सखी

मातृत्व

तिसरे सत्र – ७, ८, ९ वा महिना

१३ ते २८ आठवडे
Second  trimester चौथा महिना लागताच तुम्हाला अधिक प्रसन्न वाटेल. पहिल्या तीन महिन्यातली मळमळ, अन्नावरची वासना नसणे, थकवा सर्व हळूहळू कमी होऊन अधिक स्फूर्तीदायक वाटेल.

आता तुमच्या बाळाची शारीरिक रचना पूर्ण झाली असेल १४ व्या आठवडात तुमचे बाळ डोक्यापासून ते पायापर्यंत ४ १/२” लांबीचे असेल तसेच वजन साधारणपणे ४५ ग्रॅम असेल. तुमचे बाळ आता हालचाल करू लागेल साधारण पणे १८ ते २२ आठवडापर्यंत ही हालचाल तुम्हाला जाणवायला लागेल.

लघवीच्या व शौचाच्या तक्रारी – पाचव्या महिन्यानंतर गर्भाशयाचा आकार वाढल्याने त्याचा दाब मूत्रपिशवी (bladder) वर येतो व त्यामुळे सारखे लघवीला जावे लागते. शरीरातल्या हारमोन्सच्या बदलामुळे तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे कधीकधी शौचास कठीण होऊ शकते.

20week 5months 5months
२० आठवडे ५ महिने ५ महिने

five trimester ह्याच दरम्यान स्त्रीरोग तज्ञ तुम्हाला सोनोग्राफी, रक्ततपासणी व टी.टी. चे इंजेक्शन देतील. तुमची कॅलशियम व लोहाची गरज वाढल्याने त्याच्या गोळ्या घेण्याचा सल्ला देण्यात येईल.

आता तुमच्या गर्भाशायाचा आकार वाढल्याने तुमचे पोट दिसू लागेल. तुमचा गर्भ २२ आठवडाचा असतांना जवळ जवळ १ पौंडाचा असेल तसेच १० १/२” उंचीचा असेल. इतर अवयवांबरोबरच भुवया व पापण्या येतील. २४ व्या आठवडा दरम्यान डोळ्यांची उघडझाप करू लागेल. २४ ते २८ आठवडादरम्यान तुमचे बाळ अधिक कार्यक्षम असेल. बाळाच्या संवेदना आता अधिक तीव्र झाल्या असतील. प्रखर प्रकाश, मोठा आवाज ह्यांना बाळ प्रतिसाद देतांना आईला जाणवेल. २८ आठवडात तुमचे दुसरे सत्र संपेल. हे सत्र अधिक आनंददायी व स्पुर्तीदायक असेल. बाळाची आता तुम्ही आतुरतेने वाट पहायला लागाल.
(वेळेवर तपासणी
मातेची व बाळाच्या आरोग्याची हमी)

तिसरे सत्र – ७, ८, ९ वा महिना

१३ ते २८ आठवडे
Third trimester तुम्हाला स्तनांमध्ये बदल जाणवू लागतील, स्तनामध्ये सूज किंवा नाजूकपणा (tenderness) जाणवेल. स्तनाग्रांच्या भोवती असणारा काळा भाग (areolas) अधिक गडद तसेच मोठा होईल.

तुमचं बाळ आता २९ आठवडाच असेल. बाळाची वाढ आता झपाटाने होणार तसेच त्याच्या अवयवांना बळकटी येणार. तुमच्या बाळाला अंगभर लव (बारीक केस) येते त्यास lanugo म्हणतात. तसेच बाळाच्या त्वचेचे रक्षण करण्याकरिता पांढरा चिकट द्रव संपूर्ण अंगभर पसरलेला असतो. त्यास vernix म्हणतात. तुमच्या बाळाच्या मेंदूची तसेच फुफ्फुसाची वाढ झपाटाने होते. नाळेद्वारे माता जे सेवन करेल ते बाळापर्यंत पोहोचत असते. बाळाची हालचाल आता तुम्हाला अधिक परिचयाची होते. प्रखर उजेडाला बाळाचे डोळे उघडझाप करू शकतात. आवाजाला प्रतिसाद देतात. जशी जशी प्रसूती जवळ येते तशी बाळाची हालचाल मंदावते. बाळ मोठे झाल्यामुळे गर्भाशयात फिरण्याजोगी जागा नसते. पण हालचाल खूपच कमी झाल्यास डॉक्टरांशी त्वरीत संपर्क साधा.

6months 7months 8months
६ महिने ७ महिने ८ महिने

तुम्ही प्रसुतिगृहात नाव नोंदविले तरी तुमच्या घरी बाळंतपणासाठी आवश्यक साबण, रबरी कापड, कापूस व कापडी गॉज, नाळ बांधण्यासाठी सुती दोरी, स्थानिक स्वच्छतेसाठी नवीन ब्लेड व जंतुनाशक द्रव (डेटॉल, सेट्रिमाइड इ.) तयार ठेवावे.

साधारणपणे कळा यावयास लागल्यावर प्रसुतिगृहात/इस्पितळात जातात, पण कळा न येताही अंगावरून पांढरे पाणी जाऊ लागले, वारंवार लघवीला जावे लागत असेल तर इस्पितळात भरती होणे योग्य ठरेल.