स्त्री आरोग्य

घरातल्या स्त्रीचे आरोग्य ही फक्त कुटूंबाचीच नाहीतर संपूर्ण देशासाठी महत्त्वाची जवाबदारी आहे. स्त्री आरोग्याच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींबाबत आपण जाणून घेणार आहोत. स्त्री आरोग्य आणि सौंदर्य विषयक अनेक वेबसाईट्स आहेत ज्यात त्यांनी संगोपनापासून ते रजोनिवृतीपर्यंत अनेक विषय हाताळलेले असतात. ह्या विषयांवर लेख आणि चर्चा केली जाते. पण लक्षात घ्या, बहुतेक साईट अमेरिकन लाईफस्टॉइलशी संबंधीत आहेत आपल्या जितकी हवी तितकीच माहिती त्यातून वाचावी. अधिक माहितीसाठी –
www.womenshealthmag.com,
www.womens-health.com, www.healthywomen.org,
www.womenhealthzone.com, www.doctorndtv.com/women,
www.indiaparenting.com/whealth/index.shtml,
www.khoj.com/Health_and_Medicine/Women’s_Health, www.4woman.gov, www.indiatogether.org/women/health/health.htm, www.womenhealthandbeauty.com

कॅलशियमची गरज

९०% माणसांच्या हाडात आणि दातात असणारे कॅलशियम अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हाडे आणि दातांची मजबूती, रक्त साकळणे, संदेशवहन चांगले होण्यासाठी कॅलशियमची गरज असते. कॅलशियमच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होण्याची समस्या (ऑस्टिओपोरोसिस) स्त्रियांमधे चाळीशी नंतर अधिक आढळते. दूध, दूग्धजन्य पदार्थ, सोयाबीन, नागली, चौळी, कोबी, तीळ, बदाम ह्या काही अन्न घटकांमध्ये कॅलशियमचे प्रमाण अधिक आढळते. पुढील साईट्सवर आपल्याला कॅलशियमची शास्त्रीय माहिती, अन्न घटक आणि पाककृतींची माहिती मिळते –
http://www.hsph.harvard.edu/nutritionso urce/calcium.html,
www.tarladalal.com/CalciumRich.asp, en.wikipedia.org/wiki/Calcium,
www.vegansociety.com/html/food/nutrition/calcium.php, www.hsph.harvard.edu/nutritionsource/calcium.html,
www.vegsoc.org/info/calcium.html, www.nlm.nih.gov/medlineplus/calcium.html,
www.cereusmed.com/MyBones/Calcium_rich_recipes.html, www.womenandinfants.org/body.cfm?id=231,
www.rd.com/food-and-recipes/eating-for-health-and-weight-loss/calcium-rich-recipes

लोहाची गरज

भारतात कॅलशियम इतकीच लोह कमतरता किंवा पंडूरोगाची समस्या स्त्रीयांमध्ये आढळते. पंडूरोग हा लाल रक्त पेशीत असणारया हिमोग्लोबीन ह्या घटकामुळे होतो. शरिरात लाल रक्त पेशीं तयार होत नसल्यास, अपुरा आहार, अपघात किंवा इतर अनुवंशिक कारणांमुळे पंडूरोगाची समस्या उदभवते. हिरव्या पालेभाज्या, खजूर, काळामनुका हे लोहाचे प्रमुख घटक आहेत.
स्वयंपाकासाठी लोखंडी भांडी, तवा, पळी वापरल्यास लोहाची कमतरता भरुन निघू शकते. पुढील साईट्सवर आपल्याला लोहाची शास्त्रीय माहिती, अन्न घटक आणि पाककृतींची माहिती मिळते –
http://blogs.ibibo.com/changr/Importance-of-Iron.html, food.sify.com/fullstory.php?id=13239134&t=More%20Articles&page=2,
nutritionfoundationofindia.res.in/archives.asp?archiveid=234&back=bydate.asp,
www.education.nic.in/cd50years/r/2V/7B/2V7B0B03.htm,www.tarladalal.com/IronRich.asp

