इंटरनॅशनल स्कूल्स

आताआता पर्यंत भारतात प्रत्येक राज्याचा स्वत:चा अभ्यासक्रम असायचा आणि शाळांमधून तो पाळला जायचा. आता मात्र सिबीएसी, आयसिएसी, आयबी बोर्डाप्रमाणे अभ्यासक्रम आखले जाऊ लागले. भारतात अनेक शाळांमधून हा उपक्रम राबवला जातो. इंटरनॅशनल स्कूल्सच्या वेबसाईटस वर आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमाची, उपक्रमांची संपूर्ण माहिती, शाळेचा परिसर, सुविधा अगदी ऑनलाईन प्रवेश सुध्दा शाळेत घेता येतो. भारतातिल काही इंटरनॅशनल स्कूल्सच्या साईट –

www.da-is.org,
http://www.oakridgeinternational.com,
http://www.kis.in,
www.snehinternationalschool.com,
www.amity.edu, http://www.parkwoodschool.com,
http://www.jirs.ac.in, www.orchideducation.com,
http://www.ryaninternational.org

अभ्यासक्रम
राज्य पाठय अभ्यासक्रमा व्यतिरीक्त आज इंटरनॅशनल अभ्यासक्रमही भारतात शिकवले जातात. त्यात मुख्यता सिबीएसी, आयसिएसी, आयजीसिएसी, आयबी बोर्ड आहेत. काही शाळांमधून केंब्रिज अभ्यासक्रमही शिकवला जातो. ह्या सर्व अभ्यासक्रमांची माहिती, पाठयक्रम, परिक्षांचे वेळापत्रक अशी संपूर्ण माहिती वेबसाईटसवर उपलब्ध आहे. अनुक्रमे
www.cbse.nic.in/, http://www.ibo.org/, http://www.cie.org.uk
शाळेत चौकशी करण्याआधी ह्या साईट बघितल्यास पालक निश्चितच अपडेट होतील.

होमस्कूलींग
आजच्या नवीन युगात होमस्कूलींगची संक्लपना हळूहळू रुढ होते आहे. होमस्कूलींग म्हणजे शाळेत न जाता घरीच आपल्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करणे.ह्या मधे शाळेत जाणे नाही, होमवर्क नाही आणि शिक्षकांचे रागावणेही नाही. पण त्यामुळे मुलांवर आणि पालकांवर अभ्यासाची जवाबदारी अधिक. होमस्कूलींग करणा-या मुलांसाठी अभ्यासक्रम आखून दिलेला असतो त्यानुसार मुलांनी आपल्याला आवडेल तेव्हा आणि तेव्हढाच अभ्यास करायचा आणि वार्षिक परिक्षा द्यायची. इंटरनेटवर होमस्कूलींगची माहिती देणा-या अनेक साईट्स आहेत. त्यावर संपूर्ण अभ्यासक्रम, माहिती, ऑनलाईन हेल्प उपलब्ध आहेत –
http://en.wikipedia.org/wiki/Homeschooling, www.homeschools.org, eho.org,
www.homeschool.com, www.homeschool-curriculum-4u.com, www.home-school.com,
www.homeschoolcentral.com, www.homeschoolmath.net,
www.kidsource.com/kidsource/content2/homeschooling.k12.3.html,
www.homeschoolandmore.ca, www.homeschoolingexplained.com,
www.thehomeschoolinghelper.com, www.homeschooltoday.com

ऑन लाईन होमवर्क
होमस्कूलींगच्या विद्यार्थांसाठी अभ्यासाचे नवनवीन पर्याय उपलब्ध असतात. इंटरनेटवर प्रत्येक विषयाचे अनेक व्यवसाय किंवा होमवर्क उपलब्ध आहे. प्रत्येक विषयासाठी अगदी बालवाडीपासून ते दहावी पर्यंत अनेक प्रश्न सोडविण्यासाठी उपलब्ध आहेत.
त्यातही सोपे ते अवघड असे पर्याय मुलांच्या कुवती प्रमाणे निवडता येतात. मुलांना आवडतील असे वेगवेगळे म्यूझिक असणारे, रंगीत आणि अभ्यासाशी निगडीत असणारे गेम्सही मुलांसाठी उपलब्ध आहेत. मुलांना स्वत:चे वेगळे अकाउंटही उघडता येते. शाळेच्या अभ्याक्रमाव्यतिरीक्त ह्या साईट्सना जरुर भेट द्यायला हवी –
www.yourhomework.com, www.math.com, www.homeworkspot.com, www.homeworknow.com, www.homeworkhelp.com, www.infoplease.com/homework, www.homework-online.com,
www.brainmass.com, www.tutor.com, www.mathonline.org

फोनिक्स
कुठीली भाषा शिकण्यासाठी त्या भाषेच्या मुळाक्षरांबरोबर फोनिक्स शिकणे महत्त्वाचे. इंग्रजी शिकण्यासाठी तर फोनिक्सचा चांगला उपयोग होतो. ए,बी,सी,डी मुळाक्षरांबरोबर आपल्या मातृभाषेतून उच्चारांची सांगड घालता येणे आवश्यक आहे.
इंटरनेटवर फोनिक्सच्या अनेक साईटस आहेत. तेथे रंगीत चित्र, वेगवेगळे खेळ, छोटी व सोपी कोडी व अनेक सरावाच्या अभ्यासातून फोनिक्स शिकणे अधिक सोपे जाते. इंग्रजी शिकण्यासाठी खालील साईटस जरुर पहा –
genkienglish.net/phonics.htm, www.surfnetkids.com/phonics.htm, www.starfall.com, www.englishraven.com/Phonics.html, www.gophonics.com, www.kidzone.ws/phonics/index.htm, www.softschools.com, www.kiddyhouse.com/Worksheets, www.free-phonics-worksheets.com

मराठी शिकण्यासाठी
आज बहुतेक मुलं इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतांना दिसतात. इतर राज्यात किंवा परदेशात राहणारया मराठी मुलांना तर पर्यायच नसतो. अश्या वेळेला आपल्या मातृभाषेशी नाळ जोडून ठेवायला इंटरनेटवरच्या साईटस अत्यंत उपयुक्त आहेत. येथे मुलांना अगदी बाराखडी पासून ते वाक्य वाचना पर्यंत सर्व काही शिकवता जाते. त्यातही रंगीत चित्रे, खेळ, कोडी, गोष्टीतून शिक्षण असल्यामुळे मुलांना अजिबात कंटाळा येत नाही. आपली मातृभाषा शिकण्यासाठी खालील साईटस जरुर पहा –
http://www.marathiworld.com/balnagari/info/info1.htm, www.marathimitra.com,
www.punediary.com/learn_marathi.html, www.languageshome.com/English-Marathi.htm,
www.maayboli.com/dir/Language_and_Literature/Learn_Marathi,
www.mylanguageexchange.com/Learn/Marathi.asp,
www.languageresourceonline.com/languages/learn_marathi.html,
www.mmlondon.co.uk/linklearnmarathi.html, www.worldlanguage.com/Languages/Marathi.htm

– सौ. भाग्यश्री केंगे