बहुगुणी आवळा

थंडीत बाजारात सर्वत्र आवळा विकायला येतो. चवीला तुरट आणि आंबट असणारे हे फळ ‘व्हिटॅमिन सी’ ने संपन्न आहे. आवळयाची फळ, फुल, पान, बिया, झाडाची साल, मुळे सर्व काही उपयुक्त आहे. आयुर्वेदात आयुष्य आणि ताकद वाढवणारा आवळा म्हणून खूपच उपयुक्त आहे. चवनप्राश, त्रिफळा चूर्ण ही आवळ्याची लोकप्रिय औषधे. शॅंपू सारख्या सौंदर्य प्रसाधनांमध्येही आवळ्याचा उपयोग केला जातो. अधिक माहितीसाठी –

www.ayurvediccure.com/amla.htm,
www.natural-cure-guide.com/natural-cure/amla.htm,
en.wikipedia.org/wiki/Amla,
www.allayurveda.com/herb_month_january2005.htm,
www.dabur.com/EN/Products/Personal_Care/Hair_Care/Amla,
www.indianfoodforever.com/food-guide/wonderful-amla.html,
www.healthtips.in/benefits_of_amla.asp,
www.amla.co.in/content/faq.asp,
en.wikipedia.org/wiki/Indian_gooseberry

च्यवनप्राश

“साठ साल के बुढे या साठ साल के जवान” ही पूर्वी दूरदर्शनवर लागणारी च्यवनप्राशची जाहिरात सगळ्यांच्याच लक्षात असेल. बलवर्धक, प्रतिकारशक्ती वाढवणारे, तारुण्य राखणारे हे टॉनिक च्यवन ॠषींनी तयार केल्याचा संदर्भ चरक संहितेत आढळतो. काळपट-तपकिरी रंगाची घट्ट पेस्ट असणा-या च्यवनप्राशमध्ये आवळा हा मुख्य घटक आहे. त्याच बरोबर अश्वगंधा, ऍसपरॅगस, हळद, मध, साखर, साजूक तूप इत्यादी महत्त्वाचे घटक च्यवनप्राश मध्ये आहेत. च्यवनप्राशच्या सेवनाने प्रतिकारशक्ती तर वाढतेच श्वसनाचे रोगही आटोक्यात राहतात, कॅलशिय हाडांमध्ये शोषायला मदत होते, मासिक ऋतुचे त्रास कमी होतात … असे आणि अनेक फायदे च्यवनप्राशचे आहेत. अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Chyawanprash,
www.dabur.com/en/products/Health_Care/Health_Supplements/Chyawanprash,
www.herbalcandy.net,
www.chakrapaniayurveda.com/chyawanprash.html,
www.doshabalance.com/Ayurvedic_medicalfoods/Chyawanprash.html,
www.naturetherapy.com/dabur/chyawanprash.htm,
www.kitchendoctor.com/Ayurveda/Chyawanprash.html,
www.harmonyindia.org/hportal/VirtualPageView.jsp?page_id=451,
www.herbalsaarogya.com/chyawanprash.html

च्यवन ॠषीं

भृगु ऋषींचे पुत्र च्यवन जंगलात तपस्चर्या करत असतांना शर्याती राजाजी कन्या सुकन्या तेथे विहारास येते. चुकून तिचा स्पर्श च्यवन ऋषींना होतो. आपल्या पती व्यतिरिक्त परपुरुषास स्पर्श करण्यास अनुमती नसल्यामुळे शर्यातीने च्यवन ॠषींना सुकन्येशी विवाह करण्या विनंती केली. च्यवन ऋषीं त्यावेळी वृध्द होते त्यामुळे त्यांनी राजाकडून काही महिन्यांची मुदत मागून घेतली. ह्या वेळेत त्यांनी आवळ्या पासून तारुण्य, बल, शक्ती परत मिळवणारे रसायन तयार केले ‘च्यवनप्राश’. पाच हजार पेक्षाही जुने असणारे हे रसायन आजही सेवन केले जात आहे. अधिक माहिती साठी –
http://www.geocities.com/bhagvatjee/bhaag/kathaa/skandh9/2chyavan.htm,
www.geocities.com/bhagvatjee/bhaag/biog/biog/biog1a-f.htm,
www.sawf.org/bin/forum.dll/getentry?id=7835&view=&pn=Forum&fn=,
https://www.vedamsbooks.com/no21150.htm,
swargarohan.com/Bhagavata/Chapter09/03.htm,
wikimapia.org/434364,
www.awgp.org/books/english_articles/herbal_medicines.pdf,
www.kamaraja.com/howitworks.htm,
www.youtharia.com/howitworks.htm

सुकामेवा – बदाम

थंडी पडायला लागली की सुक्यामेव्यांना भरपूर मागणी असते, बदाम हा त्यातील प्रमुख आणि सर्वांचा आवडीचा. बदाम मूळचा इराणचा पण आता सा-या जगभर स्थिरावला आहे. आपण खातो ती खरं तर बदामाच्या झाडाची बी आहे. बदामाची ही बी आहे त्या स्वरुपात खालली जाते किंवा भाजून, तूप, मीठ किंवा मध लावून अथवा प्रक्रिया करुन खाल्ली जाते. बदाम वेगवेगळ्या पदार्थात वापरले जातात तसेच त्याचे दूध काढले जाते किंवा तेलही काढले जाते. बदाम हा व्हिटॅमिन ई चा मुख्य स्त्रोत असून सौंदर्यवर्धक आहे. अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Almond, www.almondsarein.com,
www.whfoods.com/genpage.php?tname=foodspice&dbid=20,
www.nutsforalmonds.com/nutrition.htm,
www.calorie-count.com/calories/item/12061.html,
www.nutritiondata.com/facts-C00001-01c20nl.html,
www.cookingnook.com/almonds-nutrition.html,
http://www.tipsandtreats.com/beauty-tips.asp,
living.oneindia.in/beauty/skin-n-body-care/ancient-beauty-secrets.html,
http://living.oneindia.in/beauty/skin-n-body-care/ancient-beauty-secrets.html

सुकामेवा – काजू

सुक्यामेव्यातला काजू हा मूळ ब्राझिलचा. पोर्तुगीज लोक त्याला काजू (caju) म्हणत त्यामुळे आता जगभरही तो ह्याच नावाने ओळखला जाऊ लागला. काजूच्या फळाला येणारी बी खालली जाते. काजूला मीठ, तिखट किंवा भाजूनही खाल्ले जाते. काजूची फेणीही प्रसिध्द आहे. भारतात समुद्रकिनार पट्टी असणा-या कोकण, गोवा, केरळ ह्या भागात काजू मुबलक प्रमाणात होतो.
www.cashew.in, http://en.wikipedia.org/wiki/Cashew_nuts,
www.udupipages.com/home/ind/cashew.html,
www.tafcorn.tn.gov.in/Tender/TendercashewNut.htm,
www.indiancommodity.com/Gen/cashew.htm,
agmarknet.nic.in/rawcashewnutgmr.pdf,
www.vittalcashew.com/health.htm,
www.cashewindia.org/html/c0600hea.htm,
vasatwiki.icrisat.org/index.php/Cashew_nut,
www.bawarchi.com/health/queries52.html,
agriculture.exportersindia.com/dry-fruits

– सौ. भाग्यश्री केंगे