कथा बिनाका गीतमालाची


वार्षिक कार्यक्रम दोन भागात करावा लागला!

१९५६ हे वर्ष संपले आणि त्याचबरोबर बिनाका गीतमालेची फक्त एका भागात कार्यक्रम सादर करण्याची पध्दतपण संपली. बहुसंख्येने तयार होणारी मधुर हिंदी चित्रपटगीते आणि त्यांची प्रचंड प्रमाणातील लोकप्रियता त्याचा हा परिणाम होता. या लोकप्रियतेचे मोजमाप होऊन ती गाणी ऐकवणारा बिनाका गीतमाला हा कार्यक्रम आणि त्याचा वार्षिक कार्यक्रम एका भागात संपणे शक्यच नव्हते.

त्यामुळे बिनाकाचा वार्षिक कार्यक्रम दोन भागात प्रसारित करायचे ठरले आणि ती प्रथा १९५७च्या वार्षिक कार्यक्रमापासून सुरू झाली. वर्षातील शेवटच्या दोन बुधवारी हा वार्षिक कार्यक्रम प्रसारित होऊ लागला. त्यापैकी एका बुधवारी १७ लोकप्रिय गीते व दुस-या बुधवारी त्यापेक्षा जास्त लोकप्रिय अशी १५ गीते अशी एकूण त्या वर्षातील ३२ लोकप्रिय गीते रसिकांना ऐकवली जाऊ लागली. ही ३२ संख्या नेहमी दरवर्षी राहिली नाही. पुढे काही वेळा तर वार्षिक कार्यक्रमाच्या दोन भागात ३२ पेक्षाही जास्त गीते ऐकवली जात.

१९५७ च्या दोन भागातील वार्षिक कार्यक्रमातसुध्दा पुढील काही गीते मधुर, चांगली असूनही सामिल होऊ शकली नव्हती. त्यामध्ये जहाँ मैं जाती हूँ (चोरी चोरी), ए प्यासे दिल बेजुबाँ आणि गोरी गोरी मैं (बेगुनाह), चाँद फिर निकला (पेईंग गेस्ट), तारोंकी जुँबापर है (नौशेरवाने आदिल), मुहब्बत जिंदा रहती है (चंगेजखान), पिजंरेके पंछी रे (नागमणी), दुखी मन मेरे (फंटूश), हम पंछी एक डालके चित्रपटाचे शीर्षक गीत तसेच एक गावकी कहानी (रातने क्या क्या ख्वाब दिखाए), सूर ना सजे (बसंत बहार), जप जप जप जप रे (शारदा), कौन आया मेरे मनकेद्वारे (देख कबीरा रोया), वृंदावन का कृष्ण कन्हैया (मिस मेरी), सुब कुछ लुटाके (एक साल) आणि जाने वो कैसे लोग (प्यासा) या गीतांना स्थान मिळाले नव्हते.

रसिकहो पाहिलेत नां आजही आपण मधुर म्हणून ही गाणी ऐकतो पण बिनाकाच्या वार्षिक कार्यक्रमात ती समाविष्ट होऊ शकली नव्हती. का? उत्तर आहे, त्यांच्यापेक्षा सरस गीतांनी तेथे स्थान मिळविले होते. कोणती होती ती गीते?

बिनाकाचा वार्षिक पाचवा कार्यक्रम प्रथम भाग. प्रसारण दिनांक १८/१२/१९५७
३४) जागो मोहन प्यारे – जागते रहो
३३) रेशमी सलवार कुरता जाली का- नया दौर
३२) दिन अलबेले प्यार का- बेगुनाह
३१) छुन छुन करती आई चिडीयाँ- अब दिल्ली दूर नही
३०) जाने क्या तुने कही- प्यासा
२९) ये मर्द बडे दिलसर्द बडे- मिस मेरी
२८) बदला जमाना आहा बदला जमाना- मिस इंडिया
२७) ओ मिस्टर बँजो- हम सब चोर है
२६) कली के रूप मे चली हो- नौ दो ग्यारह
२५) ये रात भिगी भिगी- चोरी चोरी
२४) ए मेरी टोपी पलट के आ- फंटूश
२३) हाय हाय हाय ये निगाहे- पेईग गेस्ट
२२) ठंडी ठंडी हवा पुछे- जॉनी वॉकर
२१) बडी देर भई- बसंत बहार
२०) मिस्टर जॉन या बाबा खान- बारीश
१९) उडे जब जब जुल्फे तेरी- नया दौर
१८) छुप गया कोई रे- चंपाकली
१७) नखरेवाली- नई दिल्ली

