साडी हा भारतीय स्त्रीचा सर्वात ’एलिगंट’ पेहराव आहे. प्रत्येक शरीरयष्टीला, रंगाला शोभेल असे पाचवार सलग कापड भारतीय स्त्रियांचे सौंदर्यं वाढवत आले आहे. प्रत्येक प्रांतात साडी नेसण्याची पध्दत, त्यावरचे डिसाईन, कलाकुसर वेगवेगळे आहे. उंच स्त्रीने मोठ्या बॉर्डरची तर बुटक्या स्त्रीने बारीक बॉर्डरची साडी नेसल्यास, त्यावर साजेशी पर्स किंवा हॅंडबॅग घेतल्यास व्यक्तीमत्व अधिक उठून दिसते. फॅशन डिसायनर्स मुळे साडी नेसणे एक वेगळेच तंत्र मानले गेले आहे. आपल्या साडी पेहरावात अधिक चांगले बदल करण्यासाठी खालिल साईट्स जरुर पहा –
http://www.howtowearsari.com,
www.utsavsarees.com, en.wikipedia.org/wiki/Sari,
http://www.seasonsindia.com/beauty/saree_sea.htm,
www.indianweddingsaree.com, www.sarijewels.com, ashika.com, www.utsavsarees.com/pages/wearsari.htm,
www.exoticindiaart.com/howtowear/, www.bizindiaonline.com/directory.php?cat_id=1147,
world-amazing-facts.blogspot.com/2007/03/learn-how-to-wear-indian-saree-in-easy.html
नऊवारी
एकोणीसव्या शतकातले प्रतिभावंत चित्रकार राजा रवीवर्मा, हिंदू देवतांचे चित्र रेखाटण्यासाठी स्त्रियांच्या उत्कृष्ट वस्त्राच्या शोधात होता. अखेर त्यांनी नऊवार साडी पसंत केली, कारण हीच एक अशी साडी होती जी कुठल्याही आकाराच्या शरीराला शोभून दिसत होती. राजा महाराजांच्या जमान्यात तर सोन्या-चांदीच्या तारांनी नऊवारीवर नक्षीकाम केले जायचे. आज नऊवारी तुरळक प्रमाणात दिसत असली तरी खास समारंभांना तरुण मुलींचीही नऊवारीलाच पसंती असते. नेटवर नऊवारी विषयी विशेष माहिती उपलब्ध नाही पण पुढील साईट्स वाचण्यासारख्या आहेत –
http://www.marathiworld.com/sanskruti/peharav/sari.htm,
en.wikipedia.org/wiki/Navvari_sari, nitawriter.wordpress.com/2007/02/23/411/,
http://freshkitchen.blogspot.com/2007/06/modaks.html, masalatalk.com/masalaboard/showthread.php?t=56702&page=4, lifestyle.indiainfo.com/relationships/marriages-n-weddings/m-wedding.html, masalatalk.com/masalaboard/showthread.php?t=56702, www.cuisinecuisine.com/CultureClothing.htm
पैठणी
पैठणी ही मराठी स्त्रीची शान समजली जाते. काहीशी महाग असणारी पैठणी पूर्वी हाताने विणली जायची, त्यावर रंगकाम, भरतकाम करणारे कलाकार होते. पैठणी बनवण्याची कला साधारण २००० वर्ष जुनी आहे. पैठणीचे मूळ गाव म्हणजे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले मराठवाडयातले ‘प्रतिष्ठान’ म्हणजेच आताचे पैठण. प्राचीन काळात पैठण रेशीम व जरीच्या व्यापाराचे महत्त्वाचे ठिकाण होते. त्यावेळी रोमन देशाच्या राजाला कापसाचे सूत व रेशीम धागा निर्यात केला जायचा. १८व्या शतकात पेशव्यांचे राज्य होते. पेशव्यांनी पैठणींच्या उत्पादनाला प्रोत्साहन आणि चालना दिली. माधवराव पेशवे यांनी येवल्यात करागीरांना पैठणी विणायला सुरूवात करुन दिली. म्हणून पेशवे इतिहासात येवला हे पैठण इतकेच प्रसिद्ध झाले. पैठणीचे रंग आणि नक्षी वैशिष्टपूर्ण असते. पैठणी मुख्यता दोन रंगात असते. एक साडीचा मूळ रंग व दुसरा कठावरचा रंग. पैठणी साडीवरची नक्षी देखील वैशिष्टपूर्ण आहे. अजिंठा लेण्यांच्या प्रभावामुळे पैठण कारागीरांवर बौध्द धर्माचा प्रभाव अधिक होता. हा प्रभाव त्यांच्या नक्षीकामातही जाणवतो जसे कमळाचे फूल, हंस, फूलांची वेलबुटटी, नारळी, मोर, राघू-मैना इत्यादीचा वापर अत्यंत आकर्षकपणे केला जातो. अधिक माहितीसाठी –
