आढावा गतवर्षाचा अर्थातच २००८ सालचा

तसे बघायला गेलात तर आपण बरेच जण साधारणपणे डिसेंबर महिन्यात किंवा फार तर उशीरात उशीरा म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवडयात नवीन वर्षाचे कॅलेंडर बघायला घेतो. शनिवार, रविवारला जोडून कुठल्या सुट्या येत आहेत ते पहातो. पण या वर्षीच्या सुरुवातीला अस नक्की झालं नसेल. कस होणार…आपण सर्व २००८ च्या शेल शॉक मधून बाहेरच पडलो नव्हतो. संपल एकदाच लॉक…स्टॉक…बॅरल ते २००८ साल. चला पाहू या काय घडलं साल २००८ मध्ये.

राजकारण
यंदाचे राजकारण धोरण विरहीतच होते. डाव्यांनी सरकारचा पाठिंबा काढल्यावर ज्या समाजवादी पक्षाला आधी कॉग्रेंस दूर ठेवत होती त्याचीच कास शेवटी सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसला घ्यावी लागली. विरोधी पक्षांचे अस्तित्वच जाणवत नव्हते. सोनिया गांधी किंवा मनमोहन सिंग यापैकी कुणीही राजकारणावर आपली छाप पाडू शकले नाही. तरी यू.पी. त सोनिया गांधी विरुध्द मायावती ही जुगलबंदी चांगलीच रंगली. युपीच्या राजकारणाने पुन्हा एकदा चुकीच्या कारणाने उचल घेतली. मी माझ्या वाढदिवसासाठी कोणालाही पैसे गोळा करायला सांगितले नाही हे एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला सांगाव लागते यात तर लोकशाहीचा पराभव आला. महाराष्ट्रात तर राज्यकर्त्यांनी किंवा विरोधकांनी उल्लेखनीय असे काहीच केले नाही. गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनी राज्याच्या विकासाला महत्त्व दिले. टाटांचा नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये खेचून आणला. त्याच नॅनो प्रकल्पामुळे पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी प्रकाशात आल्या. २००८ सालात वर्षाच्या शेवटी मध्य प्रदेश (एम.पी), दिल्ली, राजस्थान, व जम्मू काश्मिरात निवडणूका झाल्या. एम.पी.त बीजेपीने निर्णायक बहुमत मिळविले तर दिल्लीत कॉग्रेंस पक्षाने शिला दिक्षितांच्या नैतृत्वाखाली सलग तीनदा विजयी पताका फडकावली. राजस्थानात काँग्रेसने बी.जे.पी.ला सत्तेपासून पायउतार केल. राजस्थानच्या ‘भूमीपुत्रांनी’ वसुंधरा राजेंची साथ सोडून कॉग्रेसची कास धरली. विशेष उल्लेख करावा लागेल तो जम्मू आणि काश्मिर निवडणूकांचा, फुटीरतावाद्यांच्या धमकीला न जुमानता तेथील ६०% जनतेने मतदानाचा हक्क बजावला. बी.जे.पी.ने याच निवडणूकात घवघवीत यश मिळवून १० पेक्षा जास्त जागा जिंकल्या. आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेतील निवडणूकांच्या बातम्याच महत्त्वाच्या ठरत होत्या. या निवडणुकांमध्ये अमेरिकेचे वननिर्वाचित राष्ट्राध्यक्ष श्री. बराक ओबामा तसेच हिलरी क्लींटन व सारा पालिन यांना बरीच प्रसिध्दी मिळाली.

