कथा बिनाका गीतमालाची


कलावंतांची जाण ठेवणारी बिनाका

१९८२ साली बिनाका गीतमाला सुरू झाली तेव्हापासून तीन दशके पार करून याही वर्षात बिनाका चालूच होती. लोकप्रिय हिंदी चित्रपट (व गैरफिल्‍मी) गाणी ऐकवणे एवढेच या कार्यक्रमाने उद्दिष्ट ठेवले नव्हते. त्यामुळेच ही गीतमाला ख-या अर्थाने ज्यांच्यामुळे चालू होती त्या गायक-गायिका, संगीतकार, गीतकार यांचा सहभाग ही गीतमाला चालू ठेवण्यात फार महत्त्वाचा होता. याचीच जाणिव ठेवून निवेदक अमिन सयानी बिनाकाच्या साप्ताहिक अगर वार्षिक कार्यक्रमात या कलावंतांचा आदरपूर्वक उल्लेख करीत असत.

त्यांच्याबद्दल माहिती सांगत असत. ज्या कलावंतांचा जन्मदिवस अगर विवाहाची तारीख असेल त्या दिवशी त्यांना शुभेच्छा देत असत. कधी या कलावंतांचया एक-दोन मिनिटांच्या मुलाखतीही ऐकवल्या जात असत. त्यांच्या योगदानाचा उल्लेख हजाराव्या अगर रौप्य महोत्सवी कार्यक्रमात आवर्जून केला गेला.

असाच एक कार्यक्रम १९८२ मधील ६ आणि ७ जानेवारी (बुधवार व गुरूवारी) “बिनाका गीतमाला के बिखरे मोती” या नावाने निवेदक मनोहर महाजन यांनी प्रसारित केला. या कार्यक्रमात बिनाका गीतमालेत ज्यांची गीते सामील झाली होती, पण जे आता हयात नाहीत अशा दिवंगत गायक-गायिका, संगीतकार, गीतकार यांच्या आठवणी आणि त्यांची लोकप्रिय गीते श्रोत्यांना ऐकवली गेली. त्यातून त्यांना एक वेगळी श्रध्दांजली वाहण्यात आली.

२० ऑक्टोंबर १९८२ रोजी बिनाकाच्या १५०० वा कार्यक्रम प्रसारित झाला. या वर्षातील वार्षिक कार्यक्रमात पुढील ‘रनर्सअप गीते’ सामील होऊ शकली नव्हती. ती पुढीलप्रमाणे होती. ‘राजपूत’ चित्रपटातील दोन गीते ‘अकेला गया था मै’ आणि ‘कहानिया सुनाती है पवन’ तसेच ‘देशप्रेमी’ चित्रपटातील दोन गीते ‘मेरे देश प्रेमियो’ आणि ‘जाओ जी जाओ पर इतना’. याचप्रमाणे ‘कौन किसीको बांध सका’ (कालिया), ‘थोडीसी जो पिली है'(लावारिस), ‘हम तुमसे प्यार न करते’ (एकही भूल) , ‘तू तू वही दिल ने’ (ये वादा रहा), ‘फिर चली रात बात’ (बाजार), ‘भँवरेने खिलाया फूल’ (प्रेमरोग).

यावरील गीतांव्यतिरिक्त एकूण ३३ गीते बिनाकाच्या तिस-या वार्षिक कार्यक्रमात सामील होती. त्यापैकी १७ गीते २२ डिसेंबर १९८२ रोजी प्रसारित झालेल्या पहिल्या भागाची ऐकवण्यात आली. ती पुढीलप्रमाणे –

३०) ओ मेघा रे मेघा रे – प्यासा सावन
२९) तेरे जैसा यार कहाँ – याराना
२८) मेरे किस्मत में तू वही शायद – प्रेमरोग
२७) मेरे दिलदार का बांकपन – दीदारें यार
२६) जहाँ तेरी ये नजर है – कालिया
२५) सात सहेलिया खडी खडी – विधाता आणि सारा दिन सताते हो – रास्ते प्यार के
२४) जबसे तुमको देखा देखाही करते है – कालिया
२३) प्यार में दिल पे मार दे गोली – महान
२२) ये जमी गा रही है ऑसमा गा रहा है
२१) उई उई चोरी चोरी बातें हो – स्टार आणि मेरे मेहबुब तुझे सलाम – बगावत
२०) अपने अपने मिया पे सब को – अपना बनालो
१९) ये दिन तो आता है एक दिन – महान
१८) खातून की खिदमतमें सलाम – देशप्रेमी
१७) तू एक डिस्को, में एक डिस्को – खुद्दार
१६) दुग्गी पे दुग्गी हा या सत्ते पे – सत्ते पे सत्ता

क्रमांक २५ आणि २१ वर दोन गीते या कार्यक्रमात ऐकवली गेली कारण त्या त्या दोन गीतांना समान गुण होते, आणि या कार्यक्रमानंतर १९८२ मध्ये बिनाकाच्या या वार्षिक कार्यक्रमाचा दुसरा भाग प्रसारित झाला नाही, तर १९८२ ची सर्वात जास्त लोकप्रिय १६ गीते कोणती होती हे श्रोत्यांना जाणून घेण्यासाठी १९८३ साल उजाडावे लागले आणि ५ जानेवारी १९८३ रोजी बिनाकाच्या तिसाव्या वार्षिक कार्यक्रमाचा दुसरा भाग प्रसारित करण्यात आला.

