दूर्गा पूजा

दूर्गा पूजा हा उत्सव पंचमी पासून दस-या पर्यंत बंगाल, बिहार, झारखंड, ओरिसा ह्या राज्यांमध्ये अत्यंत धूमधडाक्यात साजरा केला जातो. जवळच असणा-या नेपाळ, भूतान आणि बांगला देशातही हा उत्साहात साजरा होतो. अशी अख्यायिका आहे की श्रीरामाने रावणाचा वध करण्याकरिता दूर्गादेवीला पाचारण केले होते आणि मग दस-याला तिने रावणाचा वध केला. असे ही म्हणतात ह्या दहा दिवसात पार्वती आपल्या पित्याकडे म्हणजेच हिमालयाकडे माहेरपणाला येते. बंगालमध्ये देवीचे मोठमोठे पंडाल उभारले जातात. बंगाली लोक नवे कपडे आणि मिठायांचा आस्वाद घेत रात्री उशीरा पर्यंत पंडाल पाहात हिंडत असतात. अधिक माहितीसाठी –

www.durga-puja.org, www.bangalinet.com/durgapuja.htm,
en.wikipedia.org/wiki/Durga_Puja,
www.123durgapuja.com,
www.calcuttaweb.com/puja/index.shtml,
festivals.iloveindia.com/durga-puja/index.htm,
www.durgapujagreetings.com, park.org/India/Durga,
www.madurgapuja.com

माहूरची रेणूकादेवी
माहूर हे रेणूकादेवीचे जन्मस्थान समजले जाते. रेणूका ही जम्दग्नी ऋषींची पत्नी व परशूरामाची माता होय. राजा सह्स्त्रार्जून रेणूकेच्या रुपावर भाळून तिला वश करण्याची अनेक वाईट कृत्ये करु लागला. त्यापासून संरक्षण मिळावे म्हणून रेणूका मातेने तलावात उडी घेतली. सा-या देवतांनी रेणूकामातेला परत जीवदान दिले. हा तलाव हिमाचल प्रदेश मध्ये आहे. पुढे त्याच्या कृत्या बद्दल परशुरामांनी सह्स्त्रार्जूनाचा संहार केला. महाराष्ट्रात चांदवड येथेही रेणूकादेवीचे जागृत देवस्थान आहे. अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Renuka,
http://www.bharatheritage.in/maharashtra/excursion_pilgrimages.htm,
www.fortsofsahyadri.com/temples_caves_in_sahyadri.htm,
www.nandedcity.in, www.maharashtra.gov.in/marathi/mahInfo/nanded.php,
www.geocities.com/gurumandir_karanja/temple_links.html,
www.hindubooks.org/temples/maharastra/kolhapur/page1.htm, wikimapia.org/1444364

वणीची सप्तशृंगी
नाशिक जवळ असणारे वणी हे भाविकांचे श्रध्दास्थान आहे. येथे सात डोंगरांच्या मध्ये देवीचे मंदिर आहे म्हणून ह्या देवीला सप्तशृंगी देवी असे म्हणतात. हे जागृत स्थान समजले जाते. पूर्वी डोंगरावर जाणे अवघड होते परंतु आता पाय-या केल्यामुळे भाविकांच्या सोईचे झाले आहे. देवीचे रुप रौद्र असून तिला नऊ हात आहेत तसेच नाकात ठसठशीत नथही आहे. मूर्ती थोडीशी उंचीवर असल्यामुळे लांबूनही आपल्याला पाहता येते. नेटवर अगदी थोड्याच साईटस वणीची माहिती देणा-या सापडल्या –
http://nashik.com/saptshrungi-devi-vani, http://en.wikipedia.org/wiki/Vani_(Nashik),
http://en.wikipedia.org/wiki/Saptashrangi, www.swamisamarth.com/parampara/beedkar.html,
bbs.keyhole.com/ubb/showthreaded.php/Number/140919,
books.google.com/books?isbn=819019125X, http://saptashrungi.net/online_darshan.html

