कृष्ण कमळ

मराठीत कृष्ण कमळ, हिंदीत झुमका लता आणि इंग्रजीत पॅशन फ्लॉवर म्हणून ओळखले जाणारे हे फुल मुळ ब्राझिल आणि अर्जेंटीनाचे. कृष्ण कमळाचा वेल बागेत आवर्जून लावला जातो. कृष्ण कमळचे फुल निळ्या, जांभळया रंगात अतिशय वैशिष्टयपूर्ण आहे. हिंदू धर्माप्रमाणे ह्याला महाभारताचे प्रतिक मानतात. कारण ह्यांच्या पाकळ्याची रचना थोडीफार तशीच आहे, मध्ये कृष्ण, नंतर पांडव आणि कौरव. इसाई धर्माप्रमाणेही कृष्ण कमळ हे येशू ख्रिस्ताचे प्रतिक आहे. ह्या मध्ये येशूला ठोकलेले तीन खिळे, काटेरी मुकूट असा संकेत देतात. त्यामुळे कृष्ण कमळ अतिशय पवित्र मानले गेले आहे.
अधिक माहितीसाठी –

en.wikipedia.org/wiki/Passiflora_caerulea,
gardenline.usask.ca/plants/passion.html,
www.tradewindsfruit.com/blue_passion_flower.htm,
www.passionflowerstory.com/index.html,
www.flowersofindia.net/catalog/slides/Blue%20Passion%20Flower.html,
davesgarden.com/guides/pf/go/1264/, www.floridata.com/ref/P/pass_cae.cfm,
www.ratemyscreensaver.com/nature/the-blue-passion-flower,
www.backyardgardener.com/plantname/pd_bf08.html,
www.ebop.govt.nz/weeds/Weed315.asp,
www.tradewindsfruit.com/blue_passion_flower_pictures.htm

कळ लावी
मराठी कळ लावी, हिंदीत करी हरी आणि इंग्रजीत ग्लोरी लिली नावाने ओळखले जाणारे हे फूल अतिशय वैशिष्टयपूर्ण आहे. फुलाचे पाच किंवा सहा परागकण लांब पसरलेले असतात तर पाकळ्या वैशिष्टयपूर्णपणे एकमेकांना जुळलेल्या असतात. ह्या मिटलेल्या पाकळ्यांचा आकार पोकळ अंडाकृती सारखा दिसतो. वेलीवर पसणारी ही फुले विषरी समजली जातात. त्यामुळे पोटदुखी, बेशुध्दी, केस जळणे वगैरे त्रास होऊ शकतो. तरी सुध्दा ह्याचा वापर विशिष्ट पध्दतीने अफ्रिकेत औषधांसाठी केला जातो. अतिशय मोहक असणा-या ह्या फुलांचे तिकीटही भारतीय सरकारने प्रकाशित केले आहे. श्रीलंकेचे तर हे राज्य फूल आहे.
अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Gloriosa_(plant),
www.flowersofindia.net/catalog/slides/Glory%20Lily.html ,
msucares.com/news/print/sgnews/sg06/sg060713.html ,
medind.nic.in/jal/t05/i3/jalt05i3p188.pdf ,
www.hindu.com/seta/2006/03/16/stories/2006031604971600.htm ,
www.floridata.com/ref/G/glor_rot.cfm , books.google.co.in/books?isbn=1561642746…,
www.weeds.org.au/cgi-bin/weedident.cgi?tpl=plant.tpl&ibra=all&card=E19 ,
www.indg.gov.in/agriculture/crop_production_techniques/medicinalcrops/glory-lily ,
www.naturehills.com/product/glory_lily.aspx

मधुमालती
वसंतात सर्वत्र दिसणारी मधुमालती लाल, गुलाबी व पांढ-याची छटा असणारी फूले मंद सुवासामुळे शोभेसाठी आवर्जून लावली जातात. मधुमालती अशियात आपल्याला सर्वत्र सापडते. असे म्हण्तात मधुमालती मुळची बर्माची त्यामुळेच इंग्रजीत Rangoon Creeper, Burma creeper म्हणतात. मधुमालतीचे फळ बदामासारखे लागते. मधुमालती फक्त शोभेसाठी नव्हे तर औषधी गुणांसाठीही उपयुक्त आहे. फळ, पान, फुल, मुळ्यांचा उपयोग औषधासाठी करण्यात येतो. मधुमालतीचा वेल अतिशय वेगाने वाढणारा असतो आणि त्याची फारशी काळजी घ्यावी लागत नाही. त्यांमुळे बगीच्यामध्ये मधुमालती आवर्जून लावली जाते. अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Rangoon_creeper, zipcodezoo.com/Plants/Q/Quisqualis_indica.asp,
sliceoftheday.wordpress.com/2007/06/07/rangoon-creeper-quisqualis-indica,
toptropicals.com/catalog/uid/QUISQUALIS_INDICA.htm,
www.indianetzone.com/5/the_rangoon_creeper.htm ,
www.flowersofindia.net/catalog/slides/Rangoon%20Creeper.html,
www.flickr.com/photos/dinesh_valke/349233673,
www.kerala.gov.in/keralacallfeb_08/pg30a.pdf

