केवळ सिनेफोटोग्राफी, फोटो जर्नालिझममध्ये न अडकता पोर्टफोलिओज, सिनेमा स्टील्स, फूड फोटोग्राफी अशा सर्वच क्षेत्रात आपला कॅमेरा यशस्वीरित्या आजमावून पाहनारा नंदू धुरंदर मुळचा गिरगावचा, सामान्य कुटुंबात जन्मलेला. या मुलाने आपल्या हिमतीच्या आणि कष्टाच्या जोरावर फोटोग्राफीला आत्मसात केले. त्याच्या नशीबाने फोटोग्राफीमध्ये सतत एकाच क्षेत्रात काम करण्याऐवजी त्यातही त्याने अनेक पैलू शोधले, खटपटी केल्या. गेली १४ वर्षं वेगवेगळ्या लोकांच मार्गदर्शन घेत या मुलाने आज आपलं नाव कमावलं आहे,
१९९५ पासून केलेलं नंदू यांच काम आज जागतिक स्थरावर पोहोचले आहे. मधुर श्रॉफ, चेतन भेंडे यांच्याकडून फोटोग्राफीचे धडे घेत नंदूने त्यात आपलं कसब साध्य केलं. शिवाय खास दुबईला जाऊन केलेलं ‘फ्रेश लाइम’ या सिनेमाचे शूट मस्त आहेत. इतकंच नव्हे तर मराठी सिनेमांचे फोटोशूटही नंदूच्या फोटोग्राफीची ओळख करून देतात. ‘रास्ता रोको’, ‘चष्मेबहाद्दर’, ‘एक उनाड दिवस’, ‘गोजिरी’, ‘शुभमंगल सावधान’ अशा अनेक सिनेमाचे शूट्स त्याने केले आहेत.
नंदू धुरंधरने ‘बॉम्बे हाय सिझन्स २०१३’ या कॅलेंडरसाठी मराठी मालिका, मराठी चित्रपट आणि मराठी इंडस्ट्री यामधील कलाकारांना घेऊन त्यांना आपल्या बेस्ट मूड मध्ये कॅमेराबद्ध करण्याचं काम यांनी केलं आहे. प्रत्येक सेलिब्रिटीच्या वाढदिवसाप्रमाणेच या कॅलेंडरचं प्रत्येक पान बनवण्यात आलं आहे. कॅलेंडरमध्ये प्रत्येक कलाकाराच्या स्टाईलिंग मध्ये बॉम्बे हायचे वेगळेपण दिसून येते. हे कॅलेंडर बॉम्बे हायच्या विविध शोरूम्स मध्ये शूट करण्यात आलं आहे.या कॅलेंडरमध्ये महेश मांजरेकर, मृणाल कुलकर्णी, सचिन पिळगावंकर, पूजा सावंत, मनीषा केळकर, मानसी नाईक, प्रसाद ओक, अभिजित केळकर, भार्गवी चिरमुले, किशोरी शहाणे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, आदिनाथ कोठारे, सई ताम्हणकर, अभिजित खांडकेकर, मकरंद अनासपूरे, मनवा नाईक, सचित पाटील, अदिती सारंगधर, राजेश शृंगारपुरे, संदीप कुलकर्णी, नेहा पेंडसे, संतोष जुवेकर, संजय नार्वेकर आदी कलाकारांचा लुक या बॉम्बे हाय सिझन्स मधून मराठी जनापुढे नंदूने आणला आहे.
मराठी सेलिब्रिटींची आकर्षक छायाचित्रे काढून छायाचित्रकार नंदू धुरंधर यांनी काढलेल्या ‘कन्सेप्ट वॉल कॅलेण्डर’मुळे मराठी सेलिब्रिटींना अधिक ग्लॅमर प्राप्त करून देण्याचा उत्कृष्ट प्रयत्न झाला आहे. याचबरोबर टीव्ही मालिकांसाठी स्टील फोटोग्राफी करत असतानाच वेगवेगळ्या लोकांचे पोर्टफोलिओ तसेच स्टील फाटोग्राफी, पोट्रेट फोटोग्राफीबरोबरच नंदू धुरंधर यांनी विविध उत्पादनांची फोटोग्राफी, मॉडेल फोटोग्राफी, फॅशन फोटोग्राफीसाठीही काम त्याने केली आहे. फोटोग्राफीच्या जगतात हे मराठी नाव मानाने उभे आहे.