बालमुक्तांगण कविता – खेळ

खेळ नम्रता पवार सूर्यफूल मकरंद मनगोळी
शतकात नम्रता पवार हत्ती आणि मुंगी मकरंद मनगोळी
दिवाळी नुपूरमाधुरी तिजारे कोंबडी नीता सोहनी
गुढीपाडवा नुपूरमाधुरी तिजारे पिकनिक नीता सोहनी
बालजगत नुपूरमाधुरी तिजारे कॉम्प्युटर नीता सोहनी
सुटीची मजा नुपूरमाधुरी तिजारे होळी परमानंद राऊत
आजीचा उपवास नुपूरमाधुरी तिजारे कान्हा मारू नको पिचकारी श्रीधर वसंतराव घुले
सुर्य आणि चंद्र नुपूरमाधुरी तिजारे लबाड कोल्होबा दिपक शिंगण

खेळ

सारखीच आई तुझीच घाई
सांगू नको काम सारखं करायला
जाऊ देना आता तरी खेळायला
जाऊ देना आता तरी खेळायला…

परीक्षेला करीन अभ्यास
नाव उज्ज्वल करेन तुम्हा माता-पित्याचे
अभिमानाने सांगाल कौतुक आमचे
जाऊ देना आता तरी खेळायला…

उज्ज्वल भविष्यात होऊ मोठे
ताठ मानेने फिरू सगळीकडे
नाही होणार गर्व जास्त त्या शिक्षणाचा
जाऊ देना आता तरी खेळायला…

तुझ्या इच्छा पूर्ण करू
तुझ्या म्हणण्याने वागू
असू दे आशीर्वाद तुम्हा माता-पित्याचा
जाऊ देना आता तरी खेळायला…

शतकात

२१व्या शतकात
मिळाला ज्ञानपीठी पुरस्कार
असती ते विंदा करंदीकर

२१व्या शतकात
लोकसभेत चालू आहे
सध्या भ्रष्टाचार

२१व्या शतकातील
अंतराळवीर कोण
कल्पना चावला असे सदाथोर

२१व्या शतकातील
महान देश कोण
तो म्हणजे माझा भारत देश महान

दिवाळी

दिवाळीचा सण आहे, सर्व सणांचा राजा
खुप खा, खुप खेळा, असते आम्हा मुलांची मजा

शाळेला असते या दिवसात सुट्टी
अभ्यंगे स्नाने व सुगंधी उटी

नवे कपडे घालून फटाके उडवायचे
मनी येईल तसे स्वच्छंद बागडायचे

लाडू, चिवडा, चकल्या गोड ते अनारसे
वरणभात खाण्यात लक्ष फारसे नसे

दिवाळीच्या दिवशी घरी दिव्यांच्या ओळी
सडा घालून अंगणी काढू रंगीत रांगोळी

मित्र मैत्रीणींना आमंत्रण देऊ
दीन-दुबळयांनाही जरा सोबत घेऊ

गुढीपाडवा

चैत्र शुध्द प्रतिपदेचा
दिवस उजाडला नवा
घेऊन आला सोन्याचा हा
दिन गुढीपाडवा !!

नवे वर्ष हे गात येते
पाडव्याला दारी
कर्तृत्वाची विजय पताका
पहा फडकली घरोघरी !!

चैत्र पल्लवी वृक्षलतांची
नवीन आशा यश सौख्याची
चंद्रकोर ही नवीन दिसते
उंच उंच या नभी अंबरी !!