मोहाची फुले
मोहाची फुले किंवा Indian Butter Tree हे भारतातील जंगलांमधून महत्त्वाचे अत्यंत उपयुक्त झाड. ह्या झाडाचे लाकूड किंमतीचे आहे त्यापेक्षाही मोहाची फुले ही अत्यंत चविष्ट आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. फेब्रूवारी ते एप्रिलच्या दरम्यान पानगळ होऊन मादक गंधाची फुले यायला सुरुवात होते. ही फुले एकत्र किंवा गुछ्याने रात्री फुलतात. पहाटे ही फुले वजन न पेलल्यामुळे खाली पडतात. ही फुले आदिवासीचे प्रमुख अन्न आहे. त्यापासून ते भाजी, भजी आणि दारु तयार करतात. मोहाचे खोड आणि फळेही औषधी गुणाने उपयुक्त असतात. वृक्ष तोडीमुळे ह्यांची संख्या कमी होत आहे त्यामुळे अधिक जोमाने मोहाची लागवड करण्याची गरज आहे. अधिक माहितीसाठी –
www.indianetzone.com/4/the_mohwa_tree.htm,
www.plantnames.unimelb.edu.au/Sorting/Madhuca.html ,
sliceoftheday.wordpress.com/2007/10/02/mahua-madhuca-indica,
books.google.co.in/books?isbn=8122400132…,
www.geocities.com/vibhaskumar/plant_ism2.html,
www.vidyaonline.net/arvindgupta/cowen.pdf,
www.novodboard.com/Mahua.pdf

इक्सोरा
वर्षभर, विशेषता वसंत ॠतुपासून फुललेल्या इक्सोराचे लाल, गुलाबी, राणी, पिवळ्या पांढ-याचे विविध शेड्स आपले लक्ष वेधून घेतात. फुलांना वास नसलातरी एकत्रीत असल्यामुळे त्यांचे मोठे गुछ आकर्षक दिसतात. ही मुळची अशियाई फुले असून आता त्याची लागवड अमेरिकेतही केली जाते. ह्या झाडाची विशेष काळजी घ्यावी लागत नाही त्यामुळे बागेत ह्याची आवर्जून लागवड केली जाते. चार पाकळ्याचे फुल असणारी ही इक्सोराची फुले तोडून पाण्यात ठेवल्यास जास्त काळ टिकतात. हिंदू धर्मात देवालाही इक्सोराची फुले वाहिली जातात. इक्सोराचे औषधी उपयोगही केले जातात.
अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Ixora, www.flowersofindia.net/catalog/slides/Ixora%20red.html,
en.wikipedia.org/wiki/Ixora_coccinea, www.webindia123.com/garden/flowers/ixora.htm,
mgonline.com/ixora.html, www.tropicalfreshflowers.com/ixora-tropical-flowers.html,
pixrat.ibibo.com/picture/tag/ixora, www.indianetzone.com/5/ixora_shrub.htm,
www.floridata.com/ref/I/ixor_coc.cfm, books.google.co.in/books?isbn=0824806980…

कडूनिंब
बहुगुणी कडूनिंब हा मूळ भारत आणि बर्माचा. साध्या जमिनीतही जलद वाढणारा कडूनिंब घनदाट सावलीसाठी आणि हवा शुध्द ठेवण्यासाठी ठेवला जातो. कडूनिंबाच्या कडू गुणामुळे त्याचा वापर दातून पासून ते अगदी विविध किटकनाशकांमध्ये होतो. ह्याच कारणांसाठी कडूनिंबाची पानेही धान्य, पुस्तकांमध्ये ठेवली जातात. कडूनिंबाच्या फळापासून म्हणजेच कडूनिंबापासून खत तयार केले जाते. कडूनिंबाची छोटी पिवळी फुले सौम्य असली तरी सुखावणारी असतात. औषधी असणा-या कडूनिंबाच्या अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Neem, www.haryana-online.com/flora/neem.htm,
www.ecoindia.com/flora/trees/neem-tree.html , nal.res.in/pdf/ff/21.pdf,
www.svlele.com/neem.htm , books.google.co.in/books?isbn=0894991876…,
www.twnside.org.sg/title/pir-ch.htm, www.merinews.com/catFull.jsp?articleID=131690,
www.insinet.net/jasr/2007/1050-1055.pdf, www.boloji.com/ayurveda/av063.htm,
www.organicindia.com/neem.php, www.organicneem.com

– सौ. भाग्यश्री केंगे