या अठरा गीतांचा समावेश करून बिनाकाचा वार्षिक कार्यक्रमाचा पहिला जेव्हा भाग प्रसारित झाला तेव्हा आता दुस-या भागात अशी आणखी कोणती अत्यंत लोकप्रिय गीते असणार? पहिले गीत कोणते येणार? याविषयी प्रचंड उत्सुकता रसिकांत पसरली आणि कदाचित आज हा इतिहास वाचताना तुमच्याही मनात तोच प्रश्न उभा राहिला असेल! १९५७ ची सर्वाधिक जास्त लोकप्रिय १६ गीते की ज्यांचा समावेश बिनाकाच्या वार्षिक कार्यक्रमाच्या दुस-या भागात कण्यात आला होता.

हा दुसरा भाग २५ डिसेंबर १९५७ रोजी प्रसारीत करण्यात आला होता.
१६) मै बम्बई का बाबू- नया दौर, ओ.पी.नय्यर, साहिर, मो.रफी
१५) माँग के साथ तुम्हारा- नया दौर, ओ.पी.नय्यर, साहिर, मो.रफी
१४) ईना मीना डीका- आशा, सी. रामचंद्र, राजेंद्र कृष्ण, किशोर, आशा
१३) नैन मिले चैन कहाँ- बसंत बहार, शंकर-जयकिशन, शैलेंद्र, लता, मन्ना डे
१२) आजा जरा मेरे दिलके सहारे- एक झलक, हेमंत कुमार, एस. एच. बिहारी, हेमंतकुमार-गीता दत्त, साथी
११) मुन्ना बडा प्यारा- मुसाफिर, सलील चौधरी, शैलेंद्र, किशोर कुमार
१०) चुप हो जा अमीरोकी- बंदी, हेमंत कुमार, राजेंद्र कृष्ण, किशोर कुमार
९) माना जनाबने पुकारा नही- पेईंग गेस्ट, एस. डी. बर्मन, मजरूह, किशोर कुमार
८) अंटम फंटम छोड दे बाबू- हम सब चोर है, ओ.पी.नय्यर, मजरूह, आशा भोसले
७) ओ रात के मुसाफिर- मिस मेरी, हेमंत कुमार, राजेंद्र कृष्ण, मो.रफी, लता
६) छोड दो ऑचल जमाना- पेईंग गेस्ट, एस. डी. बर्मन, मजरूह, किशोर, आशा
५) ऑखो मे क्या जी- नौ दो ग्यारह, एस. डी. बर्मन, मजरूह, किशोर, आशा
४) पंछी बनू उडती फिरू- चोरी-चोरी, शंकर-जयकिशन, हसरत, लता, मन्ना डे, साथी

आणि या गीतांनंतर १९५७ ची सर्वात लोकप्रिय तीन गीते होती ती मोहम्मद रुफी यांचीच होती. क्रमांक तीनवर ‘मिस्टर एक्स’ चित्रपटासाठी मजरूहनी लिहिलेले व एन दत्ता यांनी संगीतबध्द केलेले ‘लाल लाल गाल’ हे गीत! क्रमांक दोनवर ‘सर जो तेरा चकराए’ हे ‘प्यासा’ चित्रपटासाठी साहिरने लिहिलेले, एस.डी.बर्मननी संगीतबध्द केलेले मोहम्मद रुफीनेच गायलेले गीत! आणि १९५७ चे सर्वोत्कृष्ट व प्रचंड लोकप्रिय गीत ‘जनम जनम के फेरे’ चित्रपटातील होते. ते संगीतकार एस.एन.त्रिपाठींनी संगीतबध्द केले होते व भरत व्यास यांनी लिहिलेले होते. रफी व लता यांनी गायलेल्या या गीताचे शब्द होते ‘जरा सामने तो आओ छलिए…’ (क्रमश:)

– पद्माकर पाठक, सातारा