क्रिडा
राजकिय तसेच सामाजिक क्षेत्रात अस्थिरता असतांना भारताला यावर्षी क्रिडाक्षेत्रात घवघवीत यश मिळाले. ऑलंपिक स्पर्धेत अभिनव बिंद्राने नेमबाजीत भारताला पहिलेवहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. कुस्तीत सुशील कुमार तसेच बॉक्सिंग मध्ये विजेंदर सिंग यांनी वैयक्तीक कास्यपदके तसेच बॉक्सिंगमध्ये यांनी वैयक्तिक कास्यं पदके मिळविली. विश्वनाथन आनंदने जागतिक बुध्दीबळ स्पर्धा पुन्हा एकदा जिंकली. भारताच्या सायना नेहवाल या युवतीने बॅडमिंटन खेळात अतुलनीय कामगिरी केली. जागतिक युवा बॅडमिंटन स्पर्धेत सायना विजयी ठरली. तर ऑलंपिक मध्ये तिने उपउपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. तिच्या या कामगिरीमुळे ती ‘स्पोर्टस् वूमन ऑफ द ईअर’ यात शंकाच नाही. भारतीय हॉकी बद्दल न बोललेले बरे. फुटबॉल संघाने मात्र बर्‍याच वर्षांनी एशियन फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य गटात प्रवेश मिळविला. भारतीय क्रिकेटला हे वर्ष छान गेले. भारताने कसोटीत व एक दिवसाच्या सामन्यात काही संस्मरणीय असे विजय मिळविले. सचिन कसोटीत सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज ठरला. इंग्लंड विरुध्दच्या पहिल्या कसोटीत विजय मिळवून देतांना मारलेले शतक आयसिंग ऑन द केक ठरले. अनिल कुंबळे तसेच सौरव गांगुली या भारतीय क्रिकेटपटूची निवृत्ती मनाला रूखरूख लावणारी ठरली. भारतीय संघातल्या खेळाडूंनी त्या दोघांनाही एकदम ‘चकदे फटे’ फेअरवेल दिला. महेंद्रसिंग धोनीने दिल्ली कसोटीच्या शेवटच्या दिवशी खांद्यावर घेतलेला अनिल कुंबळे भारतीय क्रिकेट रसिकांच्या कायमच्या स्मरणात राहिल.

अर्थकारण
यावर्षी भारतातल्या नव्हेच तर जगभरातल्या अर्थकारणात फारसा अर्थच नव्हता. कोसळणारी अर्थव्यवस्था, पडणारा शेअर बाजार २००८ सालच्या आर्थिक मंदीचे स्त्रोतक होते. बिग बुलने यावर्षी गुंतवणूकदारांना सर्वात मोठी हूल दिली. वीस हजारापर्यंत पोहोचलेला सनसेक्स तब्बल दहा हजारापर्यंत गडगडला. रोजच्या inflation (इनफ्लेंशन) ने सामान्य नागरिकांना Hypertension (हायपरटेंन्शन) दिले. कच्चा तेलाच्या किंमती १४४ डॉलर प्रति बॅरल एवढया वाढल्या. सोने कधी नव्हे इतके महागले. आर्थिक मंदीने सिटी बँक, लेहमन ब्रदर्ससारख्या कंपन्या अडचणीत आल्या. सबप्राईम क्रायसेस, बेलआऊट पॅकेज, मेल्ट डाऊन हे शब्द सामान्य नागरिकाला अगदी अर्थासकट समजायला लागले. २००८ सालात रूपया ५० ते ५९ प्रति डॉलर इतका घसरला व सरते शेवटी ४८ वर स्थिरावला. गेल्या काही वर्षातील ही सर्वात मोठी आर्थिक (दु:) स्थिती होती.

चित्रपट
२००८ सालात भरपूर चित्रपट गाजावाजा करीत आले. त्यातले काहीच चालले पण बरेच पडले. गजनी, सिंग इज किंग, जोधा अकबर, रेस, फॅशन, जाने तू या जाने ना हे चित्रपट चालले. लव्ह स्टोरी २०५०, युवराज, द्रोना, हे चित्रपट दणकून आपटले. गोलमाल रिटर्नस्, वेडनेसडे (Wednesday), आमिर हे चित्रपट या वर्षातील सरप्राईज हिट होते. या वर्षीचा रिमार्केबल परफॉरमन्स म्हणाल तर, आमिरचा ‘गजनी’ मधला. दोस्ताना चित्रपटातील जॉनचे देहप्रदर्शन बरेच गाजले. ‘मा का सिंदूर’ मध्ये अडकलेली चित्रपट सृष्टी ‘मा का लाडला’ म्हणायला लागली हेही नसे थोडके.

