंत यत्र पूर्वेसाध्याः सन्ति देवाः||
ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने| नमो वयं वैश्रवणाय कुर्महे|
स मे कामान् कामाकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु||
कुबेराज वैश्रवणाय महाराजाय नमः||
ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठयं|
राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्या सीस्यात् सार्वभोमः सार्वायुषेआन्ताधापरार्धात्||
पृथिव्यै समुद्रपर्यतांया एकराळिति तदप्येषःश्लोकोभिगीतो मरूतः
परिवेष्टारो मरूत्तस्यावसन् गृहे| आविर्क्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति

॥श्रीगणपतीचीआरती॥

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता वीघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची॥
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।
कंठी झळके माळ मुक्ता फळांची॥1॥
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रें मन: कामना पुरती॥ ध्रु.॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा॥
हिरेजडित मुगुट शोभतो बरा।
रूणझुणती नुपुरे चरणी घागरीया॥ जय.॥2॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना॥
दास रामाचा वाट पाहे सदना॥
संकटी पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवरवंदना ॥ जय.॥3॥

॥अथ संकटनाशनगणेश स्त्रोत्रम्॥

त्रिलोकगामी नारदकृत संकंटांचा नाश करणारे असे हे श्रीगणेशाचे स्तोत्र आहे. या स्तोत्राच्या पठणाने स्मरणशक्ती वाढते. केलेला अभ्यास लक्षात राहात नसेल तर या स्तोत्राने चांगला फायदा होतो. सकाळ, दुपार व संध्याकाळ या वेळी 11 वेळा हे स्तोत्र पठण केल्यास चांगला फायदा होतो.

श्रीगणेशाय नम: । नारदउवाच ।
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रे विनायकम् ।
भक्त्या व्यासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिध्दये॥1॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥2॥
लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णम् तथाष्टमम् ॥3॥
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥4॥
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकरं प्रभो॥5॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ॥6॥
जपेद् गणपतिस्तोत्रम् षडि्भर्मासै: फलं लभेत् ।
संवत्सरेणं सिध्दींच लभते नात्र संशय:॥7॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥8॥
इति श्रीनारदपुराणे संकटनाशनस्तोत्रम् संपूर्णम् ।

भूपाळी गणपतीची
उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
ऋध्दीसिध्दींचा नायक । सुखदायक भक्तांसी ॥ध्रु.॥
अंगी शेंदुराची उटी । माथा शोभतसे कीरीटी ।
केशरकस्तूरी लल्लाटीं । हार कंठी साजिरा ॥१॥
कानीं कुडलांची प्रभा । चन्द्र-सूर्य जैसे नभा ।
माजीं नागबंदी शोभा । स्मरतां उभा जवळी तो ॥२॥
कासें पितांबराची धटीं । हाती मोदकाची वाटी ।
रामानंन्द स्मरतां कंठी । तो संकटी पावतो ॥३॥

कहाणी गणपतीची
ऐका परमेश्वरा गणेशा, तुझी कहाणी. निर्मळ मळें, उदकाचे तळें, बेलाचा वृक्ष, सुवर्णाचीं कमळे, विनायकाची देवळे, रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडावं, अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहांचं सहकुटुंबी भोजन करावं, अल्पदान महापुण्य. असा गणराज मनीं ध्याईजे; मनी पाविजें; चिंतिलं लाभिजे; मनकामना निर्विघ्न कार्यसिध्दी करिजे. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ, संपूर्ण

राधाकृत श्री गणेश स्तोत्र
आपले माणूस घर सोडून गेल्यास, अगर एखादी व्यक्ती गायब झाल्यास हे स्तोत्र आसन घेऊन एकाच बैठकीत १०१ वेळा म्हणावे. हरवलेली व्यक्ती परत येते. मात्र या स्तोत्राचे पठण पूर्ण श्रध्देने करावे लागते. तरच याचा फायदा होतो.

राधिकोवाच।
परं धाम परं ब्रह्म परेशं परमीश्वरम् ।
विघ्ननिघ्नकरं शांन्तं पुष्टं कान्तमनन्तकम् ॥१॥
सुरासुरेन्द्रै: सिध्देन्द्रै स्तुतं स्तौमि परात्परम् ।
सुरपद्मदिनेशं च गणेशं मङ्गलायतनम् ॥२॥
इदं स्तोत्रं महापुण्यंम् विघ्नशोकहरं परम् ।
य: पठेत् प्रातरूत्थाय सर्वविघ्नात् प्रमुच्यते ॥३॥
। इति श्रीब्रह्मवैवर्ते राधाकृतं गणेशस्त्रोत्रं सम्पूर्णम् ।