विजयादशमी
दसरा किंवा विजयादशमी हा दिवाळी इतकाच संपूर्ण भारतात वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात पाटी पूजन, शस्त्र आणि यंत्र पूजन केले जाते तर म्हैसूर मध्ये चामूंडेश्वरी मंदिरात हत्तीच्या अंबारीत देवीला सलामी दिली जाते, बंगाल मध्ये देवीच्या पंडाल मध्ये उत्सव असतो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी असून सोने किंवा मोठया वस्तू खरेदीसाठी शुभ समजला जातो. नेटवर ई-शुभेच्छापत्रे, पदार्थांच्या रेसिपीज आणि ह्या सणाविषयी अधिक माहिती आपण वाचू शकता. अधिक माहिती साठी –
festivals.tajonline.com/dassera.php, www.bawarchi.com/festivals/dassera.html,
www.hindunet.org/festivals/vijayadashami, www.cuisinecuisine.com/Festival%20Of%20Dassera.htm ,
festivals.iloveindia.com/dussehra, www.vedantavision.com/articles/dassera.html,
www.mailerindia.com/hindu/veda/index.php?dussera,
www.punediary.com/html/dassera.html, www.mantraonnet.com/dassera-2001.html,
en.wikipedia.org/wiki/Dasara, www.mysoredasara.com

दूर्गा माता
दूर्गा हे देवीचे सर्वात रौद्र रुप. वाघावर अरुढ झालेली, आठ हात असणारी आणि हातात वेगवेगळे शस्त्र असणारी ही दूर्गा माता जणू स्त्री शक्तीचे रुपच. महिषासूर नावाच्या राक्षसाला ठार मारण्यासाठी देवांना सरस्वती, पार्वती आणि लक्ष्मीला पाचारण करावी लागली. प्रत्येक देवतेने आपआपल्या शक्तीतून साकार केली ती दूर्गा देवी. तिनेच महिषासूराचा संहार केला. संपूर्ण भारतात दूर्गा देवीची अनेक मंदिरे आहेत व त्यांची दहा दिवसात पूजा केली जाते. अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Durga, www.hindunet.org/god/Goddesses/parvati_durga,
www.sanatansociety.org/hindu_gods_and_goddesses/durga.htm,
www.durga-puja.org/about-goddess-durga.html, www.koausa.org/Gods/God1.html,
www.lotussculpture.com/durga.htm , www.mantraonnet.com/108durganames.htm,
www.astroshastra.com/store/indian/divineidols/durga.asp,
www.hindunet.org/god/Goddesses/kalimata/index.htm

तुळजापूरची भवानी
तुळजाभवानी ही भोसले घराण्याची कुलदेवता. छत्रपती शिवाजी महाराज युध्द मोहिमेवर निघतांना तुळजादेवीचा आर्शिवाद घ्यायला जरुर येत. देवीच्या नावावरुनच तुळजापूर हे नाव गावाला मिळाले. देवीची मूर्ती स्वयंभू असून आठ हात आहेत आणि सिंहासनावर अरुढ आहे. बालाघाट येथे असणा-या ह्या मंदिराला दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत. ह्या मंदिराशी निगडीत पौराणिक कथा आपल्या वेगवेगळ्या साईट्सवर वाचायला मिळतात. अधिक माहितीसाठी –
www.indiantemples.com/Maharashtra/bhavani.html,
en.wikipedia.org/wiki/Bhavani osmanabad.nic.in/html/temple.html,
www.hindubooks.org/temples/maharastra/tuljapur/page1.htm,
www.travelmasti.com/domestic/maharashtra/othercities7.htm,
www.access-india.com/maharashtra-pilgrimage-bhavani-temple-tuljapur.htm,
www.blessingsonthenet.com/travel/showtourdetail.asp?tourid=T1077,
www.flickr.com/photos/39527119@N00/page2

– सौ. भाग्यश्री केंगे