फॉलिक ऍसिड

फॉलिक ऍसिड हे पाण्यात विरघळणारे व्हिटॅमीन B9 चे रुप आहे. फॉलिक ऍसिड हे आपल्याला आहारातून मिळतेच पण कमतरता असल्यास गोळ्या घेतल्या जाऊ शकतात. नवीन पेशींची जडणघडण आणि वाढ हे फॉलिक ऍसिडचे मुख्य काम आहे. त्यामुळे त्याची गरज गर्भारपणात, स्तपान देत असतांना आणि बालवयात अधिक असते. गर्भार राहच्या अधीपासूनच स्त्रीयांनी फॉलिक ऍसिड घेतले असेल तर बाळाला न्यूरॉजीकल समस्या होण्याची शक्यता कमी असते. पुरुष आणि स्त्रियांच्या प्रजननक्षमतेसाठी फॉलिक ऍसिड उपयुक्त आहे. फॉलिक ऍसिडची शास्त्रीय माहिती, अन्न घटक आणि पाककृतींच्या अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Folic_acid, www.nlm.nih.gov/medlineplus/folicacid.html,
www.marchofdimes.com/pnhec/173_769.asp, www.kidshealth.org/parent/pregnancy_newborn/pregnancy/folic_acid.html,
www.yourhealthbase.com/folate.html, www.4women.gov/faq/Easyread/folic-etr.htm,
www.folicacid.net, www.folicacidnow.net/foodSources.html,
www.tarladalal.com/PregNutFolicAcid.asp, www.pioneerthinking.com/folicacid1.html,
www.medicinenet.com/vitamins_and_calcium_supplements/article.htm,
www.ifood.tv/blog/national_folic_acid_awareness_week

स्त्रियांचा आहार

बहुतेक वेळा घरातली स्त्री आपल्यालाही पौष्टीक आणि चौरस आहारची गरज आहे हे विसरुन कुटूंबाच्या आहाराची फर्माईश करण्यात गुंतलेली असते. मुलगी वयात येतांना, गर्भारपणात, स्तनपान करत असतांना, रजोनिवृतीच्या काळात विशेष आहाराची गरज असते. ह्या मध्ये कॅलशियम, लोह, फॉलिक ऍसिड ह्या बरोबर अन्नातील इतर महत्त्वाचे व्हीटॅमीन, खनिजे जातात की नाही हे पाहणे आवश्यक आहे. आहाराबरोबर विहार म्हणजेच शारिरीक व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. पुढील लिंक्सवर अतिशय माहितीपूर्ण लेख दिले आहेत –
http://www.helpguide.org/life/healthy_eating_women_nutrition.htm, www.healthcastle.com/womens_nutrition.shtml, nutrition.about.com/library/bl_nutrition_guide.htm, www.idph.state.il.us/about/womenshealth/factsheets/nut.htm, books.google.co.in/books?isbn=0658021303, www.ceeindia.org/mdgs/goal_5.htm

महिला दिन

स्त्रीच्या व्यक्तीमत्वाला अनेक पैलू आहेत मुलगी, आई, व्यवसायिक अश्या कितीतरी भूमिकेतून आपल्या समोर समर्थपणे येते. नेटवर स्त्रियांविषयक अनेक विषय आणि माहिती जसे की आरोग्य, संगोपन, ब्यूटी टीप्स, पाककला, कुटूंब, करियर … साईट्स वर उपलब्ध आहेत. आणि हो,
ई-शुभेच्छा द्यायलाही ह्या साईट्सवर सोय आहे. जरुर पहा –
http://marathiworld.com/muktangan-m/saakhi
www.womansday.com, www.internationalwomensday.com, www.infoplease.com/spot/womensday1.html,
www.rediff.com/women07/women07.html
www.indiaparenting.com/womensissues/data/001.shtml
http://www.indiavisitinformation.com/indian-personality/Sarojini-Naidu.s…,
www.indiatogether.org/women/writing/write.htm

– सौ. भाग्यश्री केंगे