सखी

मातृत्व

 

आरोग्यविषयक लेख

 

संगोपन

 

महिला विषयक

प्रत्येक स्त्रिला आई, पत्नी, गृहिणी, व्यवसायिक अश्या अनेक भूमिका पेलाव्या लागतात. कुठलाही कोर्स न करता तिचे ‘मल्टीटास्किंग’ आणि ‘मॅनेजमेंट स्कील्स’ इतके अफलातून असतात की ह्या सा-या भूमिका ती समर्थपणे पार पाडत असते. आमचे ‘सखी’ हे सदर ह्या ‘मल्टीडायमेंशनल’ महिलांसाठीच आहे. ह्यात त्यांना विविध विषयांवरचे लेख वाचायला मिळतील.

बाळाचे प्लॅनिंग

Conception मातृत्व ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनातली आनंदाची घटना आहे. पण फारच कमी वेळा हे गर्भारपण पूर्वनियोजीत असते. पूर्वनियोजीत म्हणायचे कारण की भावी मात्यापित्याच्या आरोग्य, आर्थिक, मानसिक तयारी नुसार pregnancy should be by choice and not by chance. पण बरेच वेळा संकोच, बेफिकीरपणा, “व्हायचे तेव्हा होणारच आहे” ह्या दृष्टिकोनामुळे ह्या गोष्टीला महत्त्व दिले जात नाही. पण हल्लीची नवीन पीढी ह्या बाबत जागरुक झालेली आहे. नेटवरचा विश्वकोष http://en.wikipedia.org/wiki/Fertilization ह्या लिंकवर तुम्ही गेलात तर तुम्हाला स्त्री-पुरुषाचे बीज फलीत होणे म्हणजे काय समजेल. ह्या पानावर प्रथम फुलांचे परागीकरण, नंतर प्राण्यांचे आणि माणसांमधले फलन दिले आहे. त्यामुळे एकूणच सृष्टीतल्या ह्या निसर्ग नियमाच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतील. ह्या नंतर स्त्री-पुरुषांच्या प्रजोत्पादन अवयवांची माहिती होणे आवश्यक आहे. http://www.goodhealthnyou.com/body/femalereprod.asp, ह्या साईटवर स्त्रीच्या प्रजोत्पादन अवयवांचे चित्र आहे. प्रत्येक अवयवाला क्रमांक देण्यात आला आहे. क्रमांकावर माऊस नेल्यास त्या अवयवांची संपूर्ण माहिती आपल्याला मिळते. ह्या विषयासंबंधात सोपे प्रश्न आणि उत्तरे वाचायची असल्यास जनसंख्या स्थिरता शोध ही साईट वेगळी आहे. http://www.jsk.gov.in/male_female.asp ह्या लिंकवर स्त्री-पुरुष जनन अवयवांची सोप्या पध्दतीने माहिती दिली आहे. ह्या साईटच्या इतर लिंक्स ही अत्यंत माहितीपूर्ण आहेत. येथे आपल्याला जगाची तसेच भारताच्या लोकसंख्येबद्दल विस्तृत माहिती मिळते. त्याबद्दलचे विविध ग्राफ्सही आपल्याला येथे क्लिक करुन मोठे करुन पाहता येतात. आपल्याला येथे युनिसेफचे व्हिडीयोजही बघता येतात. ‘थेट उत्तरे’ ही लिंकही अत्यंत माहितीपूर्ण आहे. आपले कुटूंबच नाही तर आपल्या देशाच्या वास्तवाचेही भान आपल्याला ही प्रश्न-उत्तरे वाचून येते.

http://www.planababy.com/SEXUAL%20ACTIVITY.HTM, ह्या साईट्सवरही स्त्री-पुरुष जनन अवयवांची माहिती चित्रांसकट तुम्ही वाचू शकता. ह्या साईट्सवर बाहेरचे आणि आतील जनन अवयवांची माहिती दिली आहे. त्यामुळे विषय समजायला अधिक सोपा वाटतो.

