गुलमोहोर

वसंतात फुलणारा गुलमोहोर ‘ऑरनमेंटल ट्री’ म्हणून ओळखले जाते. त्याला ‘पिकॉक ट्री’, ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’ म्हणूनही ओळखले जाते. भारताबरोबरच बांगलादेश, चीन, हॉंगकॉंग, तैवान, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेत मात्र फ्लोरिडा राज्यात ही फुले पाहायला मिळतात. प्रत्येक देशात गुलमोहोर फुलण्याचा कालावधी वेगवेगळा असतो. ही झाडे घनदाट सावलीसाठी लावली जातात. झाडाचा घेर मोठा असल्याने त्याचा सावलीत इतर झाडे वाढण्याची शक्यता कमी होते. कॅनबेरीया देशात ‘शाक-शाक’ नावाने ओळखले जाणारे ह्या गुलमोहोरविषयी अधिक जाणून घेण्यासाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Royal_Poinciana, www.flowersofindia.net/catalog/slides/Gulmohar.html,
www.habitatworld.com/con-gulmohar.asp, www.boloji.com/poetry/3601-3700/3691.htm,
www.maayboli.com/hitguj/messages/75/75.html, www.webshots.com/search?query=Gulmohar,
khusbu.rediffiland.com/blogs/2007/12/18/gulmohar.html

पळस

पळस, पलाश, धाक, पॅरट ट्री अश्या वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणा-या ह्या झाडाला वसंतऋतूत लाल फुलांचा बहर येतो. साधारण १५ सें.मी वाढणारे हे झाड अनेक अशियाई देशात पाहायला मिळते. पळासाच्या झाडाचे वैशिष्टय म्हणजे प्रत्येक छोटया फांदी तीनच पाने आपल्याला पाहायला मिळतात. त्याची फुले मोठी असून लाल आणि नारिंगी रंगात पाहायला मिळतात. ह्या झाडाविषयी नेटवर फारशी माहिती उपलब्ध नसली तरी काही साईटसवर आपल्याला वाचायला मिळते. अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Palash, forum.vorras.net/agriculture/?read=353106,
http://spirituality.indiatimes.com/articleshow/-1799077021.cms,
spirituality.indiatimes.com/articleshow/-1799077021.cms,
www.sacred-texts.com/hin/seh/seh23.htm, www.artoframachandran.com/node/199,
www.the-tree.org.uk/Sacred%20Grove/Buddhism/bodhi5.htm, www.flickr.com/photos/k_shreesh/440765969/,
www.travelblog.org/Asia/India/Madhya-Pradesh/Bhopal/blog-254161.html, ruralphotography.blogspot.com/2008/02/palash-most-beautiful-tree-on-earth.html

पांगारा

मराठीत पांगारा, हिंदीत पांगरी, इंग्रजीत इंडीयन कोरल ट्री म्हणून ओळखले जाणारा हा वृक्ष जानेवरी ते मार्च महिन्यात बहरतो. पांगा-याची फुल मऊ आणि लालभडक असल्यामुळे दूरुनच आकर्षून घेतात. फुलांना खास सुगंध नसतांनाही ही फुले पक्षांचे आवडते स्थान आहे. कावळे, मैना, बुलबुल, खंडया असे अनेक पक्षी येथे घर करुन असतात. त्यामुळे फुलांचे परागीकरण होऊन बिया सहजरित्या जंगलात पसरु शकतात. काही जातींमध्ये ह्या झाडाची कोवळी पानेही खालली जातात.

त्याच्या लाकडाचाही उपयोग केला जातो. पुराणात कृष्णाने इंद्राच्या बागेतून पांगा-याची फुले चोरल्याची कथा आहे.
ह्या वृक्षाच्या अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Erythrina_variegata,davesgarden.com/guides/pf/go/56753/, www.indianetzone.com/4/the_coral_tree.htm,
www.ayushveda.com/herbs/erythrina-variegata.htm,
www.thefreedictionary.com/Indian+coral+tree,
www.flowersofindia.net/catalog/slides/Indian%20Coral%20Tree.html,
www.gardenorganic.org.uk/pdfs/international_programme/TTS10-Erythrina_variegata.pdf,
www.indianpost.com/viewstamp.php/Alpha/T/THE%20INDIAN%20CORAL%20TREE