http://marathiworld.com/sanskruti/peharav/paithani.html,
http://en.wikipedia.org/wiki/Paithani, http://paithanisilk.com
www.utsavsarees.com/pages/paithanisaris.htm,
www.indianwomenclothing.com/indian-sarees/paithani-sarees.html,
www.palavihandicrafts.com,www.paithaniwala.com, www.thehindubusinessline.com/2002/09/06/stories/2002090600571800.htm
गुजराती साडी
गुजरात आणि कच्छ प्रांतात गुजराती पध्दतीची साडी विवाहीत स्त्रिया नेसतात. ही साडी पाचवारी असून त्याचा पदर समोरुन घेतला जातो त्यामुळे नि-यांची दीशा उलटी असते. ह्या साडया बहुतेक वेळा पदरावर भरपूर जरीकाम, मीनावर्क, भरतकाम केलेल्या असतात. बांधणीकाम हे ही गुजराती साड्यांचे वैशिष्टय. लाल बांधणी किनारपट्टी असणारी पांढरी साडी म्हणजे पानेतर आणि सोनेरी चौकटींची लाल बांधणी साडी म्हणजेच गढचोला ह्या दोन्ही साडया प्रत्येक गुजराती युवतीच्या विवाह प्रसंगी वापरल्या जातात. नेटवर माहितीसाठी –
www.utsavsarees.com/pages/gujratisarees.htm, www.dmi-india.com/showcase11.html, www.salwarkameezindia.com/saris-sarees.htm, www.indianwomenclothing.com/indian-sarees/state-wise-variations.html, www.kasumbo.com/products.php?id=37,www.exoticindiaart.com/product/YR93/, www.sangamworldcentre.org/en/about/activities/Saree/Guja
बंगाली साडी
लाल किनारपटटीच्या पांढ-या साडीच्या पदराला चाव्यांचा गुच्छा, त्यावर साजेसे फुग्यांच्या बाह्याचे ब्लाऊज, कपाळाला मोठे लाल कुंकू… खानदानी बंगाली बहू ह्याच रुपात आपल्यासमोर येते. ही साडी नि-या न घालता फक्त दोनदा विशिष्ट पध्दतीने अंगाभोवती गुंडाळली जाते. छायाचित्रांसह बंगाली कशी नेसायची शिकायचे असल्यास http://www.sarisafari.com/howbengali.html ह्या लिंकला जरुर भेट द्या. बंगाली कॉटन साडया ह्या विविध रंगात, कडक स्टार्च केलेल्या असल्यामुळे एलिगंट लूक देतात. अधिक माहितीसाठी –
www.myrightangle.com/ssw/screenshots3.asp,
www.utsavsarees.com/pages/bengalisarees.htm, flickr.com/photos/67939017@N00/2197168787/, www.banglalive.com/store/special/saree_prepujo.htm, www.jimyellowpages.com/companies/179/178867.htm, www.desivastra.com/indianboutique/id_1034white-puja-saree.html,
www.calcuttaglobalchat.net/invboard/index.php?showtopic=8897
इक्कत साडी
ओरीसाचे परंपरागत डिसाईन असणारी इक्कत साडी ओडीसी नृत्यकलेमुळेही सर्वत्र पोहोचली आहे. ह्याला ओरीसात पटोलाही म्हटले जाते. असे म्हणतात पटोला किंवा इक्कत साडी विणणे ही अत्यंत अवघड कला आहे. ह्या प्रकारची कलाकारी आंद्रप्रदेश, ओरीसा आणि गुजरात मध्ये केली जाते. परंतु दुर्दैव असे की दुहेरी पाटन पटोला विवणारी फक्त तीनच कुटूंबे गुजरात मध्ये आहेत. एक साडी करायला साधारण सहा महिने लागतात आणि प्रत्येक साडीची किंमत लाखाच्या घरात जाते. ह्याविषयीचा इतिहास आणि माहितीसाठी –
http://www.tribuneindia.com/2006/20061105/society.htm,
www.iswarchandrapal.com/ikkat.asp, www.hotfrog.in/Products/Ikkat-Sarees,
http://www.chennaiplaza.com/subitems.asp?itemid=CL000225,
www.ikkat.com/exclusive.aspx, www.mangalgiri.com/exclusive.aspx,
www.sulekhab2b.com/ViewOffer/Product/19832/double-ikat-sarees.htm
– सौ. भाग्यश्री केंगे