सखी

संगोपन

“दिवस तुझे हे फुलायचे”

साधारण असा अनुभव आहे की शैशव आणि बाल्यावस्थेत आईबाबांकडून होणारे मुलांचे कौतूक आणि लाड पौगंडावस्थेत अचानक कमी होतात. पौगंडावस्थेला इंग्रजीत अतिशय योग्य नाव आहे Adolescence, मूळ लॅटीन शब्दाचा अर्थ आहे adolescere = (to) grow. पौगंडावस्था ही मानवाच्या बाल्य आणि प्रौढावस्थेची मधली वर्षे. पौगंडावस्थेत यौवनावस्था किंवा puberty ही सर्वात महत्त्वाची. ह्या शारिरीक बदलांसोबत मानसिक, भावनिक, सामाजिक बदलही मुलांमधे होत असतात. तुलनेने मुलींना पौगंडावस्था थोडी लवकर म्हणजे १०-१२व्या वर्षी तर मुलांची १२-१४व्या वर्षी येते. म्हणजेच साधारणपणे १३ ते १९ वर्षे पौगंडावस्था असते. काहीजणांमध्ये ही वर्षे थोडी लवकर किंवा थोडी उशीराचीही असू शकता. पौगंडावस्थेचा अर्थ आणि माहिती सोप्या भाषेत http://en.wikipedia.org/wiki/Adolescence येथे आहे.

मुलींची पौगंडावस्था हा बहुतेक वेळेला काळजीचा आणि चर्चेचा विषय ठरतो. मुलींना बहुतेक वेळा चुकीच्या आणि पारंपारिक पध्दतीने आयुष्याच्या ह्या वास्तवाला सामोरे जावे लागते. घरात मोकळेपणाचा अभाव आणि अपुरे ज्ञान ह्यामुळे बहुतेक मुली गोंधळलेल्या आणि घाबरलेल्या असतात. मुलगी यौवनात किंवा वयात येण्याचे ठळक लक्षण म्हणजे तिची पाळी सुरु होणे. परंतु हा बदल होण्याआधीच्या काही वर्षांपासूनच शरीर त्याची तयारी करत असते. मुलींची पौगंडावस्था ही पाच अवस्थेत येते. ह्या सर्व अवस्थांची शास्त्रीय माहिती पुढील साईट्सवर आहे –
http://www.puberty101.com/p_pubgirls.shtml, http://www.coolnurse.com/puberty_stages.htm, http://books.google.com/books?isbn=0595342205

सर्वात पहिली अवस्था आहे कुठलेही शारिरीक बदल ठळकपणे न दिसण्याची. हा काळ साधारणपणे ८ ते ११ वयाचा. ह्या वयात वेगाने संप्रेरकांमध्ये (हार्मोनल) बदल होत असतात. हे हार्मोनल बदल किडनीच्यावर असणा-या ‘ऍड्रेनल’ ग्रंथीमधे होतात. ह्या संप्रेरकांद्वारे मेंदूच्या ‘हायपोथॅलॅमस’ भागात आणि ‘पिटयूटरी’ ग्रंथींना संदेश पाठवले जातात. त्यांच्याकडून हा संदेश मुलींच्या अंडाग्रंथींमध्ये (ovaries) दिले जातात. ह्या सगळ्या यंत्रणेला काही वर्षे लागतात.

प्युबर्टीची दुसरी अवस्था साधारण ११-१२ वर्षी ठळकपणे दिसायला लागते. मुलींचे वजन आणि उंची वाढते. स्तनांची किंचीतशी वाढ (breast buds) व्हायला सुरुवात होते. गुप्तांगावर काळे केस येतात. आधी ते सरळ येऊन मग कर्ली होतात. प्युबर्टीच्या तिस-या अवस्थेत साधारण १२-१३ व्या वर्षी स्तनाची वाढ अधिक होते, गुप्तांगावरचे केस अधिक दाट आणि काळे होतात. योनीमार्ग किंचीत मोठा व्हायला लागून कधीतरी अंगावरुन पांढरे (whitish discharge) जाते. काही मुलींची पाळी ह्या अवस्थेच्या शेवटी शेवटी सुरु होते. १३-१४व्या वर्षी चौथ्या अवस्थेत पाळी सुरु होते. ह्याला menarche म्हणतात. ओव्ह्यूलेशन सुरु होते परंतु त्याच्यात सातत्य नसते.

शेवटच्या अवस्थेत साधारण पंधराव्या वर्षी मुलींची वाढ पूर्ण होते. स्तनांची वाढ आणि उंचीची वाढ पूर्ण होते. दर महिन्याला ओव्ह्यूलेशन होऊन पाळी नेमाने येते. ह्या अवस्था साधारणपणे सुदृढ भारतीय मुलींच्या आहेत. ह्यामधे प्रदेश, आहार, मानसिक व शारिरीक आरोग्यानुसार बदल होऊ शकतात. तुलनेने अफ्रिका व अमेरिकेतल्या मुलींची वाढ झपाटयाने होते व त्यांची यौवनावस्था लवकर येते. काही अपवादात्मक वैद्यकीय केसेही असतात जसे ‘स्कायला जोन्स’ ह्या अमेरिकन मुलीची पाळी चौथ्यावर्षीच सुरु झाली ह्या विषयीचा रिपोर्ट http://abcnews.go.com/Health/story?id=2610353 येथे वाचायला मिळतो.