५ जानेवारी १९८३ रोजी प्रसारित झालेल्या १९८२ मधील लोकप्रिय गीतांचा बिनाकाचा वार्षिक कार्यक्रमाचा दुसरा भाग १६ गीतांनी सजला होता. ती गीते खालीलप्रमाणे होती.

१५) दिल लेना खेल है दिलदार का – जमाने को दिखाना है, आर.डी.बर्मन,मजरूह, आर.डी.बर्मन
१४) बुम बुम मेरे सीने की धडकन हो तुम – स्टार, बिंड्डू, नाजिया हसन
१३) मुझे पीने दे – फिफ्टी – फिफटी, लक्ष्मी-प्यारे, आनंद बक्षी
१२) ये वक्त न खो जाए – रास्ते प्यार के, लक्ष्मी – प्यारे, आनंद बक्षी, एस.पी. बालसुब्रम्हाण्यम, लता मंगेशकर
११) ये गोटेदार लहँगा निकलू जब डाल के – धर्मकाटा, नौशाद, मजरूह, रफी-आशा
१०) मुहब्बत है क्या चीज हमको बताओ – प्रेमरोग, लक्ष्मी – प्यारे, संतोष आनंद, सुरेश वाडकर – लता
०९) जाना, ओ मेरी जाना…धूम तिनकधीन – सनम तेरी कसम, आर.डी.बर्मन, गुलशन बावरा, आशा
०८) दिल चीज क्या है आप मेरी जान – उमराव जान, खय्याम, शहरयार, आशा
०७) ए राजू, ओ डॅडी मम्मी से तुम मेरी – एकही भूल, लक्ष्मी – प्यारे, आनंद बक्षी,एस.पी. बालसुब्रम्हाण्यम, राजेश्वरी
०६) बोलो बोलो कुछ तो बोलो सामनेवाले ले गए – जमाने को कुछ दिखाना है, आर.डी.बर्मन, मजरूह, आशा – आर.डी.बर्मन
०५) मै हुँ प्रेमीरोगी मेरी दवा तो कराओ – प्रेमरोग, लक्ष्मी – प्यारे, अमीर कजलबाश, सुरेश वाडकर
०४) कितने भी तू करले सितम – सनम तेरी कसम, आर.डी.बर्मन, गुलशन बावरा, आशा – किशोर

आणि या गीतांनंतर १९८२ मधील सर्वात जास्त लोकप्रिय अशी तीन गीते खालीलप्रमाणे ठरली होती. क्रमांक ३ वर बप्पी लहरी यांनी संगीतबध्द केलेले, इंदीवर यांनी लिहिलेले आणि उषा उत्थप यांनी गायलेले ‘अरमान’ चित्रपटातील ‘रम्बा हो रम्बा हो, मै नाचू तुम नाचो’ हे गीत होते. तर क्रमांक दोनवर कल्याणजी-आनंदजी यांचे संगीतातील अंजान यांचे किशोरकुमार आणि साथींनी गायलेले ‘नमक हलाल’ चित्रपटातील ‘पग घूँगरू बाँध मीरा नाची थी’ हे गीत होते.

आणि क्रमांक एकवर राजेश रोशन या संगीतकाराने मजरूह यांच्या गीताद्वारे आपले सवामित्व स्थापित केले. ‘खुद्दार’ चित्रपटासाठी लता मंगेशकर, किशोर कुमार यांनी गायलेले ते १९८२ मधील सर्वात जास्त लोकप्रिय गीत होते. ‘अंग्रेजी में कहते है की, आय लव्ह यू…’

क्रमांक ९ वर २ गीते होती. कारण दोन्हींचे गुण समान होते. या १९८२ मध्ये तीन गैरफिल्मी गीते बिनाकामध्ये सामील झाली होती. पण यापैकी कोणतेही गीत वार्षिक कार्यक्रमात सामील होऊ शकले नाही. त्या तीन गीतांची लोकप्रियतेच्या आधारे क्रमवारी खालीलप्रमाणे होती.

३) अभिलाषा है ये मेरी तेरे संग रहुँ – अब्बा
२) चल डिस्को चल – चल डिस्को चल – शेरॉन प्रभाकर
१) डिस्को एक्सप्रेस – सुपर रूना मधील सर्वात लोकप्रिय गीत होते.

– पद्माकर पाठक, सातारा