जनन अवयवांची माहिती मिळवल्यानंतर स्त्रीबीज चक्र (ovulation cycle) समजणे आवश्यक आहे. स्त्रीचा मासिक धर्म आणि बीजाची निर्मितीवर वैद्यकीय तपासण्या न करता खालिल काही साईट्सच्या माहितीनुसार तुम्ही प्लॅनिंग करु शकता. लक्षात घ्या, वैद्यकीय तपासण्यांना पर्याय म्हणून नव्हे तर पूरक म्हणून ह्या साईट्सच्या माहितीचा वापर करावा –

http://www.ovulation-calculator.com/preconception/preconception.htm, www.babycenter.com/ovulation-calculator, www.early-pregnancy-tests.com/ovulation-calculator.html, ह्या सगळ्या साईट्सवर थोडयाफार फरकाने ‘Ovulation Calculators’ दिले आहे. येथे तुम्ही तारखेनुसार आपल्या मागच्या पाळीची तारिख घालायची, दिवसांमध्ये असणारी पाळीची नियमितता घालायची आणि ‘कॅलक्यूलेट’ क्लिक करायचे. तुम्हाला ‘ओव्हूलेशन’ची तारिख, बाळंतपणाची तारिख आणि गर्भाचे (राहिला असल्यास) वय कळते. प्रत्येक वेळेला सोनोग्राफीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. अंदाजे स्त्रीबीज चक्र आपल्या सहज काढता येते त्यामुळे हल्ली बरेच मातापिता आता ह्या माहितीचा लाभ घेतांना दिसतात.

http://www.indiaparenting.com/whealth/index.shtml ह्या साईटवर खास महिलांसाठी वेगळा विभाग आहे. त्यामध्ये मातृत्वचे प्लॅनिंग, स्त्रीबीज चक्र, गर्भारपण, संगोपन ह्या विषयी विस्तॄत माहिती वाचायला मिळते. ह्या विषयांवरच्या चर्चासत्रात (Discussion board) तुम्ही प्रत्यक्ष सहभागी होऊ शकता. त्यामुळे देशविदेशातल्या उत्सुक मात्यापित्यांशी तुम्ही समान पातळीवर चर्चा करु शकता. इतक्या चर्चा आणि साईटसचे वाचन केल्यावर एव्हाना तुमच्यात आईबाबा होण्याचा आत्मविश्वास नक्कीच येतो.

मग अचानक एखाद्या दिवशी पाळी चुकल्याचं तुमच्या लक्षात येतं, मळमळ होते, सकाळी थकवा येतो, खूप भूक लागते … दिवस राहिले वाटतं? नेटवरही ह्या विषयी आपल्याला माहिती सापडते – http://www.earlysignsofpregnancy.org/, www.babycenter.com/pregnancy-symptoms, www.childbirth.org/articles/pregnancy/signs.html, www.surebaby.com, http://www.vardaan.net/pregnancy-symptoms.php, ह्या सगळ्या साईट्सवर गर्भार राहिल्यावर होणारे सृक्ष्म बदल जसे की शरिराचे तापमान वाढणे, बध्दकोष्टता, वारंवार लघवी होणे, सतत खाण्याची इच्छा होणे किंवा अन्नावर वासना न रहाणे इत्यादी शारिरीक बदलांविषयी वाचायला मिळते. असे होण्यामागची कारणंही त्यांनी दिल्यामुळे मातेला आत्मविश्वास येतो. माहिती वाचून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवत असतील तर आनंदाची बातमी आहे हे समजायला हरकत नाही अर्थात ह्याला डॉक्टरांकडूनही शिक्कामोर्तब व्हायला हवं. गर्भारपणाचे हे आनंदी आणि अमोल वर्ष तुम्ही आता पुढचे नऊ महिने अनुभवणार आहात. ह्या विषयी अधिक माहिती पुढच्या लेखात घेऊ या.

आपल्या प्रतिक्रीया आणि माहिती हवे असलेले विविध विषय जरुर कळवावेत.

– भाग्यश्री केंगे