कथा बिनाका गीतमालाची


बिनाकामध्ये गैरफिल्मी गीते! (वर्ष १९८१)

सन १९८१ एका नवीन दशकाची सुरूवात. १९७१ ते १९८० या दशकाच्या अखेरीस आपण पाहिले की गीतकार आनंद बक्षींचे साम्राज्य फिल्मी दुनियेत होते. खरे तर या दशकात जुन्या गीतकारापैकी हसरत, मजरूह, साहिर, राजेंद्रकृष्ण, इंदिवर, प्रदीप, भरत व्यास, कमर जलालाबादी, जाँ निसार अख्ख्तर, कैफी आझमी, एस. एच.बिहारी, नक्शलायपुरी, नीरज, गुलशन बावरा, वर्मा मलिक, अंजान, असद भोपाली हे सर्व आपापल्या गीतांसह चित्रपटसृष्टीतले अस्तित्व दाखवून देत होते.

तसेच याच दशकात संतोष आनंद, योगेश, गुलजार, देव कोहली, रवींद्र जैन, विठ्लभाई पटेल, सावनकुमार, एम.जी.हश्मत, माया गोविंद, साजन देहलवी, अमित खन्ना, शैली शैलेंद्र, इंद्रजीत सिंह, तुलसी, महेंद्र देहलवी, गौहर कानपुरी, विश्वेश्वर शर्मा या गीतकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आगमन करून काही भावपूर्ण गीतांची निर्मिती केली. अर्थात यापैकी काही आधीच्या दशकातच दाखल झालेले होते. पण एकूणच त्यांची कामगिरी या ८० च्या दशकात नजरेत जास्त प्रमाणात भरू लागली.

मात्र या सर्व जुन्या नव्या गीतकारांमध्ये आनंद बक्षी सर्वात जास्त ‘बिझी’होते. मशिनगनमधून धडाधड गोळया बाहेर पडाव्यात तशी त्यांच्या लेखणीमधून गाणी स्त्रवत होती आणि पुढील दशकातही स्त्रवत राहीली.

अशातच नवीन दशक सुरू झाले. आता हिंदी चित्रपटाचे संगीत खूपच बदलले. खाजगी गाणी तयार होऊ लागली. त्यांच्या कॅसेट्स तयार होऊ लागल्या. लोकांना ही गैरफिल्मी गीतांची लोकप्रियता पाहून बिनाकामध्ये त्यांना प्रवेश द्यावा लागला. हा पहिला मान नाजीया हसनच्या ‘डिस्को दिवाने’ या कॅसेटला (अल्बमला) मिळाला. १२ ऑगस्ट १९८१ या दिवशी ‘डिस्को दिवाने अहा अहा नशिली है रात’ हे पहिले गैरफिल्मी गीत बिनाकामध्ये सामील केले गेले. पुढील आठवडयात ‘आओ ना प्यार करे हम’ हे दुसरे गैरफिल्मी गीत बिनाकामध्ये सामील झाले आणि फिल्मी गीतांचा समावेश करून बिनाकाचा २९ वा वार्षिक कार्यक्रम याचा पहिला भाग २३ डिसेंबर १९८१ रोजी प्रसारित झाला. त्यामध्ये १९८१ मधील पुढील १६ गीते सामील होती.

३२) हम बने तुम बने एक दुजे के लिए- एक दुजे के लिए
३१) कितने भी तू करले सितम- सनम तेरी कसम
३०) मेरे नसिबमें तू है की नही- नसीब
२९) वक्तसे पहले किस्मतसे ज्यादा- बीवी ओ बीवी
२८) आते जाते हुए मैं सबपे नजर रखता हूँ- शान
२७) मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया- दोस्ताना
२६) ऊई तमाशा ऊई- क्रांती
२५) आओ ना प्या करे – डिस्को दिवाने अल्बम- गैरफिल्मी गीते.
२४) यकब यक कोई कही- कातिलों के कातिल
२३) तू इस तरहासें मेरी जिदंगीमें- आप तो ऐसे न थे
२२) आ देखे जरा किसमे कितना है दम- रॉकी
२१) रम्बा हो, सम्बा हो, मै नाचू- अरमान
२०) डिस्को दिवाने अहा, अहा- गैरफिल्मी गीते
१९) न जाने क्या हुआ जो तुने लिया- दर्द
१८) अपनी तो जैसे तैसे, थोडी ऐसे या वैसे- लावारिस
१७) प्यार करनेवाले प्यार करते है शानसे- शान

बिनाकाचा वार्षिक कार्यक्रम सुरू करण्याआधी अमीन सयानी यांनी अशा ६/७ गीतांचा उल्लेख केली की जी गीते ‘रनर्सअप गीते’ होती. काही गुण कमी मिळाल्यामुळे ती बिनाकाच्या वार्षिक कार्यक्रमात सामील होऊ शकली नव्हती. अशा गीतांमध्ये ‘सिलसिला’ची दोन गीते होती. ‘ये कहॉ आ गये हम’ आणि ‘नीला आसमाँ सो गया’ ‘दरीया मे फेक दू चाबी’ आणि ‘हमको भी गमने मारा’ तसेच ‘अच्छा कहो चाहे बुरा कहो’ (राम – बलराम), ‘दिल्लगी ने दी हवा’ (दोस्ताना), हमको भी गमने मारा’,तसेच ‘अच्छा कहो चाहे बुरा कहो’ (दोस्ताना), हमको तो नशा है’ (ज्वालामुखी) यांचा बिनाकाच्या वार्षिक कार्यक्रमात समावेश होऊ शकला नव्हता.