पौगंडावस्था किंवा त्या वेळेला होणा-या शारिरीक बदलांविषयीची शास्त्रीय माहिती आपल्याला फक्त इंग्रजीत वाचायला मिळते. मातृभाषेत अश्या प्रकारचे लेखन नेटवर जवळजवळ नाहीच. मराठीवर्ल्ड डॉट कॉमने ह्या विषयी ई-बूक वाचकांसाठी उपलब्ध करुन दिले आहे.

पौगंडावस्थेत मुलांमधले शारिरीक बदल मुलींइतके ठळकपणे जाणवत नाही. मुलांची पौगंडावस्था साधारणपणे ११ ते १९वर्षे असते. त्यामुळे बरेचवेळा एकाच वर्गातल्या असल्यातरी मुली मुलांपेक्षा मोठ्या वाटतात. ११ ते १४ वर्षापर्यंत मुलांना बहुतेक सर्वांगावर केस येतात. ह्या मधे चेह-यावर, गुप्तांगावर, छाती, पाय, हातावरचे केस ठळकपणे येतात. टेस्टोस्टेरॉन संप्रेरके वाढल्यामुळे स्वरयंत्राची लांबी वाढून आवाजात फरक होतो. बरेच वेळा चिरक्या आणि घोग-या आवाजामुळे मुलांना लाज वाटत असते. ह्या संप्रेरकांमुळे मुलाच्या शरीराला आकार प्राप्त होतो. त्याची छाती आणि दंड अधिक पुष्ट दिसायला लागतात. ह्याच वेळेला तैलग्रंथी अधिक कार्यरत होतात त्यामुळे चेह-यावर तारुण्यपिटीका वाढतात. साधारण १२ ते १८व्या वर्षी मुलांना आपले शिश्न ताठर होण्यामुळे गोंधळायला, लाजयला आणि घाबरायला होतं. “wet dream” मुळेही मुले अतिशय घाबरलेली असतात. अश्या वेळेला समवयस्क मित्रांकडून मिळालेल्या चुकीच्या माहितीपेक्षा पालकांनी अधिक सजगपणे आपली भूमिका बजावली पाहिजे. नेटवर अत्यंत सोप्या शास्त्रीय भाषेत माहिती वाचायची असल्यास –
http://www.coolnurse.com/puberty_stages_guys.htm, http://www.kidshealth.org/kid/grow/boy/boys_puberty.html, parentingteens.about.com/od/pubertyinboys

मुला-मुलींच्या शारिरीक बदलांबरोबरच त्यांना अनेक मानसिक, भावनिक आणि सामाजिक आंदोलनांना तोंड द्यावे लागते. ह्याचवेळेला पालक-मुलांमधले संबंध सर्वाधिक तणावाचे असतात. मुले मोठी होत असतात पण पालकांची भूमिका मात्र त्यांच्या लहानपणी होती तशीच म्हणजे ‘व्यवस्थापकाची’ (managers) असते. त्यांची छोटी-मोठी कामे करण्यात व सततचा सल्ला देण्यात पालक धन्यता मानतात. मात्र तणाव टाळून मुलांशी अधिक मित्रत्वाचे नाते स्थापित करायचे असेल तर पालकांनी आपली भूमिका बदलून ‘सल्लागाराची’ (consultant) घ्यावी. आपली मते त्यांच्यावर न लादता, त्यांचा जो काही निर्णय असेल त्याच्या परिणामांना ठाम राहण्यास त्यांना सांगावे.

पौगंडावस्थेत मुलांवर ताण असण्याची शक्यता नाकारता येत नाही जसे शाळेतला अभ्यास आणि शिक्षक, आर्थिक टंचाई, शारिरीक बदल, पालकांचा घटस्पोट, जवळच्या व्यक्तीचे निधन, पालकांच्या अवास्तव अपेक्षा, सतत नकारात्मक आणि निराश्यजनक विचार. ह्यामुळे मुले अधिक चिडचिडी, घुमी, अबोल, आक्रमक होऊन कुटूंबापासून दुरावण्याची शक्यता अधिक असते. ह्यासाठी मुलांशी मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे. मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन, सकस आहार, पुरेशी झोप, सकारात्मक विचार दिल्याने तणावाचे प्रसंग टळू शकतात. ह्या विषयीचे माहितीपूर्ण लेख आपल्याला
http://www.focusas.com/Stress.html,
http://www.linkroll.com/stress/adolescent-stress–managing-stress-throug…,
http://findarticles.com/p/articles/mi_m2248/is_n128_v32/ai_20608733,
http://www.nncc.org/SACC/sac42_adolesc.stress.html

मुले पालकांवर (भारतात अजून तरी) अवलंबून असतात तरी स्वतःच्या आयडेंटीटीसाठी धडपडत असतात. स्वतःचेच विचार त्यांना योग्य वाटतात. त्यामुळे पालकांशी वैचारिक मतभेदांमुळे संबंध बिघडण्याची, मुले व्यसनाच्या अधीन व्हायची, नैराश्य, चिडचिड, उतावळेपणा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्यावेळी पालकांनी आपली भूमिका पालकाची न राहू देता, मित्र-मैत्रिणीची केली पाहिजे.

– भाग्यश्री केंगे