पितृपक्ष

आपल्या पूर्वजांना श्रध्दांजली वाहण्याचे, आठवण्याचे दिवस. ह्या पंधरा दिवसात तिथीनुसार दिवंगत वयस्कर मंडळी, घरातल्या सधवा-विधवा स्त्रिया, लहान-तरुण मुलं, अपघाताने मरण पावलेल्या व्यक्ती इत्यादी अनेकांसाठी प्रत्येक दिवस ठरलेला असतो. त्या व्यतिरिक्त तिथीप्रमाणेही श्राध्द करण्यात येते. नेटवर ह्या विषयी काही साईट्सवर विस्तृत माहिती सापडते. अधिक माहितीसाठी –

www.sanatan.org/en/festivals/hindu/pitrupaksha.htm,
www.sanatan.org/weekly/2003/191/messages.htm,
spirituality.indiatimes.com/articleshow/-1077620409.cms,
spirituality.indiatimes.com/articleshow/-1040240971.cms,
www.surfindia.com/festivals/pitr-paksha.html,
swatisharma.sulekha.com/blog/post/2007/09/pitru-paksha-shraddh-in-2007.htm,
www.siddhayoga.org/holidays/natural-cycles/pitru-paksha.html,
www.hindu-blog.com/2007/09/pitru-paksha-shraddh-in-2007-annual.html

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
पाच सप्टेंबरला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून सा-या भारतात साजरा केला जातो. ह्या अत्यंत हुशार तत्वज्ञाचा जन्म तामिळनायडूत तिरुत्तनी गावात ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण त्याच गावी पूर्ण झाले. पुढे त्यांना सर किंग जॉर्ज कॉलेजात तत्वज्ञान शिकविण्यासाठी नियुक्त करण्यात आले. १९५२ साली ते भारताचे प्रथम उपराष्ट्रपती झाले आणि १९५६ साली भारतात दुसरे राष्ट्रपती झाले. डॉ. राधाकृष्णन ह्यांना १९५४ साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी तर्फे त्यांचा स्मृती प्रित्यर्थ विद्यार्थांना पुरस्कार दिला जातो. त्यांची तत्वज्ञानावरची अनेक पुस्तके प्रसिध्द आहेत. अश्या ह्या भारतातील श्रेष्ठ शिक्षकाविषयी अधिक माहिती हवी असल्यास –
en.wikipedia.org/wiki/Sarvepalli_Radhakrishnan,
www.liveindia.com/freedomfighters/11.html,
festivals.iloveindia.com/teachers-day/india/dr-radhakrishnan.html,
www.iloveindia.com/indian-heroes/sarvepalli-radhakrishnan.html,
www.kidsfreesouls.com/drkrish.htm, pastpresidentsofindia.indiapress.org/rad.html,
http://www.pitara.com/magazine/people/online.asp?story=37,
http://www.biographybase.com/biography/Radhakrishnan_Sarvepalli.html

शिक्षकदिन
पाच सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे दुसरे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या जन्मदिनी त्यांचे सहशिक्षक आणि विद्यार्थी त्यांचा वाढदिवस साजरा करायला गेले होते. त्यावेळी डॉ. राधाकृष्णन म्हणाले की जन्मदिवस साजरा करण्यापेक्षा हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा झाल्यास अधिक आनंद होईल. माता, पिता इतकेच गुरुलाही देवाचे स्थान आहे. जगभरातल्या देशात वेगवेगळ्या तारखेला शिक्षकदिन साजरा होतो जसे इंडोनेशिया २५ सप्टेंबर, इराण २ मे, मलेशिया १६ मे, मेक्सिको १५ मे, अमेरिका ७ सप्टेंबर, रशिया ५ ऑक्टोंबर… ह्या दिनाच्या अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Teacher’s_Day,
festivals.iloveindia.com/teachers-day/poems/index.html,
www.indianchild.com/teachers_day_india.htm, www.dgreetings.com/teachersday,
www.funmunch.com/events/teachers_day/teachers_day_history.shtml, www.funmunch.com/events/teachers_day/index.shtml, www.nea.org/teacherday,
www.123greetings.com/events/teachersday