अतिरेकी कारवाया
२००८ सालात एकूण आठ अतिरेकी हल्ले भारतावर झाले. या हल्ल्यामध्ये झालेला २६ नोव्हेंबर २००८ चा अतिरेकी हल्ला सगळयात भितीदायक होता. त्याचा बिमोड करतांना महाराष्ट्राने आपले तीन महत्त्वाचे पोलिस अधिकारी गमावले. हल्लेखोरांना कंठस्नान घालण्यासाठी एन.एस.जी कमांडोजची मदत घेण्यात आली. सामान्य मनुष्य फक्त उद्वेगाने त्याकडे पाहत राहण्याखेरीज काहीही करू शकत नव्हता. त्यातच राजकारण्यांच्या ‘वैचारिक दिवाळखोरी’ मुळे सामान्य नागरिकांच्या रागात भर पडली. भारताच सरकार या हल्ल्यांना उत्तर द्यायचे सोडाच पण आंतरराष्ट्रीय सहानभूती मिळविण्यातही यशस्वी ठरले नाही हे सरकारचे अपयशच म्हणावे लागेल.

२००८ सालात प्रसिध्द व्यक्तींनी उच्चारलेली वाक्ये

1. Advani’s autobiography follows a simple principal – whatever good happened attmibuted to him and whatever bad to vajpayee – Congress party spokesman Mr. Abhishek singhvi.

2. If 20 – 20 format compared with fashion, I’d like to name bikini cricket – Rahul Dravid.

3. I do not have copyright over this name – If used non commercially.

4. Status of leaders should come up when they are alive, It will give them some satisfaction.

5. With all the pulling up I have been subjected to, I should have been taller by a couple of inches – Nevy chief admiral Suresh Mehta an reporting of media that he had been pulled up by defence ministore.

6. We are reparing an areoplane while its still in flight. – C.B. Bhave (Chairman of SEBI on financial farmoli)

7. Dreams are not those you get while sleeping dreams are those that don’t let you sleep. – Mr. Akhil Kumar, Indian Boxer Olympics.

तर असे हे वर्ष २००८. भारत देशाची चंद्रावर स्वारी बघायला लावणारे, अरविंद आडिगा या भारतीय लेखकाला त्यांच्या व्हाईट टायगर या पुस्तकासाठी बुकर पुरस्कार मिळवून देणारे, ऑटो कंपन्यांची पडझड बघायला लावणारे, राजकारणी लोकांचा बेगडीपणा आणि त्यांची वैचारिक दिवाळखोरी जगाला दाखवून देणारे, ओबामांना अमेरिकेत सर्वसर्वा म्हणून निवडून आणणारे, अतिरेकी कारवायांमुळे भारतात तब्बल ४०० बळी घेणारे, चिरंजीवी या दाक्षिणात्य सुपरस्टारला राजकिय पक्ष स्थापन करायला लावणारे, अक्षयकुमारला सुपरस्टारच्या जवळ पोहचवणारे, सत्यमच्या असत्य दर्शनाची जगाला ओळख करून देणारे, पुन्हा एकदा आमिर खानला चर्चेत आणणारे….

थोडक्यात काय तर असे हे ‘Better to Forget’ वर्ष. २००९ सालात आपण पाऊल टाकलेच आहे. २००८च्या घटनांमुळे बर्‍याच जणांनी २००९ मध्ये कदाचित निराशेतच प्रवेश केला असेल पण एक लक्षात ठेवायचं आपण आपलं काम प्रामाणिकपणे पण अधिक सजगपणे करत रहायचे. God help those, those who help themselves.

येणा-या दिवसांसाठी लाख लाख शुभेच्छा.

– मंदार माईनकर, मुंबई