बालकवयित्री | राधिका लाड |
उन्हाळयाची सुटी अशी घालवू या... | नुपूरमाधुरी तिजारे |
एक ना धड भाराभर चिंध्या | रौनक पत्की |
'बटाटयाची चाळ' | अर्निका प्रकाश परांजपे |
बास झालं आता उतरवा मुखवटा | अर्निका प्रकाश परांजपे |
चित्रांच्या दुनियेत नवनिर्मिती करणारी 'सृष्टी' | अर्चना जोगळे |
ऑस्करच्या पडद्यावर 'लगान' | प्रेरणा भास्कर महाजन |
माझा अविस्मरणीय अनुभव | प्रेरणा भास्कर महाजन |
झाली परिक्षा आज सकाळी
गम्मत अमुची भली भली
चला मुलांनो खेळायला
गम्मत आपली भली भली !
बालमित्रांनो, परिक्षा संपून आता वेध लागले ते निकालाचे. मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात आपले निकालजाहिर होतील. आणि आपण वरच्या वर्गात जावू.
परिक्षा संपली त्या दिवसापासून आपल्या डोक्यावरचं अभ्यासाचं ओझं कमी झालं. आता मज्जाच मज्जा करायची. परिक्षा संपली की कोणी संगणक शिकत असतील, कोणी नाच, गाणं, कोणी वेगवेगळया शिबिरात जातात. दोन वर्षापूर्वी आम्ही बहिणीं सुध्दा एका अशाच शिबिरात गेलो. काय मज्जा आली म्हणून सांगू! तिथे आम्हाला काही पोलीस काकांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. तसेच आम्ही एका ‘वृक्ष-रोप वाटिकेत’ गेलो. तिथे आम्ही भरपूर आंबे खाल्ले. कधी कधी अशा शिबीरातून सुध्दा उपयुक्त माहिती मिळते.
आता उन्हाळयात लग्न-कार्य आलचं. तेव्हा तर नवीन कपडे नट्टापट्टा हे सगळं होतचं. हे पण आपण ‘एन्जॉय’ करायला हवं. हं पण त्या लग्नात ‘कुल्फी’ किंवा ‘आईस्क्रिम’ जास्त खायचं नाही. आणि जास्त हूंदडायचं नाही. नाहीतर तब्येत बिघडते. उन्हाळयाच्या दिवसात एक गोष्ट ध्यानात ठेवायची की उन्हात जाताना कांदा, रूमाल घेऊन जावे. उन्हातून आल्यावर कैरीचं पन्ह प्यायचं म्हणजे ऊन लागत नाही. उन्हाळयात ‘आईस्क्रीम, कोल्ड्रींक’ यांची मजा असते. शाळेच्या दिवसात आपल्याला अभ्यास, शिकवणी व इतर काही क्लासेसमुळे घरात दूर्लक्ष होते. त्यामुळे आपण आईला घरकामात मदत करायला हवी. मी सुध्दा यावेळी आईला पापड करण्यात मदत केली. दररोज झाडझूड करायला हवी. उन्हाळयात बरेचदा पाण्याची टंचाई भासते. त्यामुळे पाण्याचा वापर कमी करायला हवा. त्यामुळे पाण्याची बचत होते.
आता उन्हाळयात मामा मामींकडे जायला काही हरकत नाही मामाकडे गेल्यावर तर सगळयांचीच मजा असते. रोज आईस्क्रीम, कोल्ड्रींक्स ही तर रोजची मेजवानीच म्हणा ना. आजी आजोबांकडे जायची मजा तर औरच असते आणि तेही एखाद्या खेडेगावात असेल तर आणखीच मजा येते. तिथे तर कुलर नसतात, फ्रीज नसतात, मग माठातलं थंडगार पाणी प्यायचं आणि रात्री चंद्राच्या प्रकाशात झोपायचं. आपल्या आजीकडे जर शेत असेल तिथे जाऊन रोज आंबे तोडायला तर खूपच मजा वाटते.
सुट्टया लागल्या की नुसतं खेळू नये. तर थोडसं लिहून पहावं. म्हणजे लिखाणाची सवय लागते. तसेच काही गणितं करून पाहावे म्हणजे ‘पुढे पाठ’ मागे सपाट’ अशी स्थिती होत नाही. काही पुस्तक वाचावे. त्यातली माहिती लिहून घ्यावी. उन्हाळयात वृत्तपत्रात येणाऱ्या गोकुळ, बालजगत, स्पंदन यासारख्या बालसदरामधील काही सुभाषितं, म्हणी, चित्र, कोडे यांचे कात्रण कापून ठेवावे. वृत्तपत्रातील ‘क्रिडाजगत’ पानावरील खेळांची माहिती कापून ठेवावी व त्याची एक सुंदर चिकट वही तयार करावी. आमच्या शेजारी एक अजोबा राहतात. ते तर क्रिकेट ‘ऑलिम्पिक’ स्पर्धासुरू असतानाचे रोज येणारी जी माहिती होती त्याचे कात्रण कापायचे. या कात्रणांची आपल्याला बरेचदा मदत होते. एखाद्या वेळी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने किती रन काढले तर कधी कुणाची सेन्चुरी हेच माहित नसते. तेव्हा ह्याची मदत होते. मी सुध्दा एक अतिशय छानसं खेळाचं पुस्तक वाचलं त्यात सुध्दा छान-छान माहिती होती. आता जून महिना जवळ येतोय. तेव्हा आपल्याला आठवण येते ती पर्यावरण दिनाची. 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन आपण साजरा करतो. तेव्हा आपण आतापासूनच त्याचे चित्र, कविता काही नारे लिहायला हवे. याचं सगळया माहितीचं प्रदर्शन आपण भरवू शकतो. मागच्या वर्षी आम्ही सुध्दा एक प्रदर्शन भरवलं होतं.
तर आता यातलं काय काय करता येतं ते बघा. कारण मला टाटा बायबाय म्हणायची वेळ आलीय. बरं, तर बालमित्रांनो पुन्हा भेटूच शाळ सुरू झाल्यावर तोपर्यंत बाय!