ऑनलाईन वृत्तपत्र
सकाळच्या चहाबरोबर वृत्तपत्र वाचनानाने आपणा सर्वांची सुरुवात होते. पण ह्यातले काही रसिक (वृत्तपत्रावर खर्च न करता) तसेच परदेशस्थ हल्ली नेटवरच त्याचे वाचन करतात. आता बहुतेक वृत्तपत्रांच्या साईटस आहेत. तेथे प्रथम नोंदणी करुन आपल्याला वृत्तपत्र वाचता येते. वृत्तपत्राची पाने जशी लावलेली असतात तश्याच प्रकारे ‘नॅव्हीगेशन लिंक्स’ असतात. त्यानुसार बातम्या वाचता येतात. ह्या वेबसाईट्स दररोज अपडेट होतात. त्यावर जुने वृत्तपत्राचे ‘आरकाईव्ज’ ही वाचता येतात. जगभरातले वृत्तपत्र वाचायचे असल्यास http://www.onlinenewspapers.com ह्या साईटला भेट द्यायलाच हवी. भारतातली वृत्तपत्र वाचायची असल्यास खालील साईट्स बघायलाच ह्व्यात –
http://timesofindia.indiatimes.com, http://www.indianexpress.com,
http://www.dnaindia.com, http://www.mid-day.com
ही यादी खरतर लांबत
जाणारी आहे. त्यापेक्षा http://www.onlinenewspapers.com/india.htm ला भेट दिलीत तर भारतातली सगळी वृत्तपत्र एकाच वेळेला पाहता येतील.

ऑनलाईन मासिके
वृत्तपत्राप्रमाणेच आता मासिकेही ऑनलाईन आहेत. येथेही पानांप्रमाणे लिंक्स लावलेल्या असतात. त्यानुसार आपल्याला सदरे वाचता येतात. ह्या वेबसाईट्स महिन्याला अपडेट होतात तसेच त्यावर जुने काही लेख अथवा ‘आरकाईव्ज’ ही वाचता येतात.
खालील काही मासिकांच्या वेबसाईट्सला जरुर भेट द्या –
www.outlookindia.com, www.businessweek.com, www.dimdima.com,
www.nationalgeographic.com, www.littleindia.com, www.chitralekha.com,
www.indiacurrents.com, filmfare.indiatimes.com, www.loksatta.com/lokprabha,
http://www.thebookservice.com/womans_era.htm, www.allindianewspapers.com/magazines.html

ऑनलाईन लायब्ररी
घरबसल्या आपल्याला ऑनलाईन लायब्ररीतून पुस्तके वाचता येतात. जगातली सर्वात मोठी ऑनलाईन लायब्ररी असे म्हणारी वेबसाईट म्हणजे http://www.questia.com येथे साधारण १.५ कोटी लेख, संदर्भ वाचाण्यासाठी आहेत. अर्थात येथे वाचण्यासाठी शुल्क नाही पण साईटचे सभासद होणे मात्र जरुरी आहे. इंग्रजी साहित्यात जर तुम्हाला रुची असेल तर http://www.literature.org ह्या ऑनलाईन लायब्ररीला जरुर भेट द्या. भारतीय ऑनलाईन लायब्ररी http://www.sandarbha.com अजून भेट देण्यासारख्या ऑनलाईन लायब्ररी आहेत – ww.library.britishcouncil.org.in, www.ipl.org/div/news/browse/IN,
www.libraryspot.com, www.healthlibrary.com

ऑनलाईन मराठी पुस्तके
मराठी पुस्तके फारशी वाचण्यासाठी नेटवर उपलब्ध नसली तरी खरेदीसाठी मराठी प्रकाशकांच्या साईट उपलब्ध आहे. येथे प्रत्येक प्रकाशकांची पुस्तके ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आपण त्या पुस्तकाविषयीची माहिती वाचून खरेदी करु शकता. पुस्तकाचे शुल्क क्रेडिट कार्डने भरता येतात. खरेदीसाठी जरुर बघा –
http://popularprakashan.com, www.rasik.com, http://www.mehtapublishinghouse.com,
www.tarladalal.com, www.nashik.com, www.marathisahitya.com,
www.marathipustaka.com, http://www.prathambooks.org/order.htm

ई-बुक्स
इंटरनेटामुळे ई-बुक्सची संकल्पना अस्तित्वात आली. अमेरिकेत ई-बुक्स वाचकांमध्ये लोकप्रिय आहे. आता भारतातही ई-बुक्सची संकल्पना रुजते आहे. अर्थात संगणका समोर तासनतास बसण्याची तुमची तयारी हवी. दिलेल्या लिंक्सवर क्लिक करुव आपल्याला विविध पुस्तके वाचता येतात. काही साईट्स जरुर बघा –
http://www.ebooks-online.com, http://www.free-books.org, www.ebooks.springerlink.com, www.arvindguptatoys.com, www.free-books.org, www.ladybird.com

– सौ. भाग्यश्री केंगे