जॅकारॅंडा

मराठी, हिंदीत निलमोहोर, इंग्रजीत जॅकारांडा आपल्या फुलांच्या फिक्कट जांभळ्या (violet) किंवा गुलाबी रंगामुळे उठून दिसतो. फुले चंबू आकाराची असून त्यांना पुढच्या बाजूला पाकळ्या असतात. ह्या वृक्षाची पाने घनदाट असतात. ह्या वृक्षाचे लाकूडही वापरात येते. ही झाडे जगभर पाहायला मिळतात. दक्षिण अफ्रिकेतल्या शहराला तर जॅकारॅंडा सिटी नाव देण्यात आले आहे. तिथल्या निग्रो विद्यार्थांचा भाबडा समज असा आहे की परिक्षेला जातांना जॅकारॅंडाचे फुल डोक्यावर पडल्यास परिक्षेत नापास होण्याची शक्यता असते. जॅकारॅंडाच्या माहितीसाठी आणि छायाचित्रांसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Jacaranda, www.jacarandanailsworth.co.uk,
www.boloji.com/poetry/3001-3100/3037.htm, en.wikipedia.org/wiki/Jacaranda,
www.millerfamily.biz/phlog/2004/10/jacaranda-flowers.html, www.jacarandafloral.co.uk
www.jacarandaflowers.com,www.rareflora.com/jacarandajas.html, www.theflowerexpert.com/content/aboutflowers/tropicalflowers/blue-jacaranda, eyelevelpasadena.com/2007/05/24/jacaranda-flowers-on-our-old-honda

कॅशिया

कॅशियाचा वृक्ष मूळ चीन आणि व्हिऍतनामचा पण भारतातही त्याची लागवड बरीच झाली. कॅशियाच्या खोडाला थोडासा दालचिनी सारखा वास येतो. त्यामुळे त्याचा वापर मसाल्यातही केला जातो. सुगंधासाठी त्याचा वापर वेगवेगळ्या गोळया, चॉकलेट, डेसर्ट, मासांहरी पदार्थातही केला जातो. ह्या झाडाच्या कळ्या थोड्याफार लवंगा सारख्याच दिसतात. Cassia-fistula ह्या जातीला पिवळी फुले येतात. ह्या झाडाचा उपयोग आयुर्वेदीक औषधांमध्येही केला जातो.
अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Cassia, en.wikipedia.org/wiki/Cassia_(genus),
www.theepicentre.com/Spices/cassia.html, homecooking.about.com/od/cookingfaqs/f/faqcassia.htm, www.botanical.com/botanical/mgmh/c/cassia31.html, www.hear.org/starr/hiplants/images/thumbnails/html/cassia_fistula.htm, en.wikipedia.org/wiki/Golden_Shower_Tree,
www.ayurveda-herbal-remedy.com/indian-herbs/cassia-fistula.html

बहावा

बहावा हा अमलताश किंवा गोल्डन शॉवर ट्रीच्या नावाने ओळखला जातो. बहरलेला असतांना संपूर्ण झाड पिवळ्या फुलांनी बहरुन येते तेव्हा पाने दृष्टीस पडत नाहीत. ह्या झाडाचे आयुर्वेदीक औषधात खूप महत्त्व आहे. बहावा हा थायलंड देशाचा राष्ट्रीय वृक्ष आहे. बहाव्याची पिवळी फुले थाई लोकांची शान प्रदर्शित करतात. हे झाड ऑरनमेंटल ट्री म्हणूनही लावले जाते.
छायाचित्रे आणि अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Golden_Shower_Tree, http://www.flowersofindia.net/catalog/tree.html, www.ayurveda-herbal-remedy.com/indian-herbs/cassia-fistula.html, www.motherherbs.com/cassia-fistula.html, www.india-shopping.net/india-ayurveda-products/Cassiafistula-amaltas.htm, www.rain-tree.com/canafistula.htm, www.ayushveda.com/herbs/cassia-fistula.htm, www.herbalcureindia.com/herbs/aragvadha.htm, www.trade2india.com/products/cassia-fistula.html, www.amaltas.org/category/ayurvedic-herbs/cassia-fistula

– सौ. भाग्यश्री केंगे