३० डिसेंबर १९८१ रोजी बिनाकाच्या २९ व्या वार्षिक कार्यक्रमाचा दुसरा भाग प्रसारीत झाला. संगीताचा बदलेला ट्रेंड, वाद्यांचा गोंगाट आणि डिस्कोचे अतिक्रमण यामुळे जुने चित्रपट गीताचे प्रेमी नाराज होते. पण बदलत्या काळाला घेऊनच बिनाकाला पुढे जायचे होते. जे लोकप्रिय होते ते कार्यक्रमात सामील करून घ्यायचे होते. मग ते मधुर होते? कलात्मक होते? स्मरणीय होते? इत्यादी प्रश्न उभे करायचे नव्हते. ‘जब छाए मेरा जादू कोई बच न पाए’ असे सांगताच संगीताचा नवा प्रकार पसरू लागला होता. बिनाकाही त्यामधून वाचू शकली नाही, आणि हेच गीत बनून पुढे आले त्याची एक झलक ऐकूनच हा १६ गीतांचा वार्षिक कार्यक्रम प्रसारित झाला.

१६) चल चमेली बागमें मेवा खिलादूँगा- (क्रोधी) लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आनंद बक्षी, लता-सुरेश वाडकर
१५) दोस्तोंसे प्यार किया दुश्मनोंसे बदला लिया- (शान) आर डी बर्मन, आनंद बक्षी, उषा उत्थप
१४) यम्मा यम्मा, यम्मा यम्मा, ये खुबसुरत समा- (शान) आर डी बर्मन, आनंद बक्षी, रफी-आर-डी-साथी
१३) देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए- (सिलसिला) शिव हरी, जावेद अख्तर, लता, किशोर,
१२) एक रास्ता आहा आहा- (राम बलराम) लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आनंद बक्षी, रफी, किशोर
११) हरी ओम हरी गम है कोई तो- (प्यारा दुश्मन) बप्पी लहरी, अंजान, उषा उत्थप, साथी
१०) जॉन जॉनी जर्नादन तर रम पम पम पम- (नसीब) लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आनंद बक्षी, मो. रफी,
९) देखो मैने देखा है इक सपना- (लव्ह स्टोरी) आर डी बर्मन, आनंद बक्षी, अमित कुमार, विजयेता पंडित
८) मेरे जीवन साथी प्यार किये जा- (एक दूजे के लिए) लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आनंद बक्षी, लता-एस.पी. बालसुब्रम्हण्यम,
७) मार गई मुझे तेरी जुदाई- (जुदाई) लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आनंद बक्षी, आशा-किशोर
६)बने चाहे दुश्मन जमाना हमारा- (दोस्ताना) लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आनंद बक्षी, मो. रफी-किशोर,
५) चना चोर गरम बाबू मैं लाया मजेदार- (क्रांती) लक्ष्मीकांत-प्यारेलाल, संतोष आनंद, नितीन मुकेश-लता-रफी-किशोर-साथी
४) तेरे मेरे बीच मैं कैसा है ये बंधन- (एक दुजे के लिए) लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आनंद बक्षी, लता-एस.पी. बालसुब्रम्हण्यम
३) याद आ रही है तेरी याद रही है- (लव्ह स्टोरी) आर डी बर्मन, आनंद बक्षी, अमितकुमार-लता

आणि या १४ गीतांनंतर १९८१ मधील सर्वात जास्त लोकप्रिय असणारी ३ गीते ऐकवण्यात आली. या कार्यक्रमात टॉपची जी १६ गीते होती त्यापैकी जवळ जवळ दहा गीते ही लक्ष्मीकांत – प्यारेलालनी संगीतबध्द केलेली होती. अखेरच्या या टॉपच्या तीन गीतांपैकी क्रमांक तीनवर ‘चल मेरे भाई तेरे हाथ जोडता हूँ’ हे त्यांच्या संगीतातील आनंद बक्षी यांनी ‘नसीब’ चित्रपटाकरिता लिहिलेले आणि मोहम्मद रफी आणि अमिताभ बच्चन यांनी गायलेले गीत होते. तर क्रमांक दोनवर ‘क्रांती’ चित्रपटातील ‘जिंदगीकी न टूटे लडी’ हे नितीन मुकेश आणि लता यांनी गायलेले संतोष आनंद यांचे लक्ष्मी प्यारे यांचेच संगीतातील गीत होते.

मात्र क्रमांक एकवर लक्ष्मीकांत प्यारेलाल नव्हते. किशोरकुमार नव्हता, आनंद बक्षी आणि लता मंगेशकरही नव्हत्या. तेथे होते कल्याणजी – आनंदजी गीतकार होते अंजान. चित्रपट होता ‘लावारीस’ आणि गीताचे गायक होते अमिताभ बच्चन आणि अलका याज्ञिक. ‘मेरे अंगनेमें तुम्हारा क्या काम है’ हेच ते गीत, पण चित्रपटगीत प्रेमींच्या अंगणात बिनाकाचे काम होते म्हणूनच १९८१ साल संपले तरी बिनाका संपली नव्हती. १९८२ साल सुरू झाले. या वर्षात बिनाकाने फक्त लोकप्रिय गीतेच ऐकवली का? छे! अजूनही काही होते. काय होते ते?

– पद्माकर पाठक, सातारा